RAMAYANA : बनवण्याचा प्रयत्न बॉलीवूडमध्ये ३ वेळा झाला होता, पण

सध्या जगभरात भारताच्या Ramayana चित्रपटाचीच चर्चा आहे. इंडियन फिल्म इंडस्ट्रीच्या इतिहासातील सर्वात मोठा चित्रपट… सोबतच विषय रामायणाचा… मग बॉक्स-ऑफिस तर गाजणारच! पण तुम्हाला माहितीये का? रामायणावर मोठ्या बजेटचा चित्रपट बनवण्याचा प्रयत्न बॉलीवूडमध्ये याआधी तीन वेळा झाला होता आणि तिन्ही वेळा हा प्रोजेक्ट पडद्यावर येण्याआधीच फसला! (RAMAYANA)

आणि विशेष म्हणजे, या तिन्ही प्रोजेक्ट्समध्ये त्या काळातील मोठमोठी नावं जोडली गेली होती. सगळ्यात पहिला प्रयत्न झाला होता १९९०च्या दशकात. १९९६-९७ च्या दरम्यान Sohail Khan रामायणावर चित्रपट बनवण्याच्या तयारीत होते. यामध्ये Salman Khan श्रीरामांच्या भूमिकेत, तर Sonali Bendre सीता मातेच्या भूमिकेत दिसणार होत्या. विशेष म्हणजे हा चित्रपट फक्त कागदावरच नव्हता. काही रिपोर्ट्सनुसार चित्रपटाचं जवळपास ४० टक्के शूटिंग पूर्ण झालं होतं. Salman Khan यांनी श्रीरामांच्या वेशात धनुष्यबाणासह फोटोशूटसुद्धा केलं होतं. म्हणजे हा प्रोजेक्ट खरंच पडद्यावर येण्याच्या दिशेने पुढे गेला होता. पण काही वैयक्तिक आणि निर्मितीशी संबंधित घडामोडींमुळे अखेर हा चित्रपट थांबला आणि पुन्हा सुरू होऊ शकला नाही. (RAMAYANA)

आता विचार करा… Salman Khan श्रीराम आणि Sonali Bendre सीता! आजच्या काळात ही कल्पना किती वेगळी वाटते ना? पण त्यावेळी हा चित्रपट पूर्ण झाला असता तर कदाचित रामायणाकडे पाहण्याची बॉलीवूडची पद्धतच काहीशी वेगळी झाली असती. कारण १९९०च्या दशकात मोठ्या प्रमाणावर VFX आणि International scale वर भारतीय पौराणिक कथा मांडण्याची कल्पना अजून सुरुवातीच्या टप्प्यात होती. त्यामुळे त्या काळात रामायणासारखा महाकाव्यात्मक विषय मोठ्या पडद्यावर आणणं हीच एक मोठी धाडसी कल्पना होती. यानंतर २००६च्या आसपास आणखी एक मोठा प्रयत्न झाला. यावेळी दिग्दर्शक होते Rajkumar Santoshi. त्यांनी बिग बजेट रामायण बनवण्याची तयारी सुरू केली आणि यासाठी casting सुद्धा जवळपास निश्चित करण्यात आली होती. Ajay Devgn श्रीरामांच्या भूमिकेत, Kajol सीता मातेच्या भूमिकेत, तर Riteish Deshmukh लक्ष्मणाच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा होती. रावणाच्या भूमिकेसाठी Prakash Raj यांचं नावही चर्चेत होतं. २००६ मध्ये Santoshi यांनी Ajay Devgn आणि Kajol यांना या प्रोजेक्टसाठी जोडल्याचं वृत्त आलं होतं आणि Riteish Deshmukh यांचं नावही पुढे आलं होतं. म्हणजे एकीकडे Ajay Devgn-Kajol ही जोडी आणि दुसरीकडे रामायणाचा भव्य विषय… प्रेक्षकांसाठी हीसुद्धा खूप मोठी गोष्ट ठरली असती. पण हा प्रोजेक्टही पुढे सरकला नाही. Casting, budget आणि प्रचंड मोठ्या प्रमाणावर कराव्या लागणाऱ्या निर्मितीमुळे हा प्रोजेक्ट रखडत गेला आणि अखेर बंद पडला. (RAMAYANA)

