Elu Elu Movie Trailer: प्रेमाच्या सुरेख आठवणींची गोष्ट ‘इलू इलू’ चित्रपटाचा रंजक ट्रेलर प्रदर्शित
Elu Elu Movie Trailer : आठवणी म्हणजे कधीही न विसरणारी गोष्ट. गेलेले क्षण परत येत नाहीत पण आपल्याला त्या आपल्या मनाच्या कोपऱ्यात सांभाळून जपून ठेवता येतात. तारुण्यातल्या भावविश्वाचा हळवा कप्पा प्रत्येकाने आपल्या मनाशी जपलेला असतो. यासोबत मैत्री, प्रेम,या सगळ्यांचा नव्याने अर्थ उमगायला लागलेला असतो. पहिल्या प्रेमाच्या आठवणी प्रत्येकासाठी खास असतात. प्रेमाच्या याच सुरेख आठवणींची गोष्ट घेऊन आलेल्या ‘इलू इलू’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच कलाकारांच्या उपस्थित संपन्न झाला. ९० दशकाचा माहोल, विंटेज कार मधून कलाकारांची ग्रँड एंट्री अशा ‘फुल ऑन’ अंदाजात हा सोहळा रंगला. फाळके फिल्म्स एण्टरटेन्मेंट प्रॉडक्शन आणि अजिंक्य बापू फाळके दिग्दर्शित ‘ इलू इलू’ हा मराठी चित्रपट ३१ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.( Elu Elu Marathi Movie Trailer ) प्रेम जगातली सगळ्यात सुंदर भावना. ती शब्दात व्यक्त करणं अवघडच. प्रेम कोणी आणि कोणावर केल यावर ते चूक की बरोबर हे नाही ठरवता येत. प्रत्येकज...