Posts

Showing posts from February, 2026

Geetu Mohandas : ४ पुरुष दिग्दर्शकांना भिडणार १ स्त्री दिग्दर्शिका; भारतीय चित्रपटसृष्टीत येत्या काळात बदल घडणार?

  २०२५ हे वर्ष भारतीय चित्रपटसृष्टीने गाजवलं. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित  ‘छावा’  (Chhaava) चित्रपटाने २०२५ची जोरदार सुरुवात केली. ६०० कोटींचा टप्पा गाठत विकी कौशलच्या करिअरमधला हा बेस्ट चित्रपट ठरला. त्यानंतर ‘कांतारा २’, ‘रेड २’, ‘जॉली एल एल बी ३’ अशा हिंदी आणि साऊथ चित्रपटांनी प्रेक्षकांचं तुफान मनोरंजन केलं… पण एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का? या प्रत्येक चित्रपटात चर्चा झाली ती नायकाची आणि दिग्दर्शकांची… वर उल्लेख केलेल्या एकाही चित्रपटाचं दिग्दर्शन फिमेल डिरेक्टरने केलं नव्हतं… पण २०२६ हे वर्ष वेगळं ठरणार आहे… जानेवारीत राणी मुखर्जीची प्रमुख भूमिका असणारा  ‘मर्दानी ३’  (Mardaani 3) आधीच रिलीज होऊन त्याने फिमेलओरियेन्टेड चित्रपटांची सुरुवात केली आहेच आणि आता ४ पुरुष दिग्दर्शकांच्या बिग बजेट चित्रपटांसमोर एक फिमेल डिरेक्टर उभी ठाकणार आहे. २०२६ आणि २०२७ या वर्षात हिंदी आणि साऊथमधील सुपस्टार कलाकारांचे बिग बजेट चित्रपट रिलीज होणार आहेत. यात आदित्य धर दिग्दर्शित  ‘धुरंधर २’  (Dhurandhar 2), नितेश तिवारी दिग्दर्शित  ‘रामायण’  (Ramayana), संदीप र...

Sanjay Leela Bhansali :वडील दारुच्या नशेत, साड्यांना फॉल लावून भागवला घरखर्च; कोरलंय ६ राष्ट्रीय पुरस्कारांवर नाव!

  सिनेमा बनवायचा तर तो लार्जर दॅन लाईफचं हा मंत्र कायम पुर्ण करणारे दिग्दर्शक म्हणजे   संजय लीला भन्साळी … आज कोट्यावधी रुपयांची संपत्ती जरी त्यांच्या नावे असली तर स्ट्रगलींग पीरीऐडमध्ये त्यांनी साड्यांना फॉल लावून घरखर्छ भागवलाय… इतकंच नाही तर चाळीत राहून आपलं आय़ुष्य त्यांनी घडवलंय… आज बॉलिवूडच्या या स्टार दिग्दर्शकाचा वाढदिवस… जाणून घेऊयात संजय लीला भन्साळी यांच्या जीवनबद्दल काही खास गोष्टी… संजय लीला भन्साळी म्हणजे इंडस्ट्रीतलं मोठं नावं… पण ते कमवण्यासाठी त्यांनी फार खस्ता खालल्या आहेत…आज यशाच्या शिखरावर असलेल्या संजय यांनी एकेकाळी अतिशय कठीण काळ पाहिलाय. त्यांचं बालपण, तारुण्यातील सुरुवातीचा काळ आणि सुरुवातीचं करिअर सोपं नव्हतं.  एका चाळीतील लहानशा घरात राहिलेल्या , शून्यातून सुरुवात केलेल्या भन्साळींनी आज त्यांच्या सिनेमांनी भारतासह जगभरात लोकप्रियता मिळवलीये. त्यांचा जन्म एका गुजराती जैन कुटुंबात झाला. २००२ मध्ये सिमी ग्रेवाल यांना दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी त्यांच्या कुटुंबातील कठीण काळ सांगितला होता.  वडील सतत दारुच्या नशेत असायचे, ते दारुच्या आहारी गेल्य...

