SS Rajamouli यांनी सेटवरचं उभारलं खरंखुरं Varanasi शहर!
चित्रपटाच्या बजेटपेक्षा दुप्पट तिप्पट कमाई बॉक्स ऑफिसवर करण्यात ज्यांचा हातखंडा आहे असे दिग्दर्शक SS Rajamouli लवकरच १००० कोटींचं बजेट असणारा त्यांचा आगामी Varanasi चित्रपट आपल्या भेटीला घेऊन येणार आहेत. प्रियांका चोप्रा आणि महेश बाबू यांच्या प्रमुख भूमिका असणाऱ्या या चित्रपटाची जोरदार चर्चा जगभरात सुरु असून राजामौलींची खासियत असणारी भव्य सेट ही संकल्पना आता या निमित्ताने प्रेक्षकांचं आकर्षण ठरली आहे. सोशल मिडियावर नुकतेच वाराणसी चित्रपटाच्या सेटचे फोटो व्हायरल झाले असून राजामौलींनी अगदी तंतोतंत वाराणसी सेटद्वारे उभारली आहे.
२०२७ मध्ये हा बिगेस्ट बजेट असणारा चित्रपट रिलीज होणार असून या चित्रपटासाठी राजामौली यांनी संपूर्ण वाराणसी शहर रिक्रिएट केलं आहे. Bahubali, RRRहे चित्रपट जितके कथा आणि सेटमुळे यशस्वी छरले अगदी त्याच मार्गावर त्यांचा हा आगामी चित्रपट आहे यात शंका नाही. मोठमोठी मंदिर आणि आलिशान असं शहराचं स्वरुप दाखवण्यात आलं असून ‘वाराणसी’चा भव्य दिव्य आणि डोळे दिपावणारा सेट पाहून सगळेच थक्क झाले आहेत.

‘वाराणसी’ सिनेमात महेश बाबू, प्रियांका चोप्रा, पृथ्वीराज सुकुमारन यांच्या मुख्य भूमिका आहेत. महेश बाबू सिनेमात रुद्र आणि श्रीराम अशा दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. ‘वाराणसी’ ची कथा टाइम ट्रॅव्हलवर आधारित असून तब्बल ४-५ वर्षांनी भारतीय चित्रपटसृष्टीतPriyanka Chopraहिने पुनरागमन केलं आहे. यावेळी बॉलिवूड नाही तर तेलुगू चित्रपटसृष्टीची निवड करत तिने पुन्हा एकदा आपल्या अभिनयाचं कौशल्य सिद्ध करण्यासाठी हे पाऊल उचललं आहे. पौराणिक कथा आणि मॉर्डन अॅक्शन यांचा संगम असणारा वाराणसी चित्रपट ७ एप्रिल २०२७ रोजी जगभरात रिलीज होणार आहे.
दरम्यान, Varanasi चित्रपटाचं एकूण बजेट 1000-1400 Cr असल्याचं सांगितलं जात आहे. आणि बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट 2000-2500 Cr चं कलेक्शन करु शकतो अशी शक्यता देखील वर्तवली जात आहे. त्यामुळे जर का वाराणसी चित्रपटाने २५०० कोटींचा टप्पा बॉक्स ऑफिसवर गाठला तर हा चित्रपट भारती चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील पहिला बिग बजेट चित्रपट आणि बजेटच्या दुप्पट कमाई करणारा पहिला चित्रपट नक्कीच ठरेल.
राजामौलींच्या आधीच्या काही चित्रपटांच्या बजेट आणि बॉक्स ऑफिस कलेक्शनवर नजर टाकली तर २०१२ मध्ये रिलीज झालेल्या त्यांच्या ‘इगा’ या चित्रपटाचं बजेट २६-४० कोटी होतं आणि बॉक्स ऑफिस कलेक्शन ११० कोटींच्या पुढे झालं होतं… याव्यतिरिक्त २००९ मध्ये आलेल्या ‘मगधीरा’ चित्रपटाचं बजेट होतं ३५-४४ कोटी आणि बॉक्स ऑफिस कलेक्शन होतं १०० कोटींच्या पुढे Bahubali 1 चं बजेट होतं जवळपास १८० कोटी आणि केलेक्शन होतं ६५० कोटी, ‘बाहुबली २’ चं बजेट १५० कोटी आणि कलेक्शन १४३० कोटी, ‘आरआरआर’ बजेट जवळपास ५५० कोटी आणि कलेक्शन जवळपास १२०० कोटींच्या पुढे होतं… त्यामुळे एकंदरीत राजामौंलीच्या प्रत्येक चित्रपटाने बजेटच्या दुप्पट-तिप्पट बॉक्स ऑफिस कलेक्शन आजवर केलं आहे आणि हा सिलसिला असाच सुरु राहिल हे फिक्स.
this blog was originally published on https://kalakrutimedia.com/varanasi-set-pics-unveiled-ss-rajamouli-recreates-city-for-mahesh-babu-priyanka-chopra-and-prithviraj-sukumaran-starrer/
Comments
Post a Comment