शहीद विजय साळसकरांच्या जीवनावर चित्रपट येणार; Shraddha Kapoor दिसणार ‘या’ भूमिकेत
बॉलिवूडमधील मराठमोळी अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) तिच्या आगामी बऱ्याच चित्रपटांमुळे चर्चेत आहे… स्त्री चित्रपटामुळे खऱ्या अर्थातन बॉलिवूडमध्ये आपलं स्थान बळकट करणाऱ्या श्रद्धाची पर्सनल लाईफही लोकांच्या नजरेत असते… असंही म्हटलं जातंय की श्रद्धा कपूर लेखक-निर्माता राहूल मोदी (Rahul Mody) याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे… बऱ्याचदा दोघांना डिनर किंवा आऊटिंगला एकत्र पाहिलं असल्यामुळे या चर्चा रंगल्या आहेत… अशातच श्रद्धाने लवकरच ती राहूलसोबत आगामी चित्रपटात सोबत काम करणार असल्याचं जाहिर केल्यामुळे तिच्या चाहत्यांच्या भूवया उंचावल्या आहेत… जाणून घेऊयात श्रद्धाच्या आगामी चित्रपटांबद्दल…. (Entertainment News) Bollywood Masala
गेल्या काही दिवसांपासून श्रद्धा कपूर लावणीसम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या बायोपिकमध्ये झळकणार असल्याचं सांगितलं जात होतं… आता श्रद्धानेच याचं उत्तर दिलं आहे… सोशल मिडियावर प्रश्नोत्तरांच्या सेगमेंटमध्ये तिच्या आगामी चित्रपटांबद्दल तिला विचारलं असता श्रद्धा म्हणाली की, “सध्या मी एका चित्रपटाचं शुटींग करतेय आणि त्याची ऑफिशिअल अनाउन्समेंट लवकरच होणार आहे त्यामुळे त्याबद्दल आता मी जास्त काही सांगू शकणार नाही”… परंतु, लक्ष्मण उतेकर (Laxman Utekar) दिग्दर्शित चित्रपटाच्याच शुटींगमध्ये श्रद्धा व्यस्त असल्याचा अंदाज तिच्या चाहत्यांना आला आहे यात शंका नाही…
पुढे या सेगमेंटमध्ये श्रद्धाने निर्माती म्हणून आगामी चित्रपटाबद्दल बोलताना असं म्हटलं की, “मी निर्माती म्हणून सुपर फॅट स्टुडिओसोबत दोन चित्रपटांची सह-निर्मिती करणार आहे. यापैकी एक चित्रपट २६/११ च्या हल्ल्यात शहीद झालेल्या धाडसी पोलीस अधिकारी विजय साळसकर यांच्या जीवनावर आधारित असेल… या चित्रपटाचं दिग्दर्शन अखिव अली करणार आहेत. आणि दुसरा चित्रपट राहूल मोदीचा असून त्याचं कथानक हे स्टार्टअप्सवर आधारित असणार आहे… (Upcoming Movies of Shraddha Kapoor)
================================
हे देखील वाचा : Shraddha Kapoor : बॉलिवूडमधला पहिला तमाशापट इतिहास रचणार?
================================
शिवाय ‘स्त्री ३’ (Stree 3) मध्ये श्रद्धा दिसणार आहेच… त्यामुळे येत्या काळात विविधांगी भूमिकेत श्रद्धा कपूर दिसणार यावर शिक्का बसला आहे… आणि यात आणखी एक मानाचा तुरा म्हणजे ‘झूटोपिया २’ (Zootopia 2) या ऍनिमेटेड चित्रपटात तिने एका कॅरेक्टरला हिंदी भाषेतील व्हर्जनमध्ये आवाज दिला आहे…. श्रद्धाने ज्या कॅरेक्टरला आवाज दिला आहे त्याचं नाव आहे ‘जूडी हॉप्स’ आणि हे पात्र जगभरात प्रचंड लोकप्रिय आहे…Bollywood Tadka
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi
Original content is posted on https://kalakrutimedia.com/shraddha-kapoor-confirms-next-film-with-boyfriend-rahul-mody-says-she-will-pick-roles-that-challenge-her-as-an-actor/
Comments
Post a Comment