NFDC : राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाची वैशिष्ट्यपूर्ण पन्नाशी….

  आपल्या बहुभाषिक आणि बहुसांस्कृतिक देशातील चित्रपट संस्कृतीत अनेक लहान मोठे घटक समाविष्ट आहेत. आणि ती एक खूपच मोठी सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरा आहे. आपल्या देशात वर्षभरात विविध भाषांतील जवळपास बाराशे तेराशे चित्रपट प्रदर्शित होतात या संख्याबळासह इतरही अनेक वैशिष्ट्ये आहेत. त्यातील सर्वात महत्वाची गोष्ट, चित्रपट निर्मिती. त्यात आर्थिक नियोजन यशस्वीपणे करीत पडद्यावर चित्रपट आणण्यासाठी अतिशय फोकस्ड असलेल्या निर्मिती संस्था ते चित्रपट निर्मितीची केवळ हौस मौज असलेले, पण चित्रपट माध्यम आणि व्यवसाय याची जराही माहिती नसलेले अशी ही उतरंड आहे. कमी जास्त गुणवत्तेचे चित्रपट का बनतात याचे उत्तर त्यात आहे. त्यातच एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ. अर्थात एन एफ डी सी.‌ ही भारत सरकारच्या वतीने स्थापन करण्यात आलेली चित्रपट निर्मिती संस्था.१९७५ साली या संस्थेची स्थापना करण्यात आली, त्याला पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यातूनच वेगळ्या अशा मराठी आणि हिंदीसह अनेक प्रादेशिक भाषेतील चित्रपटांना प्रोत्साहन आणि सहकार्य मिळाले. (NFDC) सत्तरच्या दशकात एकीकडे मसालेदार मनोरंजक चित्रपटा...

Filmalaya स्टुडिओची वैशिष्ट्य अनेक!

  मी गिरगावातील गल्ली चित्रपट आणि एकपडदा चित्रपटगृह अर्थात सिंगल स्क्रीन थिएटर्स संस्कृतीत लहानांपासून चित्रपट एन्जॉय करीत करीत आल्याने माझ्या मनात एका गोष्टीचे कायमच कुतुहल राहिले, ते म्हणजे चित्रपट बनतो कसा? चित्रपट स्टूडिओतील जग कसे आहे? पडद्यावरची माणसं प्रत्यक्षात दिसतात कशी? आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे १९८२ साली मिडियात मी आल्याबरोबर जाणून घ्यायला केलेली सुरुवात आजही कायम आहे, इतका आणि असा “आपला चित्रपट आणि त्याचे इनडोअर आणि आऊट डोअर लोकेशनचे जग” हा विषय खूपच मोठा आणि माहिती व मनोरंजनाने भरलेला असा आहे…. आणि याच खणखणीत आणि चौफेर वाटचालीत एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट, चित्रपट स्टूडिओतील माझी भटकंती. ग्रॅन्ड रोड येथील ज्योती स्टुडिओपासून दहिसर पूर्व येथील त्रिमूर्ती फिल्म स्टुडिओपर्यत हा बराच मोठा प्रवास आहे आणि त्यातीलच एक   फिल्मालय स्टुडिओ . अंधेरी पश्चिमेकडील आंबोली येथील हा चित्रपट स्टूडिओ आता केवळ एका कोपऱ्यापुरता शिल्लक असल्याचे दिसते. अन्यथा भारतीय चित्रपटसृष्टीच्या वाटचालीतील एक महत्त्वाचा घटक म्हणून फिल्मालय स्टुडिओ ओळखला जातो. प्रत्येक स्टुडिओचे व्यक्तीमत्व आणि वै...

