‘धुरंधर’ सोडा Akshaye Khanna याचे ‘हे’ Under Rated चित्रपट पाहिले का?

 सगळीकडे सध्या Dhurandhar चित्रपटाची चर्चा आहे. पहिल्या भागात रेहमान डकैत ही भूमिका साकारतAkshaye Khanna याने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं… आजच्या GenZ जनरेशनला तर त्याची अॅक्टिंग पाहून कोण आहे यार हा अॅक्टर हे जाणून घेण्याची नक्कीच उत्सुकता लागली.. काही जणांनी त्याने कोणते-कोणते मुव्ही केले आहेत ते गुगल केलं आणि ते शोधताना पठ्ठ्या द ग्रेट Vinod Khanna यांचा मुलगा आहे हे देखील नव्यानेच आजच्या पिढीला समजलं तर नवल वाटायला नकोच… तर सांगायचा मुद्दा हा की, अक्षय खन्ना याचं काम जरी ‘धुरंधर’मुळे अधिक लाईमलाईटमध्ये आलं असलं तरी त्याचे बरेच Underrated मुव्हीज आहेत जे कदाचित फारसे माहित नसतील किंवा पाहूनही त्याला त्यात कुणी नोटीस केलं नसेल. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त जरा त्या चित्रपटांवर एक नजर टाकूयात…

पहिला चित्रपट जो 2002 मध्ये आला तो म्हणजे Humraaz.. बॉबी देओल, अमिषा पटेल आणि अक्षय खन्ना असे तिघे लीडला होते… बऱ्याचदा लीड अभिनेत्याला जितका भाव मिळतो तितका व्हिलनला मिळत नाही आणि यात अक्षयच्या बाबतीत तेच झालं. बेस्ट खलनायक साकारुनही कुठेतरी प्रेक्षकांनी त्याला जरा बाजूला सारलं होतं… यापुढचा चित्रपट आहे Gandhi May Father जो 2007 मध्ये आला होता. यात त्याने गांधीजींच्या मुलाची म्हणजे हरिलाल गांधींची भूमिका साकारली होती. आजवर व्हिलन, कॉमेडी अशा अॅक्टिंगच्या वेगळ्या बाजू प्रेक्षकांसमोर सादर करणाऱ्या अक्षयने ही भूमिका साकारत स्वत:साठीच एक बेन्च मार्क सेट केला होता. 

यानंतर येऊयात 2010 मध्ये रिलीज झालेल्या Tees Maar Khan मुव्हीकडे.. यात अक्षयने सुपरस्टार आतिश कपूर ही भूमिका साकारली होती. ऑस्कर अॅवॉर्ड जिंकण्यासाठी obsessed असणाऱ्या आतिशची अर्थात रिअल लाईफ मधल्या कलाकाराची भूमिका त्याने बाप साकारली होती… आणि शेवटचा चित्रपट म्हणजे 2019 मध्ये आलेला Accidental Prime Minister… या चित्रपटात त्याने मिडिया अॅडवाईजर संजया बारु यांची भूमिका साकारली होती. Anupam Kher यांच्यासोबत स्क्रिन शेअर करत त्याने आपलं वेगळेपण यात टिकवण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता.

जितके अक्षय खन्नाचे चित्रपट गाजले किंवा त्यांची काही अंशी चर्चा झाली तितकीच त्याच्या अफेअर्सची किंवा कुठल्या ना कुठल्या हिरोईनसोबत त्याची नावंही जोडली गेली. असं म्हटलं गेलं होतं की अक्षय खन्ना आणि Karishma Kapoorयांचा साखरपूडा झाला होता, परंतु, काही कारणांमुळे तो मोडला आणि त्यानंतर अक्षयने कधीच लग्न केलं नाही तो आजही पन्नाशी गाठली असली तरी सिंगल आयुष्य जगतोय. तर झालं असं होतं की, Ajay Devgan सोबत करिश्माचं ब्रेकअप झाल्यामुळे ती फार कठिण काळातू जात होती आणि याचवेळी तिच्या आय़ुष्यात अक्षय आला. दोघांमध्ये जवळीकता वाढली आणि लग्न करायचा निर्णय घेतला. रणधीर कपूर यांना अक्षय आवडला होता पण करिश्माच्या आई बबिता यांना अक्षय पसंत न पडल्यामुळे त्यांचं नातं फिस्कटलं.

करिश्मानंतर अक्षयचं नावAishwerya Raiसोबतही जोडलं गेलं होतं. या व्यतिरिक्त श्रिया सरन, तारा शर्मा या अभिनेत्रींसोबतही अक्षयचं नाव जोडलं गेलं होतं. मात्र, कधीही त्याने याबद्दल काही न म्हणता मौन पाळण्यास प्राधान्य दिलं. एकीकडे करिअरचा ग्राफ उंचावत असताना पर्सनल लाईफचा ग्राफ उतरता होता. आज अक्षय एकटाच अलिबागमध्ये राहतो आणि केवळ कामापुरता मुंबईत येतो असं त्याने त्याच्या बऱ्याच मुलाखतीत सांगितलं आहे. निवांत जगत केवळ अॅक्टिंगवर फोकस करणाऱ्या अक्षय खन्नाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

this blog was originally published on https://kalakrutimedia.com/akshaye-khanna-birthday-special-dhurandahr-chhaava-and-many-more-movies/

Comments

Popular posts from this blog

Celebrity Marriage : मोठ्या लोकांच्या मोठ्या गोष्टी, लग्नाच्या प्रक्षेपण हक्काचे साठ कोटी

Sant Dnyaneshwaranchi Muktai: ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर आणि दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडला ज्ञानेश्वरीचा सुरेल सोहळा !

आता मी हिंदीत बोलू?”; मराठीत बोलत असतानाच Kajol का भडकली?