“३१ डिसेंबरला मी पार्टी देणार आहे!”; Prasad Oakची मोठी घोषणा!
अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak) चित्रपट, मालिकांमधून महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचला… शिवाय, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून तो आपल्या भेटीला रोज येतोच… याच कार्यक्रमातील कलाकार कायमच त्याला प्रसाद ओक पार्टी कधी देणार? असा प्रश्न विचारत असतात… बऱ्याचदा कलाकारांनी आपल्या स्किट्समध्ये प्रसादला हा प्रश्न विचारुन लोकांना खळखळून हसवलं आहे… आता मात्र, स्वत:च प्रसाद ओकने तो लवकरच पार्टी देणार असल्याचं जाहिर केलं आहे… नेमकं काय म्हणाला आहे तो? (Maharashtrachi Hasyajatra) तर, प्रसाद ओकने सोशल मिडियावर एक पोस्ट केली आहे… यात त्याने पार्टी देणार असल्याची घोषणा केली आहे. त्याने त्याचा बॅकग्राऊंड असलेला एक रिल शेअर केला आहे. यात प्रसाद म्हणतो, ”३१ डिसेंबरला मी पार्टी देणार आहे. पत्ता पुढीलप्रमाणे…”. पुढे व्हिडीओत एक न्यूज अँकर दिसतो. तो काय बोलतो हे अजिबात कळत नाही. शेवटी ”नक्की या, वाट बघतोय” असं म्हणत प्रसाद हसण्याचे इमोजी शेअर करतो. प्रसादचा हा विनोदी व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. (Prasad Oak Social Media Post) Celebrity Interviews दरम्यान, प्रसादच्या या व्हिड...