Celebrity Marriage : मोठ्या लोकांच्या मोठ्या गोष्टी, लग्नाच्या प्रक्षेपण हक्काचे साठ कोटी

  अनेक बाबतीत आपण असंवेदनशील (अथवा शॉकप्रुफ) झालो असल्याच्या आजच्या अतिशय वेगवान,  स्पर्धात्मक आणि व्यावहारिक युगात विजय देवरकोऺडा आणि रश्मिका मंदाना यांच्या २६ फेब्रुवारी रोजीच्या शाही लग्नाच्याएक्सलुझिव्ह कव्हरेजचे हक्क फक्त आणि फक्त साठ कोटी रुपयांत हवेत अशा नेटफ्लिक्सच्या ऑफरचे कसलेही आश्चर्य वाटले नाही. सेलिब्रिटींच्या प्रत्येक गोष्टीला किंमत मिळण्याच्या आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल पिढीला या लग्नाचा थाटमाट पाह्यचाय आणि तो आपणच दाखवावा असे एखाद्या यू ट्यूब चॅनेलला वाटणे अगदी स्वाभाविक आहे. खरं तर एकाच का? इतरही यू ट्यूब चॅनेल्सनी याच हाय प्रोफाईल लग्नाची तयारी, महाखर्चिक मंडप, संगीत नृत्याची धमाल,वधु वराची वस्त्रे, बाराती, नाचकाम, सेलिब्रिटी पाहुणे, त्यांचा छान छान महाग अति महाग स्टायलिश लूक, लग्नातील अनेक प्रकारचे स्टार्टर्स आणि जेवणावळ, वधुचे नवीन शैलीतील मंगळसूत्र, साऊथच्या भाषेतील उखाणा, त्याचे मग हिदीकरण, या लग्नाच्या थाटमाटातील भले मोठे मोठे हार (ही दक्षिण भारतातील संस्कृती) अशा अनेक गोष्टींबाबत जनसामान्यांना असलेले कौतुक आणि कुतूहल हे विक्रमी लाईक्स देणारे आहे. मग ...

Sholay थांबला नाही, थांबणारही नाही….

  बंगलोरजवळलील रामगढच्या गावाच्या ‘शोले’च्या सेटवर अमजद खान गब्बरसिंगसोबत सैल्फी काढण्याचा आनंद घेतोय तोच ठाकूर गब्बरसिंग आणि संजीवकुमार एकत्र सेल्फी काढतात…. जे तुम्ही सोशल मीडियावर पाहिले, मी पाहिले, अनेकांनी एन्जॉय केले डिजिटल युगातील एक भन्नाट फंडा आहे. डिजिटल, व्हीएफएक्स आणि एआय तंत्रज्ञानाच्या युगात कोणाला नक्कीच काय काय नि कसे कसे सुचेल हे आता कल्पनेपलिकडे पोहचलय…आता ही करामत जुन्या फोटोंवर नवीन प्रक्रिया यावर अथवा पुरुष सेलिब्रिटीजला उघड्या निधड्या छातीत (अनेकदा तरी क्रिकेटर) आणि युवती सेलिब्रिटीजला त्याच्यासह आकर्षक बिकिनीत, अथवा ‘शोले’च्या सेटवर सगळे एकत्र जेवताहेत एवढ्यावरच थांबलेले नाही, आता चालती फिरती दृश्ये घडवली जात आहेत. हे सगळे सुचते कसं हा एक प्रश्न असला तरी भविष्यात अख्खा ‘शोले’ एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नव्याने यू ट्यूबवर पाहायला मिळणार नाही ना? एका चित्रपटाचा प्रवास कुठे सुरु झाला आणि‌ बदलत्या तांत्रिक प्रगतीनुसार कसा चाललाय बघा. निर्माते जी. पी. सिप्पी, दिग्दर्शक रमेश सिप्पी, पटकथा संवाद लेखक सलिम जावेद यांनी ‘शोले’ जन्माला घालताना याचा जराही विचार ...

