Maaficha Sakshidar सत्य घटनेवर आधारित होता, पण…

 ‘सत्य घटनेवर आधारित चित्रपट’ हा चित्रपट निर्मितीतील एक महत्त्वाचा फंडा. आणि त्यात जर ती सत्य घटना खुनाच्या मालिकेची असेल तर? सत्तरच्या दशकाच्या उत्तरार्धातील पुणे शहरातील अशीच एक अतिशय भयावह खुनांची मालिका. त्यामुळे पुणे झालेच, पण संपूर्ण महाराष्ट्र हादरला. ती भयावह गोष्ट म्हणजे, जोशी आणि अभ्यंकर या कुटुंबीयांची अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने आणि त्याहीपेक्षा जास्त क्रूरपणे करण्यात आलेली हत्या. या घटनेमुळे संपूर्ण समाजात प्रचंड भीती निर्माण झाली होती आणि ते स्वाभाविक होतेच. पोलिसांनी चक्रे फिरवली आणि काही दिवसांनी या हत्या प्रकरणांत काही सुशिक्षित आणि उच्चशिक्षित तरुणांना अटक करण्यात आली. हे सगळेच प्रकरण चक्रावून टाकणारे होते. यामागची कारणे आणि मानसिकता याची त्या काळात बरीच चर्चा झाली. या प्रकरणाने एकूणच समाज ढवळून निघाला होता. याच अतिशय धक्कादायक प्रकरणावर निर्माते Hiralal Shah यांनी चित्रपट निर्मितीचे पाऊल टाकले. या चित्रपटाचे दिग्दर्शक Rajdutt आणि पटकथा व संवादलेखन Madhusudan Kalelkar यांचे. आणि या चित्रपटाचं नाव “माफीचा साक्षीदार”. Hem Hira Chitra या बॅनरखाली असा चित्रपट निर्माण होत आहे, ही त्या काळातील प्रचंड मोठी धक्कादायक गोष्ट होती. या चित्रपटात नेमके काय दाखवणार आहेत, त्यात वास्तव किती असेल आणि चित्रपटाचे मनोरंजन मूल्य वाढवण्यासाठी त्यात काय काय पेरले असेल, याचीही उत्सुकता वाढली. या चित्रपटातील एका हॉटेलमधील Bindu वरील आयटेम साँगचे मानखुर्द येथील Essel Studio मध्ये चित्रीकरण सुरू असताना त्याच्या शूटिंग रिपोर्टिंगसाठी मुंबईतील आम्हा काही सिनेपत्रकारांना आवर्जून सेटवर आमंत्रित करण्यात आले होते. हिंदी चित्रपटसृष्टीतील तारका मराठी चित्रपटात नृत्य करते, याचं त्या काळात केवढं कौतुक! चित्रपट असा सतत चर्चेत होता.

चित्रपट पूर्ण होण्याआधीच Rajdutt यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन सोडलं. आता पंचाईत झाली. अशा वेळी V. Ravindra यांच्याकडे दिग्दर्शन सोपवण्यात आले आणि चित्रपटाचं चित्रीकरण व मग संकलन पूर्ण करण्यात आलं. या चित्रपटाचं संकलन Bal Korde यांचं आहे. चित्रपट पूर्ण झाला, प्रमाणपत्रासाठी सेन्सॉर बोर्डाकडे गेला आणि चित्रपटाला रेड सिग्नल देण्यात आला. सेन्सॉरने या चित्रपटाला अनेक कट्स सुचवले आणि ते स्वीकारावेत तर चित्रपटाच्या विषयानुसार काहीच राहत नव्हतं. अशा वेळी हा चित्रपट दिल्लीत रिव्हायझिंग समितीकडे गेला. त्यात तब्बल दोन वर्षे गेली. त्यामुळे या चित्रपटाची हवा काहीशी ओसरली. एका वादग्रस्त घटनेवरील चित्रपट हा या चित्रपटाच्या पूर्वप्रसिद्धीचा मुद्दा खूप महत्त्वाचा होता. इतकंच नव्हे, तर या चित्रपटात तेव्हाच्या तरुण पिढीतील अनेक कलाकारांच्या भूमिका आहेत, हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. Nana Patekar या नावाभोवती चित्रपटाच्या बाबतीत तरी अजून फार वलय निर्माण झालं नव्हतं. Nana Patekar या नावाला नाट्य क्षेत्रात ओळख प्राप्त झाली होती. चित्रपट हे मोठं माध्यम आणि व्यवसाय आहे. सेन्सॉरने काही कट्स सुचवले, त्यामुळे काही भागांचं पुन्हा चित्रीकरण करण्यात आलं. आणि १३ मार्च १९८६ रोजी ‘A’ प्रमाणपत्र देऊन चित्रपट सेन्सॉर संमत झाला. मग जुलै महिन्यात हा चित्रपट मुंबईत प्रदर्शित झाला. त्याच्या प्रदर्शनास चाळीस वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त हा फोकस.

