Posts

Showing posts from June, 2024

कार्तिक आर्यनच्या Chandu Champion पहिल्या दिवशी केली ‘एवढ्या’ कोटींची कमाई

Image
कबीर खान दिग्दर्शित  आणि  कार्तिक आर्यन  अभिनीत  ‘चंदू चॅम्पियन’  हा स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट गेल्या काही काळापासून चर्चेत होता. या चित्रपटासाठी अभिनेत्याने खूप मेहनत घेतली असून चित्रपटाचा ट्रेलर आणि पोस्टर रिलीज झाल्यानंतर  ‘चंदू चॅम्पियन’ सिनेमासाठी  चाहत्यांची उत्सुकती शिखरावर पोहोचली होती. अखेर हा चित्रपट १४ जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कशी कमाई करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ‘चंदू चॅम्पियन’ने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी किती कोटींचा गल्ला जमवला हे आज या लेखाच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया. ( Chandu Champion Box Office Collection ) कार्तिक आर्यनस्टारर  ‘चंदू चॅम्पियन’ने  बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात केली आहे. सुरुवातीचा अंदाज आणि एडवांस  बुकिंगनुसार चित्रपटाने पहिल्या दिवशी खूप चांगले कलेक्शन केले आहे. या चित्रपटाने जवळपास  4.75 कोटी  रुपयांचा गल्ला जमवला आहे. यामुळे निर्मात्यांना नक्कीच आनंद झाला असेल यात शंका नाही. फिल्म ट्रेड अॅनालिस्ट साइट सकनिल्कने दिलेल्या माहितीनुसार,  14 जून  रोजी रिलीज झालेल्या चंदू चॅम्पियनला 16.84 ट

अखेर ठरलं! ‘मिर्झापूर ३’चा ट्रेलर ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

Image
  ‘ मिर्झापूर ३’  ही २०२४ सालची मोस्ट अवेटेड सीरिज आहे. नुकताच निर्मात्यांनी या मालिकेच्या प्रदर्शनाच्या तारखेसह टीझर रिलीज केला. त्याचबरोबर चाहतेही या  क्राइम-थ्रिलर च्या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत आहेत. अखेर निर्मात्यांनी ‘ मिर्झापूर ३’ च्या ट्रेलरच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली आहे.  मिर्झापूर 3  या वेब सीरिजबाबत सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.  अली फजल आणि पंकज त्रिपाठी  सारख्या कलाकारांनी सजलेल्या या मालिकेची रिलीज डेट नुकतीच फायनल झाली असून आता  मिर्झापूर 3  च्या ट्रेलरबाबत एक मोठं अपडेट समोर आलं आहे. चला तर मग जाणून घेऊया तिसऱ्या सीझनची पहिली झलक आपल्याला कधी पाहायला मिळणार आहे. ( Mirzapur 3 Trailer ) मिर्झापूर  ही वेब सीरिज पाहण्यासाठी चाहते खूप आतुर झालेले आहेत. पहिल्या दोन सीझनमध्ये या सीरिजने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले असून आता त्याचा तिसरा सीझन येणार आहे. नुकतीच  मिर्झापूर सीझन 3  च्या प्रदर्शनाची तारीख लॉक करण्यात आली आहे. आणि आता त्याच्या ट्रेलरबद्दल लेटेस्ट अपडेट समोर आले आहे. निर्मात्यांकडून मिर्झापूर 3 च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर होताच सर्वजण त्याच्या ट्रेलरची व

Priyanka Chopra च्या मानेला झाली गंभीर दुखापत, हॉलिवूड चित्रपटाच्या शुट दरम्याव घडला अपघात

Image
  हिंदी सिनेमापासून हॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी  अभिनेत्री प्रियांका चोप्रा ला कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. प्रियांकाच्या चाहत्यांची संख्या खूप जास्त आहे. पण सध्या जी बातमी येत आहे ती तिच्या चाहत्यांसाठी चिंतेचा विषय ठरू शकते. चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अभिनेत्री जखमी झाली आहे आणि तिच्या मानेला दुखापत झाली आहे. याचा एक फोटो ही अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. हॉलिवूड चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान  अभिनेत्री प्रियांका चोप्रा  जखमी झाली आहे. हॉलिवूड चित्रपट  ‘द ब्लफ’च्या  चित्रीकरणादरम्यान प्रियांका चोप्राला ही दुखापत झाली आहे.( Priyanka Chopra injures ) अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीजमध्ये या दुखापतीचा फोटो पोस्ट केला आहे. प्रियांका चोप्राची हा फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांनाही तिची चिंता व्यक्त केली आहे. प्रियांका चोप्राने तिच्या  अधिकृत इन्स्टाग्राम  हँडलवर स्टोरीमधील एक लेटेस्ट फोटो शेअर केला आहे. या फोटोत तुम्ही पाहू शकता की त्याच्या गळ्यावरील जखमेची लाल खूण स्पष्ट दिसत आहे. कॅप्शनमध्ये तिने लिहिले आहे की. ‘आणि हा माझ्या प्रोफेशनल कामाचा मोठा

