शहीद विजय साळसकरांच्या जीवनावर चित्रपट येणार; Shraddha Kapoor दिसणार ‘या’ भूमिकेत
बॉलिवूडमधील मराठमोळी अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) तिच्या आगामी बऱ्याच चित्रपटांमुळे चर्चेत आहे… स्त्री चित्रपटामुळे खऱ्या अर्थातन बॉलिवूडमध्ये आपलं स्थान बळकट करणाऱ्या श्रद्धाची पर्सनल लाईफही लोकांच्या नजरेत असते… असंही म्हटलं जातंय की श्रद्धा कपूर लेखक-निर्माता राहूल मोदी (Rahul Mody) याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे… बऱ्याचदा दोघांना डिनर किंवा आऊटिंगला एकत्र पाहिलं असल्यामुळे या चर्चा रंगल्या आहेत… अशातच श्रद्धाने लवकरच ती राहूलसोबत आगामी चित्रपटात सोबत काम करणार असल्याचं जाहिर केल्यामुळे तिच्या चाहत्यांच्या भूवया उंचावल्या आहेत… जाणून घेऊयात श्रद्धाच्या आगामी चित्रपटांबद्दल…. (Entertainment News) Bollywood Masala गेल्या काही दिवसांपासून श्रद्धा कपूर लावणीसम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या बायोपिकमध्ये झळकणार असल्याचं सांगितलं जात होतं… आता श्रद्धानेच याचं उत्तर दिलं आहे… सोशल मिडियावर प्रश्नोत्तरांच्या सेगमेंटमध्ये तिच्या आगामी चित्रपटांबद्दल तिला विचारलं असता श्रद्धा म्हणाली की, “सध्या मी एका चित्रपटाचं शुटींग करतेय आणि त्याची ऑफिशिअल अनाउन्समेंट लवकरच होण...