Bigg Boss Marathi 6: ‘आम्ही रीलस्टार नाही रियल स्टार’, Bigg Boss Marathi च्या एक्स स्पर्धक Trupti Desai यांची पोस्ट व्हायरल

  सध्या बिग बॉस मराठी ( Bigg Boss Marathi 6) च्या सहाव्या पर्वाची जोरदार चर्चा सुरू असताना चौथ्या सीझनमधील स्पर्धक    तृप्ती देसाई   (Trupti Desai)  यांनी केलेल्या एका पोस्टमुळे सोशल मीडियावर नवा वाद रंगला आहे. त्यांच्या या पोस्टमध्ये त्यांनी त्यांच्या सीझनची आठवण करून देत सध्याच्या स्पर्धकांवर अप्रत्यक्ष टीका केल्याचं मानलं जात आहे. तृप्ती देसाईंनी त्यांच्या अनुभवाबद्दल सांगताना एक खास प्रसंग शेअर केला आहे. त्या लिहितात,   “बिगबॉसच्या घरातील माझा जोरात आवाज ऐकून “सलमान खान” यांचा फोन महेश मांजरेकर सरांना आला होता.”   हा किस्सा स्वतः महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांनी मिश्किलपणे सांगितल्याचा उल्लेख त्यांनी केला आहे. या आठवणीसोबतच त्यांनी त्यांच्या सीझनबद्दल ठाम मत व्यक्त करत लिहिलं आहे की,   “आमच्या सिझनसारखी मजा त्यानंतरच्या कोणत्याच सीझनमध्ये अजिबातच नाही हे मात्र तितकच खरं आहे.” ( Bigg Boss Marathi 6) तृप्ती देसाई  यांनी त्यांच्या पोस्टमध्ये बिग बॉसच्या घराचं स्वरूपही स्पष्ट केलं आहे. त्यांच्या मते ते फक्त वाद आणि प्रसिद्धीचं व्यासपीठ ...

The Kerala Story 2 ला सेन्सॉर बोर्डाची कात्री; तब्बल १६ सीन्समध्ये केले मोठे बदल…

  कामख्या नारायण सिंग दिग्दर्शित   The Kerala Story 2: Goes Beyond  हा चित्रपट प्रदर्शनाआधीच वादाच्या केंद्रस्थानी आला आहे.  27 फेब्रुवारी 2026  रोजी देशभरात प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाभोवती सोशल मीडियावर तीव्र चर्चा सुरू आहे. केरळच्या मुख्यमंत्र्यांपासून ते विविध क्षेत्रातील सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी चित्रपटावर टीका केली आहे. मात्र सर्व बाजूंनी होणाऱ्या आक्षेपांदरम्यान सेन्सॉर प्रक्रियेबाबत मोठा निर्णय समोर आला आहे.  Central Board of Film Certification (CBFC)  ने चित्रपटाला U/A 16+ प्रमाणपत्र देत प्रदर्शनासाठी हिरवा कंदील दिला आहे. ट्रेलर आणि टीझरमधील काही दृश्यांवरून चित्रपटाला ‘A’ प्रमाणपत्र मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. तथापि, बोर्डाने काही अटींसह 16 वर्षांवरील प्रेक्षकांसाठी चित्रपट मंजूर केला आहे. (The Kerala Story 2) सीबीएफसीने निर्मात्यांना तब्बल  16 बदल  सुचवले होते. काही लिप-लॉक दृश्ये आणि महिलांवरील अत्याचार दाखवणाऱ्या प्रसंगांमध्ये कात्री चालवण्यात आली आहे. महिलांना कानाखाली मारण्याचे आणि डोक्यावर प्रहार दाखवणारे दोन ...

Celebrity Marriage Goes Full Digital: ₹60 Crore for Wedding Streaming Rights? 💍📺

  In today’s hyper-digital world, nothing feels shocking anymore, not even a ₹60 crore offer just to stream a celebrity wedding. That’s exactly what’s being discussed around Vijay Deverakonda and Rashmika Mandanna’s rumoured grand wedding. Reports suggest a major OTT platform was ready to pay a massive amount for exclusive coverage rights. And honestly? In the age of viral reels, paparazzi culture and binge-worthy celebrity content, it doesn’t sound impossible. Celebrity weddings are no longer private affairs. They’re full-blown mega events. From designer outfits and luxury venues to guest lists packed with film stars, every tiny detail becomes content. The bridal mangalsutra design, themed décor, sangeet performances, curated menus, everything trends. In the pan-India film era, South and Bollywood stars share the same spotlight. So when two big names are linked to a wedding, the curiosity level skyrockets. Social media influencers, YouTubers, entertainment channels and paparazzi, ...