चित्रपटगृहात धुमाकूळ घातल्यानंतर ‘मुंज्या’ ओटीटी वर येण्यास सज्ज; जाणून घ्या कुठे आणि कधी पाहू शकाल

Image
  हॉरर कॉमेडी  सिनेमे सध्या प्रेक्षकांची पहिली पसंती बनले आहेत.  स्त्री, भूल भुलैया 2  आणि  रूही  सारख्या चित्रपटांनंतर आता  मुंज्या  सिनेमानेही चाहत्यांची मने जिंकली आहेत.  निर्माते दिनेश विजान  यांनी हॉरर कॉमेडी बनवण्यात आपल्याकडे खूप कौशल्य आहे हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. आणि म्हणूनटच एका हॉरर कॉमेडी चित्रपट ‘मुंज्या’ प्रेक्षकांची मने जिंकण्यात यशस्वी झाला आहे. हा चित्रपट चित्रपटगृहात धुमाकूळ घालत असून त्याबद्दल सकारात्मक प्रतिक्रियाही समोर आल्या आहेत. दरम्यान, मुंज्याच्या ओटीटी रिलीजच्या चर्चेला वेग आला आहे. कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर मुंज्या स्ट्रीम होणार आहे आणि कधी होणार आहे ते आज आपण जाणून घेऊयात.( Munjya OTT Release ) चित्रपटगृहांमध्ये  मुंज्याचे भूत  धुमाकूळ घालत असून चित्रपट यशाच्या दिशेने वाटचाल करत आहे. थिएटरनंतर कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर मुंज्या ऑनलाइन रिलीज होणार, असा प्रश्नही सर्वांच्या मनात निर्माण होत आहे. आधुनिक युगात ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट प्रदर्शित करण्याचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात वाढला आहे. चित्रपटगृहानंतर काही दिवसांतच चित्रपट ओटीटीवर येतात आणि प्रदर्शनापू

कलर्स मराठीवरील सावित्रींनी एकत्र येत केली ‘वटपौर्णिमा’ साजरी…

Image
  वटपौर्णिमा   हा हिंदू संस्कृतीतील एक महत्वाचा सण मानला जातो. या दिवशी महिलांनी वटवृक्षाची पूजा केल्यास नवऱ्याची आयु वाढते, असे मानले जाते. कलर्स मराठी नेहमीच आपल्या प्रेक्षकांना उत्तम गुणवत्ता असलेल्या मालिका भेट देत असून नेहमीच रसिकांचे मनोरंजन करत आली आहे. ही वाहिनी नेहमीच रसिकांसाठी काहीतरी हटके घेऊन येत असते. हीच परंपरा आपल्या लाडक्या कलर्स मराठीने देखील जोपासली असून नुकताच कलर्स मराठीच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर  वटपौर्णिमाचा खास व्हिडिओ  प्रदर्शित करण्यात आला आहे. हा व्हिडिओ तुम्ही इंस्टाग्राम, यूट्यूब आणि फेसबुकवर पाहू शकता.( Colors Marathi Vatpornima Special Video) या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, ‘ इंद्रायणी ‘ या मालिकेमधून शकुंतला वडाच्या झाडाला कुंकू लावतेय, तर झाडामागून ‘ अंतरपाट ‘ मालिकेतील गौतमी हातात धागा घेऊन क्षितिजसोबत सुरु होणाऱ्या नव्या संसाराचे सुख मागत आहे. दुसरीकडे ‘ अबीर गुलाल ‘ मालिकेतील श्रीची आई वडाच्या झाडामागून येताना दिसत असून ‘रमा -राघव’ मालिकेतून रमा कुटुंब जोडताना मिळणारी राघवची अतूट साथ सात जन्म राहू देत असे म्हणत आहे. ‘ पिरतीचा वनवा उरी पेटला  ‘

‘तिकळी’ला तिच्या अस्तित्वासह स्वीकारेल असा मुलगा कोण असेल?