आता तिसरा प्रयत्न झाला २००८ साली आणि यावेळी नाव होतं Sanjay Khan. त्यांनी तब्बल ५० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये रामायण बनवण्याची घोषणा केली होती. त्या चित्रपटाचं नाव होतं The Legend of Rama. हा फक्त पारंपरिक पद्धतीचा रामायणपट नसून, आधुनिक आणि भव्य fantasy-adventure शैलीत रामायण मांडण्याचा विचार होता. या प्रोजेक्टसाठी Hrithik Roshan यांना श्रीरामांच्या भूमिकेसाठी, Zayed Khan यांना लक्ष्मणाच्या भूमिकेसाठी आणि Amitabh Bachchan यांना राजा दशरथांच्या भूमिकेसाठी विचारण्यात आलं होतं. या चित्रपटाची कल्पना त्याकाळच्या मानाने खूप मोठी होती. रामायणाला The Lord of the Rings सारख्या मोठ्या Fantasy scale वर मांडण्याचा विचार असल्याचंही सांगण्यात आलं होतं. म्हणजे भारतीय महाकाव्य आणि Hollywood-style epic filmmaking यांचा मिलाफ करण्याचा हा प्रयत्न होता. पण हा प्रोजेक्टसुद्धा प्रत्यक्ष पडद्यावर आला नाही. (RAMAYANA)

म्हणजे एकदा Salman Khan, दुसऱ्यांदा Ajay Devgn, आणि तिसऱ्यांदा Hrithik Roshan… तीन वेगवेगळ्या काळात तीन मोठे स्टार्स श्रीरामांच्या भूमिकेसाठी जोडले गेले. पण तिन्ही वेळा रामायण मोठ्या पडद्यावर येण्याआधीच प्रोजेक्ट बंद पडले.पण इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे… बॉलीवूडमध्ये रामायणावर चित्रपट बनलेच नाहीत, असं अजिबात नाही. उलट भारतीय सिनेमाच्या अगदी सुरुवातीपासूनच रामायणाचा प्रभाव सिनेमावर राहिला आहे. उदाहरणार्थ, १९४३ साली Vijay Bhatt यांचा Ram Rajya हा हिंदीतील प्रसिद्ध रामायणाधारित चित्रपट होता. यामध्ये Prem Adib यांनी श्रीरामांची भूमिका केली होती, तर Shobhna Samarth सीतेच्या भूमिकेत होत्या. हा चित्रपट इतका लोकप्रिय झाला की भारतीय पौराणिक चित्रपटांच्या इतिहासात त्याचं एक वेगळं स्थान निर्माण झालं. यानंतर १९६१ मध्ये Babubhai Mistry यांचा Sampoorna Ramayan आला. यामध्ये Mahipal यांनी राम आणि Anita Guha यांनी सीतेची भूमिका केली होती. हा चित्रपट बॉक्स-ऑफिसवर यशस्वी झाला आणि त्यावेळच्या तंत्रज्ञानाच्या मर्यादा असूनही रामायणाची भव्यता पडद्यावर दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. (RAMAYANA)

