Slumdog Millionaire या ऑस्कर विजेत्या सिनेमातील गंभीर चूक!

 30 ऑगस्ट 2008 रोजी प्रदर्शित झालेला ‘स्लमडॉग मिलेनियर’ हा चित्रपट ऑस्कर साठी निवडला गेला होता.  या चित्रपटाला अनेक पारितोषिके मिळाले. ही एक ब्रिटिश ड्रामा फिल्म होती आणि दिग्दर्शन  Danny Boyle,यांनी केले होते. भारतीय लेखक विकास स्वरूप यांच्या Q and A या 2005 साली लिहिलेल्या पुस्तकावर या सिनेमाचे कथानक होते. हा चित्रपट मुंबईतील एका झोपडपट्टीतील एका मुलाचा जमाल मलिकचा  (देव पटेल)  ‘कौन  बनेगा करोडपती’ या कार्यक्रमातील विजेता होई पर्यंतचा प्रवास दाखवला होता.  

या चित्रपटात ‘कौन बनेगा करोडपती’ या सिनेमाचे कार्यक्रमाचे अँकरिंग अमिताभ बच्चन यांनी न  करता अनिल कपूर यांनी केले होते.  या कार्यक्रमात जमाल मलिक जे प्रश्न विचारले जातात गेले होते त्या सर्व प्रश्नांची उत्तरे जमाल अचूक पणे देतो आणि विजेता बनतो! प्रेक्षक देखील एक स्लम एरियातील मुलाचा विजेते पदा पर्यंतचा प्रवास बघून खूष होतात. पण या प्रश्नांमध्ये एक बेसिक चूक झाली होती. यात विचारलेल्या एका प्रश्नाचे उत्तर चुकीचे असून बरोबर सांगितले गेले होते.  खर तर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या  चित्रपटांमध्ये इतकी गंभीर चूक व्हायला नको पण ती झाली!  कोणती होती ती चूक आणि ती चूक का झाली? खूप इंटरेस्टिंग किस्सा आहे.

‘स्लमडॉग मिलेनियर ‘ मध्ये जमाल मलिकला जे प्रश्न विचारले जातात त्यापैकी चौथ्या क्रमांकाचा जो प्रश्न होता तो होता ‘ दर्शन दो घनश्याम आज मोरी आखियां प्यासी है’  या भजनाचे कवी कोण आहेत? असा प्रश्न होता. ऑप्शन मध्ये सूरदास, तुलसीदास , कबीर आणि रविदास हे ऑप्शन्स होते.  जमाल मालिक सूरदास या उत्तराला लॉक करायला सांगतो.  आणि अनिलकपूर हे ‘सही जवाब’ असल्याचे सांगून तो पुढे जातो!  पण हे उत्तर शंभर टक्के चुकीचे होते.  कारण ‘ दर्शन दो  घनश्याम आज मोरी अखिया प्यासी है..’  हे भजन सूरदास यांनी लिहिलेलं नव्हतं!   मुळात जे चार ऑप्शन दिले होते त्यामध्ये करेक्ट उत्तर दिलेच नव्हतं. चारही ऑप्शन चुकीचे होते.  करेक्ट आन्सर होतं गीतकार गोपाल सिंग नेपाली! ‘दर्शन दो घनश्याम..’  हे भजन हेमंत कुमार, मन्नाडे आणि सुद्धा मल्होत्रा यांनी ‘ नरसी भगत’  या 1958 साली प्रदर्शित झालेला चित्रपटासाठी गायलं होतं.  हे भजन लिहिलं होतं गोपाल सिंग नेपाली यांनी आणि या भजनाला  संगीत दिलं  होतं  रवी यांनी.  हे गाणं त्या काळामध्ये प्रचंड लोकप्रिय झालं होतं.  मग असं असतानाही चूक झालीच कशी?  याचे कारण भारतातील अनेक भजन ही सोळाव्या शतकातील अंध कवी सूरदास यांच्या नावावर टाकली गेली आहे.

सूरदास यांचं एक भजन आहे ‘अखिया हरी दर्शन की  प्यासी’  त्यामुळे या दोन्ही भजनांचे अर्थ आणि शब्द बऱ्यापैकी एकच असल्यामुळे ही चूक झाली असण्याची शक्यता आहे.  मुळात हा चित्रपट ज्या पुस्तकावरून घेतला होता त्या पुस्तकात देखील भक्त सूरदासचे  मूळ गाणे आणि त्यावरील प्रश्न विचारला होता.  पण इथे मात्र दिग्दर्शकाने लोकप्रिय गाणे  घेण्याच्या नादात मोठी चूक केली.  अर्थात त्यावेळी देखील ही चूक बऱ्याच जणांचे लक्षात आली  होती.  गोपाल सिंग नेपाली यांच्या नातेवाईकांनी देखील ही चूक लक्षात आणून दिली होती. त्यांच्या मते  भक्त सूरदास हे मोठे संत कवी आहेतच त्याबद्दल वादच नाही.  पण जी गोष्ट ज्यांची आहे त्यांना ते क्रेडिट द्यायला पाहिजे!  गोपाल सिंह नेपाली यांना ते क्रेडिट  मिळाले नाही! पण या निमित्ताने एक विस्मृतीत गेलेल्या गीतकार सर्वांना आठवला.

नेपाली यांच जन्म बिहार मध्ये 11 ऑगस्ट 1911 या दिवशी झाला.  त्यांचा जन्म जन्माष्टमीला झाल्यामुळे त्यांचे नाव गोपाल ठेवले.  त्यांच्या काव्याने हिंदी साहित्य समृध्द बनले.  हिंदी साहित्यातील अनेक मान्यवर प्रभावित झाले होते.  त्यात महदेवी वर्मा, सुमित्रानंदन पंत, मुंशी प्रेमचंद,  रामधारी सिंह दिनकर,  यांचा समावेश होतो. भारतातील अनेक विद्यापीठात त्यांचे साहित्य आज देखील अभ्यासले जाते. त्यांच्या काव्यावर प्रेम करणारे मुंशी प्रेमचंद यांनी तर गोपाल सिंग  नेपाली यांना,” तुम्ही आईच्या उदरात असतानाच काव्य लिहायला शिकलात का?”  असे विचारले होते.  चाळीस च्या  दशकामध्ये गोपाल सिंग नेपाली हिंदी सिनेमासाठी गाणी लिहू लागली 1943 ते 19 63 या 20 वर्षाच्या कालावधीत त्यांनी तीनशे हून अधिक चित्रपट गाणी लिहिली त्यात सर्वाधिक लोकप्रिय ठरले ते ‘नरसी भगत’ या चित्रपटातील ‘ दर्शन दो घनश्याम..’ 1962 च्या चीन युद्धात त्यांनी ‘हिमालय ने पुकारा’  हे देशभक्ती पर काव्य लिहिलं ते त्या काळामध्ये खूप लोकप्रिय झाले होते. 17 एप्रिल  1963 या दिवशी त्यांचे निधन झाले.

this blog was originally published on https://kalakrutimedia.com/biggest-mistkae-from-oscar-winning-film-slumdog-millionaire/

Comments

Popular posts from this blog

Celebrity Marriage : मोठ्या लोकांच्या मोठ्या गोष्टी, लग्नाच्या प्रक्षेपण हक्काचे साठ कोटी

Sant Dnyaneshwaranchi Muktai: ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर आणि दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडला ज्ञानेश्वरीचा सुरेल सोहळा !

आता मी हिंदीत बोलू?”; मराठीत बोलत असतानाच Kajol का भडकली?