Mughal-E-Azam : मोहन स्टुडिओत साधं टॉयलेटही नव्हतं

 कपिल शर्माचा शो आपण ‘विनोद’ म्हणून पाहतो, त्यातच चित्रपटसृष्टीतील जुन्या काळातील अनेक वेगळ्या गोष्टी समजतात आणि पूर्वीची चित्रपटसृष्टी कशी होती यावर फोकस पडतो….. अशाच एका एपिसोडमध्ये वहिदा रेहमान सांगत होत्या, के. असिफ दिग्दर्शित ‘मुघल ए आझम’ चे बरेचसे चित्रीकरण झालेल्या मोहन स्टुडिओत चक्क टॉयलेट (शौचालय) नव्हते. एका चित्रपटाचे तेथे चित्रीकरण करत असताना माझ्या ते लक्षात आले. ते असावे असे मी आणि मेहमूद यांनी सांगितले. काही दिवसांनी पुन्हा एकदा मोहन स्टुडिओत चित्रीकरणासाठी जाणे झाले असता, टॉयलेटची व्यवस्था केली आहे का असे विचारले असता हो म्हटले. प्रत्यक्षात एका कोपऱ्यात आडोसा केला होता.. वहिदा रेहमान यांच्या या बोलण्याशी आशा पारेख आणि हेलन यांनी दुजोरा दिला. हेलनजी म्हणाल्या, अनेकदा तरी पूर्ण दिवसभर काम केल्यानंतर मग घरी गेल्यावरच टॉयलेटला जाता येई…( सोशल मीडियावर हा व्हिडिओ पाहायला मिळेल.) मुंबईतील जुन्या काळातील चित्रपट स्टूडिओच्या कथा अथवा गोष्टी या अशाच आहेत. अनेक प्रकारची गैरसोय असली तरी त्या काळातील चित्रपटसृष्टीने वाटचाल करत करत इतिहास घडवला, समाजातील खालच्या माणसापर्यंत आपला...

Yashraj Studio, टेक्नॉसॅव्ही आणि फोकस्ड

Image
  तुम्हाला अनुष्का शर्माने सौभाग्यवती विराट कोहली होण्यापूर्वी त्याच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघासाठी अली अब्बास जफर दिग्दर्शित ‘सुल्तान’ (२०१६) या चित्रपटाचा स्पेशल प्रिव्ह्यू खेळ आयोजित केला होता हे आठवतंय? संध्याकाळी उशिरा त्याचे खास आयोजन करण्यात आले होते आणि एकाच वेळेस चित्रपट आणि क्रिकेट असा छान योग असल्याने हे खेळाडू चित्रपट पाह्यला आले हे लाईव्ह कव्हरेज होते (यात थेट प्रक्षेपण करण्यासारखे इतकं काय आहे असा प्रश्न पडू शकतो, पण विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या प्रेमाचे लोणचं एव्हाना फार मुरले होते आणि त्यांच्या लग्नाचा मुहूर्त जवळ येत चालला असल्याचे ते दिवस होते.) हे सगळे क्रिकेटर्स मुव्हीज एन्जॉय करताना खुश होतेच, पण त्याबरोबरच त्यांना मिनी थिएटरची अद्ययावत आलिशान खुर्ची आणि उच्च दर्जाची साऊंड सिस्टीम यामुळे ते प्रचंड खुश झाले. ते मिनी थिएटर होते, यशराज स्टुडिओतील! मुंबईतील माझ्या अतिशय आवडत्या चित्रपट‌ स्टुडिओतील हा एक आजच्या ग्लोबल युगातील स्टुडिओ. अर्थात yrf studio. आज एकिकडे गोरेगाव पश्चिम येथील स्वामी विवेकानंद मार्गावरील फिल्मीस्थान स्टुडिओ, महालक्ष्मी रेल्...