या चित्रपटाची गीते Jagdish Khebudkar, Dhansingh Yadav आणि Susur Lakhnavi यांची असून संगीत Vishwanath More यांचं आहे. कला दिग्दर्शन Sharad Pol यांचं आहे, तर छायाचित्रणकार Manohar Acharya आहेत. या चित्रपटात Nana Patekar राघवेंद्र “राघवा”च्या भूमिकेत आहे. Nana Patekar ला या चित्रपटाच्या पूर्वप्रसिद्धीत चांगला स्कोप होता. त्याशिवाय Mohan Gokhale (सुनील “सुन्या”च्या भूमिकेत), Bipin Varti (राकेश “रॉकी”च्या भूमिकेत), Kishore Jadhav (मनोहरच्या भूमिकेत), Avinash Kharshikar (विलास मोडकच्या भूमिकेत), Usha Naik (गीता – सुनीलची मैत्रीण), Jayram Kulkarni (महाविद्यालयाच्या प्राध्यापकाच्या भूमिकेत), Arun Sarnaik (सरकारी वकिलाच्या भूमिकेत), Kamalakar Sarang (बचाव पक्षाच्या वकिलाच्या भूमिकेत), Datta Bhat (न्यायाधीशाच्या भूमिकेत), Ravi Patwardhan (पोलीस निरीक्षक जाधव यांच्या भूमिकेत), Ashalata Wabgaonkar (सुनीलच्या आईच्या भूमिकेत), Sumati Gupte (राघवेंद्रच्या आईच्या भूमिकेत), पाहुणी कलाकार Bindu (रेस्टॉरंट/बारमध्ये डान्सरच्या भूमिकेत – “Jeevan Mein Aayi Nasha” या गीतावर नृत्य), पाहुणी कलाकार Padma Khanna (“Shama Ne Jab Aag” गाण्यात), Irshad Hashmi (पोलीस आयुक्ताच्या भूमिकेत) आणि Vasant Shinde (पोलीस हवालदार) यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात एकूण चार गाणी आहेत. “रंगले नवे नवे स्वप्न आज लोचनी” हे गाणे श्रवणीय आहे. विशेष म्हणजे, हा चित्रपट हिंदीत डब करून त्याचं नाव “Faasi Ka Phanda” असं ठेवण्यात आलं. या चित्रपटाचं बुकलेटही बनलं. पण “माफीचा साक्षीदार” या चित्रपटाला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने त्याची डब आवृत्ती फारशी कुठे प्रदर्शित झाली नाही.

जोशी-अभ्यंकर खुनांची मालिका ही घटना समाजमनावर कायमची खोलवर जखम करणारी आहे. त्यावर चित्रपट करायचा, हे अतिशय अवघड आव्हान. ते पेललं गेलं नाही. चित्रपट फसला. एकच गोष्ट घडली, या प्रकरणावर “माफीचा साक्षीदार” या नावाचा चित्रपट पडद्यावर आला होता, याची नोंद झाली. तीदेखील कमी महत्त्वाची गोष्ट नाही. त्यानंतर २००२ साली दिग्दर्शक Anurag Kashyap यांनी याच प्रकरणावर “Paanch” या नावाचा हिंदी चित्रपट बनवला. फरक इतकाच की, त्यांनी या घटना मुंबईत घडतात असं दाखवलं आणि नवीन शतकाच्या सुरुवातीच्या दिवसांतील युवकांची मानसिकता व जीवनशैली त्यात दाखवली. Anurag Kashyap धाडसी कथानकावरील तशाच मांडणीसाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक. सेन्सॉरने या चित्रपटालाही रेड सिग्नल दाखवला. बरेच कट्स सुचवले. अनेक वर्षांनंतर हा चित्रपट ओटीटीवर आला आणि त्याला प्लॅटफॉर्म मिळाला. आजच्या मल्टिप्लेक्स युगातील एखाद्या पटकथा-संवाद लेखकाने आणि दिग्दर्शकाने याच घटनेवर आधारित एखाद्या चित्रपटाची निर्मिती करावी. आजचे सेन्सॉर त्या घटनेची पार्श्वभूमी विचारात घेऊन प्रमाणपत्र देतील, असं वाटतं. “माफीचा साक्षीदार”ची रिमेक करावी; मांडणी आणि विषयाची हाताळणी आजच्या दृष्टिकोनातून असावी.

this blog was originally published on https://kalakrutimedia.com/40-years-of-nana-patekar-fame-maficha-sakshidar-movie/





Comments

Popular posts from this blog

Celebrity Marriage : मोठ्या लोकांच्या मोठ्या गोष्टी, लग्नाच्या प्रक्षेपण हक्काचे साठ कोटी

Sholay थांबला नाही, थांबणारही नाही….

Baapya Movie Review : नाकारण्यापासून ते स्विकारण्यापर्यंतचा प्रवास