Posts

Showing posts from March, 2026

Phula Marathi Movie Teaser: वाघ्या-मुरळीच्या पारंपरिक लोकसंस्कृतीची भाष्य करणाऱ्या ‘फुला’ चित्रपटाचा टीजर लाँच!

  वाघ्या-मुरळी  परंपरेच्या पार्श्वभूमीवर आधारित असलेल्या   “फुला” (Phula)  या मराठी चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून त्याने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. दमदार आवाजासाठी ओळखले जाणारे   सुबोध भावे   (Subodh Bhave) यांच्या निवेदनामुळे टीझरला एक वेगळीच उंची मिळाली आहे. येत्या १७ एप्रिल रोजी चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने त्याबाबतची उत्सुकता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. विशेष म्हणजे, आटपाडी येथील काही तरुणांनी एकत्र येऊन या वेगळ्या विषयाला पडद्यावर आणण्याचा प्रयत्न केला आहे. या चित्रपटाची निर्मिती   पैलवान अजित शिवाजी जाधव  (Pailwan Ajit Shivaji Jadhav)यांनी केली असून शिवशर्विल मूव्ही आणि बोधी सिनेमा यांच्या माध्यमातून तो सादर केला जात आहे. कथालेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारी   अभिषेक जावीर   यांनी सांभाळली आहे, तर पटकथा रवीकिरण जावीर यांनी लिहिली आहे. संगीत दिग्दर्शन समाधान ऐवळे यांचे असून सर्जनशील   दिग्दर्शन अमर देवकर   यांनी केले आहे. गीतलेखनात रवीकिरण जावीर आणि समाधान ऐवळे यांचा सहभाग आहे. छायांकन प्रताप जोशी या...

भाईजानने घेतला मोठा निर्णय;‘Battle of Galwan’ नाही तर आता ‘या’ नावाने रिलीज होणार सलमान चा मोस्ट अवेटेड चित्रपट!

  बॉलिवूड सुपरस्टार  सलमान खान  (Salman Khan) सध्या फक्त सिनेमातच नव्हे, तर वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनातही चर्चेत आहे. त्याच्या नवीन चित्रपटाबाबत चाहत्यांसाठी एक मोठा अपडेट समोर आला आहे. आधी ‘बॅटल ऑफ गलवान’ ( Battle of Galwan)  नावाने चर्चेत असलेला हा चित्रपट आता एका नव्या, जोरदार आणि अर्थपूर्ण टायटलसह प्रेक्षकांसमोर येणार आहे.आणि आता त्याच नाव  ‘मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस’ ( Matrubhumi: May War Rest in Peace)  हे आहे. या चित्रपटातील गाणे ‘मातृभूमी’ आधीच रिलीज झाले असून, प्रेक्षकांनी त्याचे जोरदार स्वागत केले आहे. हे गाणे आणि त्याचा संदेश सिनेमाच्या संकल्पनेसाठी एक पायाभूत भूमिका बजावतो. सलमान खानने सिनेमाचे नाव बदलण्यामागील उद्देश फक्त ब्रँडिंगपुरता मर्यादित नाही, तर तो एक सामाजिक आणि जागतिक संदेश देण्याचा प्रयत्न आहे. ‘Battle of Galwan’ हा सिनेमाचा मूळ विषय  Galwan Valley clash  या ऐतिहासिक घटनेवर आधारित आहे, ज्यामध्ये भारतीय सैनिकांनी शौर्य आणि बलिदानाचे अद्वितीय दर्शन घडवले. नवीन टायटल आणि टॅगलाइन  “May War Rest in...