Sayaji Shinde यांचा ऑल इज वेल चित्रपटात हटके अंदाज!

 

मराठीसह हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटवणारे अभिनेते सयाजी शिंदे पुन्हा एकदा हटके अंदाजात दिसणार आहेत. आगामी ऑल इज वेल या चित्रपटात सयाजी शिंदे भाईगिरी करताना दिसणार आहेत. मराठी भाषा वळवावी तशी वळते, असं म्हणतात. मराठी भाषेचा गोडवा हा जितका शब्दांत असतो तितकाच तो माणसाच्या स्वभावातही असतो. आपल्या भाषेचा आणि स्वभावाचा हाच गोडवा सयाजी या चित्रपटात सादर करणार आहेत. Bollywood Masala

ऑल इज वेल या चित्रपटात सयाजी शिंदे ‘आप्पा’ या भूमिकत दिसणार आहेत. हा भाई शुद्ध मराठीत बोलत अनेकांची विकेट काढताना दिसणार आहे. त्यांच्या या मराठी बोलण्याने काय धमाल उडते याची सगळी गंमत चित्रपटात रंगत आणणार आहे. ‘ऑल इज वेल’ चित्रपटाचे दिग्दर्शन योगेश जाधव तर लेखन प्रियदर्शन जाधव यांनी केले आहे.

आपल्या भूमिकेबद्दल सयाजी शिंदे म्हणतात, ‘आप्पा ही भाईगिरी करणाऱ्या डॉनची व्यक्तिरेखा असली तरी त्यात काहीतरी वेगळेपणा आणि रंगत आणावी या उद्देशाने आमच्या लेखक-दिग्दर्शकांनी शुद्ध मराठी भाषेची गंमत त्या व्यक्तिरेखेसाठी वापरली आहे. शुद्ध मराठी भाषेच्या गोडव्यामुळे ही व्यक्तिरेखा आणि त्यातली गंमत खुलली आहे. Entertainment Mix Masala

================================

हे देखील वाचा: Special Ops 2 : हिम्मत सिंग ‘स्पेशल ऑप्स सीझन २’मध्ये कुणाशी भिडणार?

=================================

ऑल इज वेल मध्ये अमर,अकबर, आणि अँथनी या तीन मित्रांच्या अतूट मैत्रीची धमाल गोष्ट दाखवली आहे. चित्रपटात प्रियदर्शन जाधव, अभिनय बेर्डे, रोहित हळदीकर, अभिजीत चव्हाण, नक्षत्रा मेढेकर, सायली फाटक, माधव वझे, अजय जाधव, अमायरा गोस्वामी, दिशा काटकर आदि कलाकारांच्या भूमिका या चित्रपटात आहेत. Bollywood Tadka

Original content is posted on https://kalakrutimedia.com/sayaji-shinde-in-all-is-well-marathi-movie/

Comments

Popular posts from this blog

Diljit Dosanjh पंजाब इंडस्ट्री गाजवणारा दिलजीत दोसांझ ‘असा’ बनला बॉलिवूडमधील टॉपचा अभिनेता

Oscar 2025 : कुठे पाहाल ऑस्कर सोहळा? ‘या’ भारतीय चित्रपटांकडे लागलंय लक्ष

Preamachi Gosht 2: प्रेमाचा इफेक्ट असणारी, मनातली स्पेशल गोष्ट; ’प्रेमाची गोष्ट २’ जून २०२५ मध्ये होणार प्रदर्शित