यानंतर १९९७ मध्ये Lav Kush हा हिंदी चित्रपट आला. Jeetendra यांनी रामाची, Jaya Prada यांनी सीतेची आणि Arun Govil यांनी लक्ष्मणाची भूमिका केली होती. हा चित्रपट मुख्यतः रामायणातील उत्तरकांडावर आधारित होता. आणि फक्त live-action चित्रपटच नाही… रामायणाची कथा animation मध्येही सांगितली गेली. १९९२ मध्ये आलेल्या Ramayana: The Legend of Prince Rama या Indo-Japanese animated film ने रामायणाला वेगळ्या animation शैलीत जगासमोर नेलं. त्यानंतर Ramayana: The Epic सारखे animated चित्रपटही आले. पण रामायणाला घराघरात पोहोचवण्याचं सर्वात मोठं काम चित्रपटाने नव्हे, तर टेलिव्हिजनने केलं. Ramanand Sagar यांची Ramayan १९८७-८८ मध्ये दूरदर्शनवर प्रसारित झाली आणि श्रीराम, सीता, लक्ष्मण, हनुमान आणि रावण यांची जी प्रतिमा भारतीयांच्या मनात निर्माण झाली, ती आजही तितकीच प्रभावी आहे. हा बॉलीवूड चित्रपट नव्हता, पण रामायणाच्या Visual Representation वर त्याचा प्रभाव प्रचंड होता. (RAMAYANA)

आणि आता या सगळ्या इतिहासानंतर येतोय तो आजवरचा सर्वात मोठा प्रयत्न… Nitesh Tiwari यांचा Ramayana! यामध्ये Ranbir Kapoor श्रीरामांच्या भूमिकेत, Sai Pallavi सीतेच्या भूमिकेत, Yash रावणाच्या भूमिकेत, Sunny Deol हनुमानाच्या भूमिकेत आणि Ravi Dubey लक्ष्मणाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा दोन भागांचा चित्रपट असून त्याचं Reported Budget तब्बल ₹4,000 कोटी असल्याचं सांगितलं जात आहे. म्हणजे जवळपास तीन दशकांपूर्वी Salman Khan पासून सुरू झालेला मोठ्या पडद्यावरच्या आधुनिक रामायणाचा हा प्रवास आता Ranbir Kapoor पर्यंत येऊन पोहोचला आहे. आता प्रश्न फक्त एवढाच… भारतीय सिनेमाच्या इतिहासात हा चित्रपट खरंच नवा अध्याय लिहिणार का? (RAMAYANA)सध्या जगभरात भारताच्या Ramayana चित्रपटाचीच चर्चा आहे. इंडियन फिल्म इंडस्ट्रीच्या इतिहासातील सर्वात मोठा चित्रपट… सोबतच विषय रामायणाचा… मग बॉक्स-ऑफिस तर गाजणारच! पण तुम्हाला माहितीये का? रामायणावर मोठ्या बजेटचा चित्रपट बनवण्याचा प्रयत्न बॉलीवूडमध्ये याआधी तीन वेळा झाला होता आणि तिन्ही वेळा हा प्रोजेक्ट पडद्यावर येण्याआधीच फसला! (RAMAYANA)

आणि विशेष म्हणजे, या तिन्ही प्रोजेक्ट्समध्ये त्या काळातील मोठमोठी नावं जोडली गेली होती. सगळ्यात पहिला प्रयत्न झाला होता १९९०च्या दशकात. १९९६-९७ च्या दरम्यान Sohail Khan रामायणावर चित्रपट बनवण्याच्या तयारीत होते. यामध्ये Salman Khan श्रीरामांच्या भूमिकेत, तर Sonali Bendre सीता मातेच्या भूमिकेत दिसणार होत्या. विशेष म्हणजे हा चित्रपट फक्त कागदावरच नव्हता. काही रिपोर्ट्सनुसार चित्रपटाचं जवळपास ४० टक्के शूटिंग पूर्ण झालं होतं. Salman Khan यांनी श्रीरामांच्या वेशात धनुष्यबाणासह फोटोशूटसुद्धा केलं होतं. म्हणजे हा प्रोजेक्ट खरंच पडद्यावर येण्याच्या दिशेने पुढे गेला होता. पण काही वैयक्तिक आणि निर्मितीशी संबंधित घडामोडींमुळे अखेर हा चित्रपट थांबला आणि पुन्हा सुरू होऊ शकला नाही. (RAMAYANA)

