उर्वशी रौतेलाचा बाथरूमधील व्हायरल झालेल्या व्हिडिओ मागील सत्य अखेर आले समोर!

 


Bollywood masala उर्वशी रौतेलाचे खासगी आयुष्य नेहमीच चर्चेत असते. क्रिकेटर रिषभ पंतसोबत चाहते अनेकदा तिचं नाव जोडताना दिसत असले तरी नुकताच व्हायरल झालेल्या तिच्या खासगी व्हिडिओमुळे बराच गदारोळ झाला होता. नुकतीच इंटरनेटवर एक व्हिडिओ क्लिप समोर आली होती ज्यात अभिनेत्री बाथरूममध्ये कपडे बदलताना दिसली. या क्लिपमुळे लोकांना धक्का बसला होता या व्हिडिओ नंतर अभिनेत्रीचा आणखी एक ऑडिओ देखील समोर आला होता. पण हा लीक झालेला व्हिडिओ किंवा लीक झालेला ऑडिओ नसून हा सगळा पीआर स्टंट होता. जो तिच्या आगामी ‘घुसपैठिया‘ चित्रपटातील आहे. हा चित्रपट 9 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार असून आता त्याचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.( Urvashi Rautela Ghuspaithiya Trailer)

Urvashi Rautela Ghuspaithiya Trailer

उर्वशी रौतेलाच्या आगामी चित्रपटाची पार्श्वभूमी आधीच तयार करण्यासाठी हा स्टंट करण्यात आला होता. आता अभिनेत्रीच्या त्या लीक झालेल्या व्हिडिओचे संपूर्ण सत्य तिच्या ‘घुसपैठिया‘ चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये स्पष्टपणे दिसून आले आहे.तिचा व्हायरल झालेला व्हिडिओ तिच्या  लवकरच प्रेक्षकांसमोर दाखल होणाऱ्या ‘घुसपैठिया‘ या चित्रपटातील आहे, याचा पुरावा चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्याने मिळाला आहे. कारण ट्रेलरमध्ये नेमके तेच दृश्य दाखवण्यात आले आहे जे काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर धुमाकूळ घालत होते.

Urvashi Rautela Ghuspaithiya Trailer

घुसपैठियाच्या ट्रेलर मध्ये ज्यात विनीत कुमार सिंह आणि उर्वशी रौतेला पती-पत्नीच्या भूमिकेत दिसत आहेत. तर अक्षय ओबेरॉय खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. संपूर्ण ट्रेलरमध्ये सोशल मीडियामुळे पती-पत्नीचे आयुष्य उद्ध्वस्त होताना दिसत आहे. त्याचबरोबर प्रत्येक सेकंदाला कथेला नवं वळण मिळताना ही दिसतं आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांच्या अनेक प्रतिक्रिया मिळताना दिसत आहे.(Urvashi Rautela Ghuspaithiya Trailer)

============================

हे देखील वाचा: Bad Newz Box Office Collection: विकी कौशलच्या ‘बॅड न्यूज’ ने केली कमाल; 3 दिवसात केली इतकी कमाई

============================

उर्वशी रौतेलाचा ‘घुसपैठिया‘ हा २०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या तमिळ चित्रपट ‘थिरुट्टू पायले २‘चा हिंदी रिमेक असल्याचे म्हटले जात आहे. अर्थात पुन्हा एकदा दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक प्रेक्षकांच्या भेटीला येत असला तरी ‘घुसपैठिया‘च्या ट्रेलरमुळे ही लोकांमध्ये उत्सुकता वाढत आहे. हा सिनेमा येत्या ९ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Bollywood tadka

Original content is posted on: https://kalakrutimedia.com/fact-behind-urvashi-rautelas-viral-video-from-the-bathroom-has-finally-come-out-info/

Comments

Popular posts from this blog

Diljit Dosanjh पंजाब इंडस्ट्री गाजवणारा दिलजीत दोसांझ ‘असा’ बनला बॉलिवूडमधील टॉपचा अभिनेता

Oscar 2025 : कुठे पाहाल ऑस्कर सोहळा? ‘या’ भारतीय चित्रपटांकडे लागलंय लक्ष

Aamir Khan : आमिर खानचे हे दोन चित्रपट पडद्यावर यायला हवे होते