Posts

Showing posts from September, 2024

‘क्रिमिनल्स-चाहूल गुन्हेगारांची’ ही मालिका सोनी मराठीवर पून्हा अनुभवता येणार

Image
  आपल्या आजूबाजूला अनेक  गुन्हे  घडत सतत असतात. काही गुन्हे हे समोरचा गाफील राहिल्याने होतात. अशा वेळी आपण काळजी घेणं आणि सावध राहणं खुप महत्वाचे आणि गरजेचं आहे. असाच संदेश देणारा कार्यक्रम ‘ क्रिमिनल्स – चाहूल गुन्हेगारांची ‘ सोनी मराठी वाहिनीवर पुन्हा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. खरं तर बरेच गुन्हे हे आपण बेसावध राहिल्याने घडत असतात, गुन्ह्यांची चाहूल ही आधीच लागेलेली असते पण आपण ती नजरअंदाज करतो. या मालिकेतून प्रेक्षकांच गुन्हेगारी विश्वापासून कसं सावध राहता येईल यावर प्रबोधन होणार आहे; आणि म्हणूनच गुन्हेगारी विश्वातील रंजक केसेस सोनी मराठी वाहिनी पुन्हा दाखवणार आहे.  क्रिमिनल्स – चाहूल गुन्हेगारांची  मालिकेतून प्रेक्षकांनी सावध राहणं का गरजेचं आहे हे समजण्यासाठी मालिकेचे पुनः प्रक्षेपण  सोनी मराठी  वाहिनी करत आहे. ( Criminal Chahul Gunhegaranchi Sony Marathi   Serial ) bollywood tadka अभिनेता  अभिजित खांडकेकर  या कार्यक्रमाचं  सूत्रसंचालन  करणार आहे.  अभिजित खांडकेकर  हा एक उत्तम सूत्रसंचालक असून आजवर त्याच्या विविध भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. त्याची उत्तम संवाद

लावण्यवती मदनमंजिरी मनमोहक अदांनी घायाळ करायला सज्ज; फुलवंती सिनेमातील नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Image
  बहारदार नृत्य,  मनाला भुरळ घालणारी अदाकारी आणि चैतन्य निर्माण करणाऱ्या घुंगरांच्या आवाजाने मनोरंजन करायला मदनमंजिरी सज्ज झाली आहे. सध्या सगळीकडे फुलवंतीची चर्चा सुरु आहे. या चित्रपटातील  मदनमंजिरी  हे नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.  पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे  यांच्या लेखणीतून उतरलेली ‘फुलवंती’ कादंबरी चित्रपटरूपात  ११ऑक्टोबरला  आपल्यासमोर येणार आहे.(  Prajakta Malis Madanmanjiri Marathi Song) Bollywood masala ” अशी मी – मदनमंजिरी सुबक ठेंगणी लखलखते सुंदरी, अशी मी – मदनमंजिरी चटक चांदणी चमचमते अंबरी”  अशी अतिशय ठसकेबाज शब्दरचना  गीतकार डॉ. प्रसाद बिवरे  यांची असून वैशाली माडे यांच्या आवाजाने या गाण्याला चारचाँद लागले आहेत.  संगीत अविनाश-विश्वजीत  यांचे तर  नृत्यदिग्दर्शन उमेश जाधव  यांचे आहे. या गाण्यातला जोश प्रत्येकाला मंत्रमुग्ध करणारा आहे. या गाण्याचे बोल खूप सुंदर आहेत. संगीतही तितक्याच ताकदीचे आहे. त्यामुळे हे गाणे गाताना खूप मजा आल्याचं वैशाली सांगते. प्रेक्षकांना हे गाणं नक्कीच ठेका धरायला लावेल. प्राजक्ताच्या नृत्यानं या गाण्याला अजून रंग चढला आहे. पॅनोरमा स्टुडि

