अखेर ठरलं! ‘मिर्झापूर ३’चा ट्रेलर ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

 


मिर्झापूर ३’ ही २०२४ सालची मोस्ट अवेटेड सीरिज आहे. नुकताच निर्मात्यांनी या मालिकेच्या प्रदर्शनाच्या तारखेसह टीझर रिलीज केला. त्याचबरोबर चाहतेही या क्राइम-थ्रिलरच्या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत आहेत. अखेर निर्मात्यांनी ‘मिर्झापूर ३’च्या ट्रेलरच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली आहे. मिर्झापूर 3 या वेब सीरिजबाबत सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. अली फजल आणि पंकज त्रिपाठी सारख्या कलाकारांनी सजलेल्या या मालिकेची रिलीज डेट नुकतीच फायनल झाली असून आता मिर्झापूर 3 च्या ट्रेलरबाबत एक मोठं अपडेट समोर आलं आहे. चला तर मग जाणून घेऊया तिसऱ्या सीझनची पहिली झलक आपल्याला कधी पाहायला मिळणार आहे. (Mirzapur 3 Trailer)

Mirzapur 3 Trailer

मिर्झापूर ही वेब सीरिज पाहण्यासाठी चाहते खूप आतुर झालेले आहेत. पहिल्या दोन सीझनमध्ये या सीरिजने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले असून आता त्याचा तिसरा सीझन येणार आहे. नुकतीच मिर्झापूर सीझन 3 च्या प्रदर्शनाची तारीख लॉक करण्यात आली आहे. आणि आता त्याच्या ट्रेलरबद्दल लेटेस्ट अपडेट समोर आले आहे. निर्मात्यांकडून मिर्झापूर 3 च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर होताच सर्वजण त्याच्या ट्रेलरची वाट पाहू लागले. आता सीरिजच्या ट्रेलरची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. मिर्झापूर सीझन 3 च्या ट्रेलरची रिलीज डेट मंगळवारी जाहीर करण्यात आली आहे.

Mirzapur 3 Trailer

पंकज त्रिपाठी आणि अली फजल यांची मालिका मिर्झापूर 3 या जुलै 2024 मध्ये अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर रिलीज होणार आहे. निर्मात्यांनी नुकताच स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर मालिकेचा टीझर रिलीज केला, प्राइम व्हिडिओने आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर मालिकेच्या बहुप्रतीक्षित ट्रेलरच्या अधिकृत प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. निर्मात्यांनी मिर्झापूर 3 च्या स्टारकास्टसह एक नवीन पोस्टर रिलीज केले आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “छल कपट, शह-मात, मिलेगी एक झलक, इस गद्दी के खेल की.” मिर्झापूर सीझन 3 चा ट्रेलर 20 जून रोजी रिलीज होत आहे.(Mirzapur 3 Trailer)

===============================

हे देखील वाचा: दिल्लीची व्हायरल वडापाव गर्ल चंद्रिका दिक्षितची Big Boss Ott 3 मध्ये होणार एन्ट्री! प्रोमो झाला व्हायरल

===============================

मिर्झापूरचा पहिला सीझन 2018 मध्ये आला होता. आणि दुसरा सीझन 2020 मध्ये आला होता. दोन्ही सीझनला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. आता सीझन 3 बद्दलही खूप अपेक्षा वाढल्या आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टीझरमधून मालिकेची झलक पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मागील सीझनप्रमाणे यंदाही मिर्झापूर वेब सीरिजमध्ये फिल्म स्टार्सची कमतरता नाही. रशिका दुग्गल, पंकज त्रिपाठी, अली फजल, विजय वर्मा, श्वेता त्रिपाठी, ईशा तलवार आणि अभिमन्यू शर्मा हे कलाकार तिसऱ्या सीझनमध्ये दिसणार आहेत. मिर्झापूर 3 ही सिरीज 5 जुलैला अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे.

Original content is posted on: https://kalakrutimedia.com/finally-decided-mirzapur-3-trailer-to-be-released-on-this-day-info/

Comments

Popular posts from this blog

'Zimma 2' re-opens old relationship

Bitti' aka Aarambi Ubale in 'Saavali Hoin Sukhachi' is a 'one take artiste'

The presence of the Vice President at the premiere of Guru Dutt's film