Sonali Kulkarni: “सध्या नाटक वर्सेस सिनेमा युद्ध सुरु झालंय”
२०२५ हे वर्ष मराठी चित्रपटांसाठी फार खास आहे असं नक्कीच दिसतंय… ‘गुलकंद’, ‘आता थांबायचं नाय’, ‘जारण’ हे चित्रपट प्रेक्षकांच्या उत्तम प्रतिसादासह बॉक्स ऑफिसवरही छान कमाई करत आहेत… वेगळे विषय आणि आशय प्रेक्षकांसमोर मांडताना मराठी मातीतला तो रांगडेपणा पुन्हा एकदा मराठी चित्रपटांमध्ये दिसतोय.. मात्र, काही दिवसांपूर्वी रिलीज झालेला प्रसाद ओक दिग्दर्शित ‘सुशीला-सुजीत’ चित्रपट प्रेक्षकांच्या फारसा पथ्याला पडला नाही… आता चित्रपटातील नायिकेनेच चित्रपट का चालला नाही यावर उत्तर दिलं आहे…(Marathi Movies 2025) Latest Marathi Movies प्रसाद ओक दिग्दर्शित ‘सुशीला सुजीत’ या चित्रपटात स्वप्नील जोशी आणि सोनाली कुलकर्णी हे दोघे मुख्य भूमिकेत होते. दोन अनोळखी माणसं एकाच घरात एका खोलीत बंद होतात आणि त्यानंतर दोघांच्या वैयक्तिक जीवनात काय घडामोडी घडतात असं चित्रपटाचं कथानक… पण हा चित्रपट चालला नाही… प्रेक्षकांना अपेक्षेपेक्षा बोल्डपणा चित्रपटात दाखवला असं वाटलं… आता चित्रपट का चालला नाही याबद्दल सोनालीने तिचे मत व्यक्त केलं आहे. अमोल परचुरेंच्या कॅचअपमध्ये याबद्दल बोलताना सोनाली म्हणाली की, “‘सुशीला स...