Image
सन मराठी वाहिनी ही एकापेक्षा एक हटके विषय आपल्या प्रेक्षकवर्गासाठी घेऊन येतच असते त्यातच आता   सन मराठी वाहिनी   काहीतरी नवं करू पाहते.कौटुंबिक गोष्ट, सासू सुनेची कथा, प्रेमकथा, या सगळ्या विषयातून प्रेक्षकांचे मनोरंजन करतच असते, पण यंदा सन मराठी वाहिनीने एका वेगळ्या विषयात हाथ घातला आहे. सन मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी मालिकेच्या रूपात एक नवी आणि थरारक कथा घेऊन आले आहेत त्यात या मालिकेच्या प्रोमो ने प्रेक्षकांमध्ये एक वेगळ कुतूहल निर्माण केलं आहे.   तिकळी   या मालिकेचा जबरदस्त प्रोमो लोक इतकं भरभरून प्रेम देत आहेत, अगदी झपाट्याने हा टिझर वायरल होत असताना लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया कॉमेंट्सद्वारे आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिकळी या मालिकेचा प्रोमो आऊट झाल्या झाल्या प्रेक्षकांचे या मालिकेप्रती एक वेगळीच उत्सुकता दिसून येत आहेत. ( Tikali Marathi serial )   प्रेक्षकांना नेहमी काहीतरी नवं हवंच असतं त्यात आता ही  तिकळी  कोण ? हिचं रहस्य काय, जीच्यासोबत गावकरी दोन हाथ लांब राहतात, जीचं आयुष्यात असणं म्हणजे आयुष्य बर्बाद होणे, तिकळीला दिसणारी ती व्यक्ती कोण, व त्या व्यक्तीचं नेमकं रहस्य

Abdu Rozik चे लग्न 7 जुलैला होणार नाही; करियरमुळे गायकाने घेतला मोठा निर्णय

Image
  अब्दू रोझिक   हा एक प्रसिद्ध सोशल मीडिया स्टार आणि गायक आहे. तो ताजिक गायकही आहेत. टीव्ही रिअॅलिटी शो ‘ बिग बॉस’ मधून चर्चेत आलेला गायक अब्दू रोजिकने तरुण वयातच कोट्यवधींची कमाई केली आहे. अब्दू रोजिक सलमान खानच्या ‘ बिग बॉस १६ ‘ या शोमध्येही सहभागी झाला होता. या शोमुळे त्याने भारतीय प्रेक्षकांच्या मनात त्याने खास स्थान निर्माण केले आहे. त्यांच्याविषयीचे प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते नेहमी आतुर असतात. नुकतेच अब्दूने सांगितले होते की, त्याचे लग्न ठरले आहे आणि तो ७ जुलै रोजी आपल्या प्रेयसीशी लग्न करणार आहे. मात्र, आता त्यांचे लग्न पुढे ढकलण्यात आल्याचे वृत्त समोर येत आहे.( Abdu Rozik Wedding Postponed) अब्दू रोजिक चे ७ जुलै रोजी लग्न होणार होते. पण आता  बिग बॉस 16  फेम गायकाने आपल्या लग्नाची तारीख पुढे ढकलण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. याचे कारण म्हणजे त्याचे करियर. दुबईतील कोका कोला एरिना येथे ६ जुलै रोजी होणाऱ्या बॉक्सिंग च्या लढतीत अब्दू रोझिकला बॉक्सिंग फाइट ऑफर देण्यात आली आहे. यामुळे त्याने आपल्या लग्नाची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती त्याने ई टाइम्स

वेगळ्या धाटणीचे सिनेमे करत प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा दिग्दर्शक प्रीतम एसके पाटील…

