‘भूमिकन्या – साद घालते निसर्गराजा’ मालिकेत गौरव घाटणेकर दिसणार प्रमुख भूमिकेत
निरनिराळे विषय आणि रंजक मालिका घेऊन सोनी मराठी वाहिनी नेहमीच प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. त्यांतील आगळेवेगळे विषय प्रेक्षकांना नेहमीच आवडतात. मालिकेतील काही व्यक्तिरेखा कायमच प्रेक्षकांच्या मनात घर करून राहतात. अशीच एक नवी मालिका सोनी मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन येते आहे. ‘ भूमिकन्या – साद घालते निसर्गराजा ‘ असे या मालिकेचे नाव असून ही मालिका प्रेक्षकांना १० जूनपासून सोनी मराठी वाहिनीवर पाहता येणार आहे. मालिकेचा विषय फार नवीन आणि वेगळा आहे. आपल्या शेतकरी वडिलांना ही भूमिकन्या कशी साथ देणार, हे या मालिकेतून पाहायला मिळणार आहे. ‘ भूमिकन्या – साद घालते निसर्गराजा ’ मालिकेची झलक प्रेक्षकांना विशेष आवडली आणि त्यामुळे या मालिकेची सर्वत्र चर्चा पाहायला मिळते आहे. मालिकेचे प्रमुख आकर्षण म्हणजे या मालिकेतून गौरव घाटणेकर प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहे.( Actor Gaurav Ghatnekar ) प्रेक्षकांचा लाडका अभिनेता गौरव घाटणेकर या मालिकेत प्रमुख भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहे. हर्षवर्धन असे त्याच्या व्यक्तिरेखेचे नाव असून गौरव या मालिकेत...