आता विचार करा… Salman Khan श्रीराम आणि Sonali Bendre सीता! आजच्या काळात ही कल्पना किती वेगळी वाटते ना? पण त्यावेळी हा चित्रपट पूर्ण झाला असता तर कदाचित रामायणाकडे पाहण्याची बॉलीवूडची पद्धतच काहीशी वेगळी झाली असती. कारण १९९०च्या दशकात मोठ्या प्रमाणावर VFX आणि International scale वर भारतीय पौराणिक कथा मांडण्याची कल्पना अजून सुरुवातीच्या टप्प्यात होती. त्यामुळे त्या काळात रामायणासारखा महाकाव्यात्मक विषय मोठ्या पडद्यावर आणणं हीच एक मोठी धाडसी कल्पना होती. यानंतर २००६च्या आसपास आणखी एक मोठा प्रयत्न झाला. यावेळी दिग्दर्शक होते Rajkumar Santoshi. त्यांनी बिग बजेट रामायण बनवण्याची तयारी सुरू केली आणि यासाठी casting सुद्धा जवळपास निश्चित करण्यात आली होती. Ajay Devgn श्रीरामांच्या भूमिकेत, Kajol सीता मातेच्या भूमिकेत, तर Riteish Deshmukh लक्ष्मणाच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा होती. रावणाच्या भूमिकेसाठी Prakash Raj यांचं नावही चर्चेत होतं. २००६ मध्ये Santoshi यांनी Ajay Devgn आणि Kajol यांना या प्रोजेक्टसाठी जोडल्याचं वृत्त आलं होतं आणि Riteish Deshmukh यांचं नावही पुढे आलं होतं. म्हणजे एकीकडे Ajay Devgn-Kajol ही जोडी आणि दुसरीकडे रामायणाचा भव्य विषय… प्रेक्षकांसाठी हीसुद्धा खूप मोठी गोष्ट ठरली असती. पण हा प्रोजेक्टही पुढे सरकला नाही. Casting, budget आणि प्रचंड मोठ्या प्रमाणावर कराव्या लागणाऱ्या निर्मितीमुळे हा प्रोजेक्ट रखडत गेला आणि अखेर बंद पडला. (RAMAYANA)

आता तिसरा प्रयत्न झाला २००८ साली आणि यावेळी नाव होतं Sanjay Khan. त्यांनी तब्बल ५० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये रामायण बनवण्याची घोषणा केली होती. त्या चित्रपटाचं नाव होतं The Legend of Rama. हा फक्त पारंपरिक पद्धतीचा रामायणपट नसून, आधुनिक आणि भव्य fantasy-adventure शैलीत रामायण मांडण्याचा विचार होता. या प्रोजेक्टसाठी Hrithik Roshan यांना श्रीरामांच्या भूमिकेसाठी, Zayed Khan यांना लक्ष्मणाच्या भूमिकेसाठी आणि Amitabh Bachchan यांना राजा दशरथांच्या भूमिकेसाठी विचारण्यात आलं होतं. या चित्रपटाची कल्पना त्याकाळच्या मानाने खूप मोठी होती. रामायणाला The Lord of the Rings सारख्या मोठ्या Fantasy scale वर मांडण्याचा विचार असल्याचंही सांगण्यात आलं होतं. म्हणजे भारतीय महाकाव्य आणि Hollywood-style epic filmmaking यांचा मिलाफ करण्याचा हा प्रयत्न होता. पण हा प्रोजेक्टसुद्धा प्रत्यक्ष पडद्यावर आला नाही. (RAMAYANA)