Image
  मराठी चित्रपटांचा कॅनव्हास निश्चित मोठा झाला आहे. अलीकडच्या मराठी चित्रपटांकडे नजर टाकली तर त्यामागे अनेक तरुण चेहरे आहेत. मराठीत जे  तरुण दिग्दर्शक  येत आहेत ते नव्या तंत्रात, नव्या शैलीत कलाकृती सादर करत आपली क्षमता दाखवून देतायेत. वेगवेगळ्या शॉर्ट फिल्म्स, वेबसिरीज तसेच  खिचिक ,  डॉक्टर डॉक्टर, ढिशक्यांव  यासारख्या मराठी चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे  युवा दिग्दर्शक प्रीतम एस के पाटील  यांनी असाच वेगळा प्रयत्न करीत रसिकांसाठी  ‘अल्याड पल्याड’  हा रहस्यमय थरारपट आणला आहे. १४ जूनला हा चित्रपट राज्यभर प्रदर्शित होत आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काहीतरी वेगळं करण्याच्या उद्देशाने प्रीतम एस के पाटील चमचमत्या चंदेरी, स्वप्नील दुनियेत पाऊल ठेवलं.( Director Pritam S K Patil ) या क्षेत्रातल्या प्रवासाच्या सुरुवातीच्या टप्प्यात त्यांनी अनेक गोष्टी शिकून घेतल्या. त्यांच्यातली क्षमता आणि काहीतरी नवीन करून दाखवण्याचा ध्यास यामुळे त्यांना नवं क्षितिजं खुणावत होतं, यातूनच दिग्दर्शनाची वाट त्यांना गवसली.  ‘अल्याड पल्याड’  या चित्रपटाबाबत बोलताना  दिग्दर्शक प्रीतम एस के पाटील  सांगतात कि, मला एक गोष

‘तू भेटशी नव्याने’ मालिकेचा मुहूर्त पडला पार; चित्रीकरणाला झाली दणक्यात सुरुवात

Image
  ‘ तू भेटशी नव्याने ‘   मालिकेची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मालिका कधीपासून भेटीला येणार याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये रंगली आहे. मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून मालिकेचं चित्रीकरण सुरू झाल्याची बातमी समोर येते आहे. सोनी मराठी वाहिनीने ‘ तू भेटशी नव्याने’  मालिकेचं चित्रीकरण सुरू केलं आहे. मालिकेच्या सेटवर चित्रीकरणाची सुरुवात करत मुहूर्त पार पडला. मुहूर्ताची पूजा करत मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली. मालिकेच्या चित्रकरणाचा हा पहिला दिवस आणि मुहूर्त शूट च्या वेळी  अभिनेत्री शिवानी सोनार  आणि अन्य कलाकार आणि तंत्रज्ञान उपस्थित होते. सोबतच मालिकेशी जोडले गेलेले अन्य कलाकार आणि तंत्रज्ञ यांचीही उपस्थिती होती.( Tu Bhetashi Navyane Serial ) मालिकेचे  दिग्दर्शक आणि निर्माते अजय मयेक र यांनी सेटवर मालिकेच्या मुहूर्त निमित्त पूजा देखील केली. चित्रीकरणाला सुरुवात झाली म्हणजेच मालिका आता लवकरात लवकर आपल्या भेटीला येणार यात काही शंका नाही. मुहूर्ताची छायाचित्रे कलाकारांनी आपल्या सोशल मिडियावर शेअर करत नवी सुरुवात झाल्याचे सांगितले आहे. मुहूर्ताच्या वेळी सोनी मराठी वाहि

‘Kalki 2898 AD’ संदर्भात मोठी अपडेट आली समोर, या दिवशी प्रदर्शित होणार चित्रपटाचा ट्रेलर

Image
  ‘ कल्कि 2898 एडी ‘ ची देशभरात जोरदार देशभरात जोरदार चर्चा सुरू आहे. हा असा चित्रपट आहे ज्याची देशभरातील प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.  नाग अश्विन दिग्दर्शित  हा चित्रपट सायन्स फिक्शन आणि भारतीय पौराणिक कथांचा अप्रतिम मिलाफ असणार आहे. या चित्रपटात अनेक बडे कलाकार एकत्र दिसणार आहेत. चित्रपटाविषयी सातत्याने नवनवीन माहिती समोर येत आहे. आता या चित्रपटाच्या ट्रेलरबाबत एक मोठं अपडेट समोर आलं आहे.( Kalki 2898 AD Trailer ) हा आतापर्यंतचा सर्वात महागडा भारतीय चित्रपट आहे. या चित्रपटावर जवळपास  600 कोटी रुपये  खर्च करण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाबाबत सातत्याने नवनवीन बातम्या समोर येत होत्या. प्रत्येक बातमीबरोबर प्रेक्षकांची उत्सुकता वाढत आहे. आता त्याच्या निर्मात्यांनी चित्रपटाच्या ट्रेलर रिलीज डेटवरील पडदा हटवला आहे. निर्मात्यांनी 3 जून रोजी सोशल मीडियावर एक पोस्टर जारी करून ट्रेलरच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. रिलीज झालेल्या नव्या पोस्टरनुसार या चित्रपटाचा ट्रेलर  10 जून 2024  रोजी रिलीज होणार आहे. गेल्या काही काळापासून चित्रपटाचे निर्माते सातत्याने नवनवीन पद