दशकातील सर्वात मोठा अ‍ॅक्शनपट ‘रानटी’ मराठी रुपेरी पडद्यावर…

Image
  जंगलात राहणारे सगळेच प्राणी जंगली असतात, पण सगळेच ‘ रानटी’  नसतात. काही विशिष्ट प्राण्याचा तो उपजत गुणधर्म असतो. त्याला जगण्यासाठी शिकार करावी लागते, हल्ले करावे लागतात. पण, ह्या हल्ल्याना जेव्हा शांत प्राणी प्रतिकार करतो तेव्हा तो हल्लेखोरापेक्षा अधिक जास्त  ‘रानटी’  असतो. या कथेचा नायक असाच  ‘रानटी’  बनला. म्हणून…   “काही  ‘रानटी’  असतात, काही बनतात!  प्रदर्शित झालेल्या ह्या पोस्टरवरनं  ‘रानटी’  चित्रपट दिसतोय तेवढाच हिंस्त्र आणि त्याहून अधिक अ‍ॅक्शनने भरलेला आहे. मराठी सिनेमांत आजपर्यंत कधीही न पाहण्यात आलेल्या दिग्दर्शनाची शैली, थरारक अ‍ॅक्शन दृश्य, जबरदस्त पटकथेचा जॉनर आणि अचूक संकलन हे  ‘रानटी’  चित्रपटात पहायला मिळणार आहे. प्रेक्षकांसाठी हे ‘सरप्राईज’ असणार आहे.(  Raanti Marathi Movie ) Bollywood masala शरद केळकर  हा हिंदी-मराठी चित्रसृष्टीतील आघाडीचा नट हॉलिवूड चित्रपटातील नायकापेक्षा कमी नाही हे ह्या पोस्टरमधूनही कळतंय आणि त्याचा ‘ रानटीपणा ’ नेमका किती आहे हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावर कळेलच. आपल्या भूमिकेबद्दल बोलताना शरद सांगतात की,’ अधर्मी वृत्तींचा नाश करणार्‍या विष्णूच

Bigg Boss 18 चा पहिला प्रोमो आला समोर; यंदा घरात होणार ‘टाइम चा तांडव’…

Image
  ‘ बिग बॉस’ चे चाहते बऱ्याच दिवसांपासून त्याच्या  18 व्या सीझनची  वाट पाहत होते. दरम्यान, शो मेकर्सकडून चाहत्यांना एक मोठे सरप्राईज देण्यात आले आहे.  ‘बिग बॉस 18’ चा पहिला प्रोमो रिलीज झाला आहे, ज्यामुळे चाहत्यांची शोसाठी उत्सुकता वाढली आहे. यावेळी या शोची थीम भविष्य आणि टाइम म्हणजे वेळेवर आधारित आहे. प्रोमो खूप खास आणि इंटरेस्टिंग दिसत आहे. यासोबतच सलमान खान होस्ट करण्याबाबत जे काही कयास लावले जात होते, तेही आता संपुष्टात आले आहेत.( Big Boss 18 Promo ) Bollywood masala सलमान खान ने आपल्या इन्स्टा स्टोरीवर  बिग बॉस 18 चा प्रोमो  शेअर केला आहे, ज्यात म्हटले आहे की, यावेळी थीम टाइम भविष्य यावर आधारित असेल. लोकांना काहीतरी नवीन पाहायला मिळावं यासाठी बिग बॉस दरवर्षी एक नवीन थीम घेऊन चाहत्यांसमोर आणतो. या प्रोमोबद्दल बोलायचे झाले तर त्याची सुरुवात सलमान खानपासून होते ज्यात तो म्हणतो आहे की  ‘बिग बॉस देखेंगे घर वालों का फ्यूचर…अब होगा टाइम का तांडव’’ . प्रोमो शेअर करताना कॅप्शन देण्यात आलं आहे की, ‘होगी एंटरटेनमेंट की पुरी विश, जब टाइम का तांडव लेकर आयेगा बिग बॉस में एक नया आयेगा. तुम्ही १८

तीन मैत्रिणींची कथा सांगणारा ‘गुलाबी’ उलगडणार स्त्रियांच्या भावविश्वाचा रंग…

Image
  नुकतीच सोशल मीडियावर या चित्रपटाची अनोख्या पद्धतीने तारीख जाहीर केली असून व्हॅायलेट फ्लेम मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘ गुलाबी ’ चित्रपट येत्या  २२ नोव्हेंबर  रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.  अभ्यंग कुवळेकर दिग्दर्शित  या चित्रपटाचे सोनाली शिवणीकर, शीतल शानभाग, अभ्यंग कुवळेकर, स्वप्नील भामरे निर्माते आहेत. ‘गुलाबी’ चित्रपटात  श्रुती मराठे, मृणाल कुलकर्णी, अश्विनी भावे, सुहास जोशी, शैलेश दातार, अभ्यंग कुवळेकर आणि निखिल आर्या  अशी दमदार स्टारकास्ट पाहायला मिळेल. या चित्रपटाला साई पियुष यांचे संगीत लाभले आहे.( Gulabi Marathi Movie 2024 )  नुकत्याच प्रदर्शित झालेल्या व्हिडीओमध्ये  श्रुती मराठे, अश्विनी भावे, मृणाल कुलकर्णी  एकमेकींना फोन करून भेटण्याची तारीख ठरवत आहेत. शेवटी भेटण्याची तारीख  २२ नोव्हेंबर  ठरली असून या तारखेला प्रेक्षकांनाही ‘ गुलाबी ‘ चित्रपटगृहात पाहाता येईल. विचार, वागणूक, स्वप्ने आणि नाती असा गुलाबी प्रवास या चित्रपटातून प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. चित्रपटाच्या पोस्टरवरुन आणि नावावरुन हा सिनेमा तीन मैत्रिणींची कथा सांगणारा दिसत असला तरी पण तिघींची पार्श्वभूमी मात्र

‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ च्या चित्रीकरणाचा झाला शुभारंभ; संपूर्ण स्टारकास्ट ही आली समोर

Image
काही दिवसांपूर्वी  अंकुश चौधरी  दिग्दर्शित ‘ पुन्हा एकदा साडे माडे तीन ’ या चित्रपटाची सोशल मीडियावर घोषणा करण्यात आली होती. सतरा वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील कुरळे ब्रदर्सने अवघ्या महाराष्ट्राला आपलेसे केले. आता पुन्हा एकदा हे  कुरळे ब्रदर्स  धमाका करायला येणार असून नुकताच ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’च्या चित्रीकरणाचा शुभारंभ झाला आहे. या चित्रपटात  अशोक सराफ, भरत जाधव आणि मकरंद अनासपुरे  यांच्यासह कोण झळकणार याची सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिली होती.( Punha Ekda Sade Made teen Marathi Movie )  Bollywood tadka. हे सरप्राईजही आता समोर आले असून यात  सिद्धार्थ जाधव, रिंकू राजगुरू आणि संकेत पाठक  ही प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. ‘ पुन्हा एकदा साडे माडे तीन’  मधील ही तगडी स्टारकास्ट पाहाता हा सिनेमा पुन्हा एकदा बॅाक्स ॲाफिस गाजवणार, हे नक्की ! संजय जाधव या चित्रपटाचे छायाचित्रण करणार आहेत.  अमेय विनोद खोपकर पिक्चर्स , उदाहरणार्थ निर्मित, न्युक्लिअर पिक्चर्स प्रस्तुत या चित्रपटाचे सुधीर कोलते, ओंकार सुषमा माने, स्वाती खोपकर निर्माते असून निनाद नंदकुमार बत्तीन, वर्डविझर्ड एंट

आगळ्या नवरा-नवरीची वेगळी लव्हस्टोरी दाखवणारा ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ २० डिसेंबरला येणार भेटीला

Image
  शुभम फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत ‘ हॅशटॅग तदेव लग्नम्’  हा सिनेमा येत्या  २० डिसेंबर ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच सोशल मीडियावर या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले असून चित्रपटाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. हे पोस्टर पाहून प्रेक्षकांची उत्सुकता नक्कीच वाढली असेल. आजच्या काळातील ‘हॅशटॅग’ ही संकल्पना आणि लग्न यावर आधारित हा चित्रपट आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन, लेखन  आनंद दिलीप गोखले  यांनी केले असून या चित्रपटाचे निर्माते  शेखर विठ्ठल मते  आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच  सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान  हा जोडी सिनेमात एकत्र येणार आहे.( Hashtag Tadev Lagnam Marathi Movie )  Bollywood masala.  नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये लग्नाच्या वेषात घोड्यावर मुंडावळ्या बांधलेला नवरदेव दिसत आपल्याला आहे तर त्याच्यामागे ऑफिसच्या पेहरावात बसलेली नवरी ही दिसत आहे. त्यामुळे नक्की हा काय प्रकार आहे, असा प्रश्न पोस्टर पाहून प्रथमदर्शनी सगळ्याच्याच डोक्यात येतोय. यात लग्नकार्यातील धमाल तर आहेच. पण याशिवाय आजच्या काळातील  लग्न, पिढीचे विचारही  आपल्याला दिसणार आहेत तसेच दो

