Posts

Showing posts from October, 2025

Zhund चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत झळकलेल्या अभिनेत्याची निर्घुण हत्या

Image
बॉलिवूडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे… नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ (Zhund Movie) चित्रपटात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यासोबत झळकलेल्या अभिनेता प्रियांशु क्षत्रिय अर्थात चित्रपटातील ​​बाबू छत्रीची निर्घुणपणे हत्या करण्यात आली आहे… मिळालेल्या माहितीनुसार नागपुरमध्ये त्याचा खुन करण्यात आला असून अर्धनग्न अवस्थेत त्याचा मृतदेह पोलिसांना सापडला होता…(Nagraj Manjule movie) Box office collection अधिक माहितीनुसार, एका गुन्हेगाराने किरकोळ वादातून प्रियांशुची हत्या केल्याचं सांगितलं जात आहे.. त्याचे हातपाय बांधुन हत्या करण्यात आली असून अर्धनग्न आणि अतिशय गंभीर जखमी अवस्थेत पोलिसांना प्रियांशु आढळला होता. ================================ हे देखील वाचा : मराठी ‘झुंड’ चालतेय पुढे….  ================================= दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी या प्रकरणी एका संशयितास ताब्यात घेतले आहे. घटनेच्या काही तासांतच पोलिसांनी आरोपी ध्रुव लाल बहादूर साहू याला अटक केली. पूर्ववैमनस्यातून ही घटना घडल्याचे सांगितलं जात असून या हत्या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेला, गुन्हेगारी पार्श्वभूमीचा ...

Lalit Prabhakar : ‘प्रेमाची गोष्ट २’एका लव्ह स्टोरीच्या अरेंज मॅरेजची गोष्ट

Image
  मराठी चित्रपटसृष्टीत सध्या वेगवेगळे विषय मांडले जात आहेत… दर्जेदार कौटुबिंक चित्रपटांचा सपाटा लागलाच आहे… शिवाय आत्ताच्या लग्नसंस्थेवर भाष्य करणारे बरेच चित्रपटही येत असून अशातच आता ऋचा वैद्य आणि ललित प्रभाकर यांची प्रमुख भूमिका असणारा ‘प्रेमाची गोष्ट २’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे… या चित्रपटात प्रेक्षकांना आधुनिक काळातील अनोखी प्रेमकथा पाहायला मिळणार आहे… नुकताच या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला असून जाणून घेऊयात ट्रेलरबद्दल….(Lalit Prabhakar and Rucha Vaidya) Bollywood Tadka प्रेमाची गोष्ट २ या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये ललितच्या आयुष्यात लग्न, घटस्फोट आणि त्यानंतर पुन्हा समोर आलेलं जुनं प्रेम याची भन्नाट कथा पाहायला मिळणार आहे… या सगळ्यांमुळे त्याचं आयुष्य जणू एका वादळात सापडलं आहे. स्वतःच्या चुकांचा आणि नशिबाचा हिशेब करताना तो सगळ्याचा दोष देवाला देताना दिसतोय. परंतु देव त्याला खरंच नशिब बदलण्याची दुसरी संधी देणार का? आणि दिलीच, तरी लालितचं नशिब खरंच बदलेल का? याचं उत्तर प्रेक्षकांना चित्रपट पाहूनच मिळणार आहे. चित्रपटात आजच्या काळातील प्रेमाचे वास्तव, ...

“Kantara Chapter 1 मध्ये मी जे पाहिलं ते जादूसारखं…”; रितेश देशमुखची ऋषभ शेट्टीसाठी खास पोस्ट

Image
  सध्या ‘कांतारा : चॅप्टर १’ (Kantara : A Legend-Chapter 1) चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरश: भंडावून सोडलं आहे… ऋषभ शेट्टी लिखित-दिग्दर्शित आणि अभिनित ‘कांतारा : अ लेजेंड -चॅप्टर १’ चित्रपटाने अवघ्या ५ दिवसांमध्ये रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे… कन्नड चित्रपटसृष्टीतील आणखी एक सुपरहिट चित्रपट ठरलेल्या ‘कांतारा १’ चं देशभरात कौतुक सुरु आहे… अभिनेता यश, ज्युनिअर एनटीआर, संदीप रेड्डी वांगा अशा बऱ्याच कलाकारांनी कांताराचं कौतुक करत ऋषभचं (Rishabh Shetty) अभिनंदन केलं आहे… आता अभिनेता रितेश देशमुख यानेही ‘कांतारा १’ चं विशेष कौतुक करणारी पोस्ट केली आहे… (Riteish Deshmukh praises Kantara 1 movie) Latest Marathi Movies ‘कांतारा : अ लिजेंड – चॅप्टर १’ चं भरभरुन कौतुक करणारी पोस्ट लिहिताना रितेश देशमुख म्हणाला आहे की, “ ‘कांतारा : अ लिजेंड – चॅप्टर १’ पाहिल्यानंतर एक थरारक आणि भव्य भारतीय सिनेमा पाहिल्याचा अनुभव आला. ऋषभ शेट्टी, तुम्ही अभिनेता, लेखक किंवा दिग्दर्शक म्हणून ज्या पद्धतीनं काम करता, ते खरंच कौतुकास्पद आहे. तुमचं काम भविष्यातील पिढ्यांना नक्कीच प्रेरणा देईल. मी या चित्रपटात जे पाहिलं...