म्हणजे एकदा Salman Khan, दुसऱ्यांदा Ajay Devgn, आणि तिसऱ्यांदा Hrithik Roshan… तीन वेगवेगळ्या काळात तीन मोठे स्टार्स श्रीरामांच्या भूमिकेसाठी जोडले गेले. पण तिन्ही वेळा रामायण मोठ्या पडद्यावर येण्याआधीच प्रोजेक्ट बंद पडले.पण इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे… बॉलीवूडमध्ये रामायणावर चित्रपट बनलेच नाहीत, असं अजिबात नाही. उलट भारतीय सिनेमाच्या अगदी सुरुवातीपासूनच रामायणाचा प्रभाव सिनेमावर राहिला आहे. उदाहरणार्थ, १९४३ साली Vijay Bhatt यांचा Ram Rajya हा हिंदीतील प्रसिद्ध रामायणाधारित चित्रपट होता. यामध्ये Prem Adib यांनी श्रीरामांची भूमिका केली होती, तर Shobhna Samarth सीतेच्या भूमिकेत होत्या. हा चित्रपट इतका लोकप्रिय झाला की भारतीय पौराणिक चित्रपटांच्या इतिहासात त्याचं एक वेगळं स्थान निर्माण झालं. यानंतर १९६१ मध्ये Babubhai Mistry यांचा Sampoorna Ramayan आला. यामध्ये Mahipal यांनी राम आणि Anita Guha यांनी सीतेची भूमिका केली होती. हा चित्रपट बॉक्स-ऑफिसवर यशस्वी झाला आणि त्यावेळच्या तंत्रज्ञानाच्या मर्यादा असूनही रामायणाची भव्यता पडद्यावर दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. (RAMAYANA)

यानंतर १९९७ मध्ये Lav Kush हा हिंदी चित्रपट आला. Jeetendra यांनी रामाची, Jaya Prada यांनी सीतेची आणि Arun Govil यांनी लक्ष्मणाची भूमिका केली होती. हा चित्रपट मुख्यतः रामायणातील उत्तरकांडावर आधारित होता. आणि फक्त live-action चित्रपटच नाही… रामायणाची कथा animation मध्येही सांगितली गेली. १९९२ मध्ये आलेल्या Ramayana: The Legend of Prince Rama या Indo-Japanese animated film ने रामायणाला वेगळ्या animation शैलीत जगासमोर नेलं. त्यानंतर Ramayana: The Epic सारखे animated चित्रपटही आले. पण रामायणाला घराघरात पोहोचवण्याचं सर्वात मोठं काम चित्रपटाने नव्हे, तर टेलिव्हिजनने केलं. Ramanand Sagar यांची Ramayan १९८७-८८ मध्ये दूरदर्शनवर प्रसारित झाली आणि श्रीराम, सीता, लक्ष्मण, हनुमान आणि रावण यांची जी प्रतिमा भारतीयांच्या मनात निर्माण झाली, ती आजही तितकीच प्रभावी आहे. हा बॉलीवूड चित्रपट नव्हता, पण रामायणाच्या Visual Representation वर त्याचा प्रभाव प्रचंड होता. (RAMAYANA)

आणि आता या सगळ्या इतिहासानंतर येतोय तो आजवरचा सर्वात मोठा प्रयत्न… Nitesh Tiwari यांचा Ramayana! यामध्ये Ranbir Kapoor श्रीरामांच्या भूमिकेत, Sai Pallavi सीतेच्या भूमिकेत, Yash रावणाच्या भूमिकेत, Sunny Deol हनुमानाच्या भूमिकेत आणि Ravi Dubey लक्ष्मणाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा दोन भागांचा चित्रपट असून त्याचं Reported Budget तब्बल ₹4,000 कोटी असल्याचं सांगितलं जात आहे. म्हणजे जवळपास तीन दशकांपूर्वी Salman Khan पासून सुरू झालेला मोठ्या पडद्यावरच्या आधुनिक रामायणाचा हा प्रवास आता Ranbir Kapoor पर्यंत येऊन पोहोचला आहे. आता प्रश्न फक्त एवढाच… भारतीय सिनेमाच्या इतिहासात हा चित्रपट खरंच नवा अध्याय लिहिणार का? (RAMAYANA)

This blog is originally posted on Kalakruti Media - https://kalakrutimedia.com/ramayana-bollywood-tried-to-make-it-3-times-but/

Comments

Popular posts from this blog

Celebrity Marriage : मोठ्या लोकांच्या मोठ्या गोष्टी, लग्नाच्या प्रक्षेपण हक्काचे साठ कोटी

Baapya Movie Review : नाकारण्यापासून ते स्विकारण्यापर्यंतचा प्रवास

Sholay थांबला नाही, थांबणारही नाही….