Phullwanti Teaser: देखण्या कलाविष्कारसह ‘फुलवंती’ चित्रपटाचा टिझर भेटील

Image
पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे  यांच्या लेखणीतून साकारलेली ‘ फुलवंती ‘ ही अलौकिक कलाकृती चित्रपटरुपात आपल्यासमोर ११ ऑक्टोबरला अवतरणार आहे. त्याआधी चित्रपटाचा देखणा  टीझर  प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चित्रपटाचे अप्रतिम सेट्स, उच्च तांत्रिकमूल्ये, दमदार ऐतिहासिक व्यक्तिरेखा त्याला तेवढ्याच धारदार संवादाची सोबत अशा भव्यतेने येणारा ‘ फुलवंती ’ हा देखणा चित्रपट रसिकांसाठी मनोरंजनाची अपूर्व पर्वणी ठरणार आहे. पेशवाई काळातील ‘ फुलवंती ’ नावाची सुप्रसिद्ध नर्तिका आणि प्रकांडपंडीत व्यंकटशास्त्री यांची दमदार कथा असलेली आणि देखण्या कलाविष्काराने सजलेली फुलवंती मराठी सिनेसृष्टीतील भव्यदिव्य, अविस्मरणीय कलाकृती ठरेल.( Phullwanti Marathi Movie Teaser ) Bollywood masala. पॅनोरमा स्टुडिओज सादर करत आहेत… ‘ फुलवंती ’ मंगेश पवार अँड कंपनी आणि शिवोऽहम् क्रिएशन्स प्रायव्हेट लिमिटेड निर्मित ही भव्य कलाकृती  ११ ऑक्टोबरला  रसिकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे संवाद लेखन  प्रविण विठ्ठल तरडे  यांचे असून दिग्दर्शन  स्नेहल प्रविण तरडे  करीत आहेत. चित्रपटाच्या छायाचित्रणाची जबाबदारी महेश लिमये यांनी सांभाळली आ

पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार अजय- अतुल यांच्या संगीताची जादू; ‘येक नंबर’चे पहिले प्रेमगीत प्रदर्शित

Image
  झी स्टुडिओ ज आणि नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट प्रस्तुत, सह्याद्री फिल्म्स निर्मित  ‘येक नंबर’  चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच प्रेक्षकांची उत्सुकता प्रचंड वाढवली आहे.  ‘ती’ करारी नजर, ‘तो’ कणखर आवाज  यांनी चित्रपटाबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले असतानाच आता या चित्रपटातील पहिलेवहिले  रोमँटिक गाणे  प्रदर्शित झाले आहे.  ‘जाहीर झालं जगाला…’  असे बोल असणारे हे प्रेमगीत धैर्य घोलप आणि सायली पाटीलवर चित्रित करण्यात आले आहे. या गाण्याचे बोल जितके भावपूर्ण आहेत तितकेच या गाण्याचे सादरीकरणही अप्रतिम आहे. गुरु ठाकूर यांच्या लेखणीतून साकारलेल्या या गाण्याला  श्रेया घोषाल  आणि  अजय गोगावले  यांनी आपल्या गायकीने चारचांद लावले आहेत.  अजय -अतुल  यांनी संगीतबद्ध केलेल्या या जबरदस्त गाण्याला स्टॅनली डिकोस्टा यांचे नृत्य दिग्दर्शन लाभले आहे. तेजस्विनी पंडित, वरदा साजिद नाडियाडवाला, बवेश जानवलेकर ‘येक नंबर’ चित्रपटाचे निर्माते आहेत.( Yek Number Marathi Movie  ) Bollywood Masala. चित्रपटाची घोषणा, पोस्टर, टिझर पाहाता हा एक  ॲक्शनपट  असल्याचा अंदाज आतापर्यंत प्रेक्षकांना आला असेलच. परंतु नुकत्याच प्रदर्श

Phullwanti Marathi Movie: कलाकारांच्या अदाकारीने बहरणार ‘फुलवंती’

Image
मराठी चित्रपट त्याच्या आशयासोबतच त्याच्या उच्चनिर्मितीमूल्यांसाठी सुद्धा लोकप्रिय आहे. अभिनयसंपन्न कलाकारांची मोठी फौज आज मराठीत कार्यरत आहे. अनेक चित्रपटातून आपल्याला त्यांच्या अभिनय सामर्थ्याची चुणूक पहायला मिळतेय. ‘ फुलवंती ’ या आगामी मराठी चित्रपटात अनेक बड्या कलाकारांना एकत्र पाहण्याची संधी मिळणार आहे. ‘ फुलवंती ’ च्या रूपात अभिनेत्री प्राजक्ता माळीचा लूक समोर आल्यानंतर या चित्रपटातील इतर कलाकारही समोर आले आहेत. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर झळकले असून  प्राजक्ता माळी आणि गश्मीर महाजनी  यांच्यासोबत प्रसाद ओक, ऋषिकेश जोशी, स्नेहल तरडे, वैभव मांगले यांच्यासह मराठीतले अनेक कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत. पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या लेखणीतून उतरलेली ‘ फुलवंती ’ कादंबरी चित्रपटरूपात  ११ ऑक्टोबरला  आपल्यासमोर येणार आहे.( Phullwanti Marathi Movie   2024 ) Bollywood tadka . ‘फुलवंती’ चित्रपटासाठी अनेक कलाकारांचं एकत्र येणं ही प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे. विनोदी भूमिकांसोबतच धीरगंभीर भूमिकाही ताकदीने साकारत सर्व माध्यमांवर हुकूमत गाजवण्याचं कौशल्य असणारे  अभिनेते