Shrinivas Khale : मराठी संगीत समृध्द करणारा संगीतकार

 आज 2 सप्टेंबर. मराठीतील महान संगीतकार Shrinivas Khale यांचा स्मृतीदिन. त्या निमित्ताने त्यांच्या सांगीतिक जीवनाचा हा आढावा. मराठी भावगीतांच्या माधुर्याने गेल्या चार पिढ्यांचे भावविश्व रसिकतेने जपले आहे. Gajanan Watwe यांच्यापासून सुरू झालेला हा मधुर कालखंड Sudhir Phadke यांनी चित्रपटांच्या माध्यमातून आणखी फुलवला. पण चित्रपटांच्या दुनियेत फारसे न रमताही, ज्यांनी भावगीतांच्या विश्वात स्वतःचे एक स्वतंत्र युग निर्माण केले, ते अद्वितीय संगीतकार म्हणजे Shrinivas Khale. खळेंनी संत साहित्यापासून ते G. D. MadgulkarMangesh Padgaonkar अशा प्रतिभासंपन्न कवींच्या काव्याला सुरांद्वारे नवा जन्म दिला. गानभावना ओळखून अचूक स्वरांची निवड करणे हे त्यांचे वैशिष्ट्य. Ram Shyam Gunagaan या अल्बमद्वारे Bhimsen Joshi आणि Lata Mangeshkar या दोन भारतरत्न कलावंतांना एकत्र आणून त्यांनी प्रतिभेचा सर्वोच्च बिंदू गाठला. (Shrinivas Khale)

त्यांचे प्रत्येक गीत म्हणजे कौशल्याने बनवलेला सहजसुंदर दागिना आहे. खळेंची बहुतांश गाणी शांत रसातील असल्याने ती मनाला सुखद शांतता देतात. “कवितेतील अर्थ स्वरातून प्रवाही करणे एवढेच आपले काम असून, सरस्वती ते आपल्याकडून करून घेते,” अशी त्यांची नम्र भावना होती. Ya Chimanyanno Parat Phira ReEka Talyat Hoti Badake, Bagalyanchi Maal PhuleUgavala Chandra Punvecha अशी एकाहून एक सरस गीते देणारे खळे समकालीनांपेक्षा वरच्या श्रेणीचे असूनही त्यांनी संगीताला कधी स्पर्धेत तोलले नाही. संगीत ही त्यांच्यासाठी ईश्वरसाधना होती. Shrinivas Khale यांचा जन्म (30 एप्रिल 2026) मुंबईत झाला असला तरी बालपण बडोद्यात गेले. महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी स्थापन केलेल्या Indian Music College मध्ये Ustad Faiyaz KhanUstad Nisar Hussain KhanUstad Ata Hussain Khan अशा दिग्गजांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळे. खळेंचे पहिले गुरू Madhusudan Joshi हे अता हुसेन खाँसाहेबांचे शिष्य होते. १९४५ साली, वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी खळेंनी G. D. Madgulkar यांच्या Shravanatlya Tya Ratrichi Shapath Ghalte Tula या गीताला पहिली चाल बांधली. Suman Banavalikar यांच्या आवाजातील हे गाणे आकाशवाणीच्या बडोदा केंद्रावरून प्रसारित झाले आणि खळेंच्या सांगीतिक यात्रेचा प्रारंभ झाला. (Shrinivas Khale)

१९४६ मध्ये मॅट्रिक झाल्यावर त्यांना रेल्वे खात्यात स्टेशन मास्तरची नोकरी आली, पण कलावंत मनाला ते मान्य नव्हते. घरातून पळून त्यांनी मुंबई गाठली आणि K. Datta यांच्याकडे असिस्टंट म्युझिक डायरेक्टर म्हणून काम सुरू केले. याच काळात Daman चित्रपटादरम्यान त्यांची Lata Mangeshkar व Asha Bhosle यांच्याशी पहिली ओळख झाली. पुढे १९५२ मध्ये, वयाच्या २६ व्या वर्षी Lakshmipujan चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. एका रात्रीत चार चाली तयार केल्या, पण दुर्दैवाने चित्रपट बारगळला. त्यानंतर G. D. Madgulkar यांनी लिहिलेली आणि Asha Bhosle यांनी गायलेली Gori Gori Pan आणि Eka Talyat Hoti ही गाणी प्रचंड लोकप्रिय झाली आणि खळेंच्या भावगीतांचा सुवर्णकाळ सुरू झाला. (Shrinivas Khale)

लौकिक अर्थाने नाव कमवण्यासाठी खळे काकांना खूप संघर्ष करावा लागला. एकदा आकाशवाणीवर संगीतकार Shankarrao Kulkarni ऐनवेळी न आल्यामुळे खळेंना दुपारी तातडीने बोलावले गेले. तेव्हा थेट (Live) प्रसारण असायचे आणि हातात अवघे तीन तास होते. मुख्यमंत्री येणार होते. खळेंनी टॅक्सीतच गायिका Kumudini Pednekar यांना चाल समजवली, वाद्यवृंदासोबत एक तातडीची रिहर्सल केली आणि गाणे यशस्वी रित्या प्रसारित झाले. परंतु कराराप्रमाणे संगीतकार म्हणून शंकररावांचेच नाव गेले. पुढे आठ-दहा वर्षांनी खळेंनी हेच गाणे Sulochana Chavan यांच्या आवाजात ध्वनिमुद्रित केले; ते गाणे म्हणजेच प्रसिद्ध Kalidar Kapuri Paan. केलेल्या कामाचे श्रेय त्यांना उशिरा का होईना, पण मिळाले. Lata Mangeshkar आणि खळे यांची ओळख १९५० ची असली, तरी एकत्र काम करण्याचा योग १९६४ मध्ये Jivhala चित्रपटासाठी आला. G. D. Madgulkar यांच्या Ya Chimanyanno Parat Phira या गाण्याची चाल दीदींना आवडली, पण त्यांच्याकडे वेळ नसल्याने त्यांनी ते Asha Bhosle यांच्याकडून गाऊन घेण्यास सांगितले. त्यावर खळे स्वाभिमानाने म्हणाले, हे गाणे तुमचेच आहे, तुम्ही गाणार नसाल तर मी ते रद्द करतो. शेवटी दीदी तयार झाल्या आणि एक अजरामर गाणे निर्माण झाले. या गाण्यातील हार्मोनियमचा पीस आजही काळजात घर करून राहतो. (Shrinivas Khale)

गायक निवडीबाबत खळे अत्यंत चोखंदळ होते. Vasantrao Deshpande यांनी गायलेल्या Bagalyanchi Maal Phule Ajuni Ambarat या गीतातील शब्दाशब्दांमधील उत्कटता खळेंच्या स्वररचनेमुळे श्रेष्ठ दर्जाची ठरली. गायक Arun Date यांच्यासाठी तर खळे काका गॉडफादर ठरले. रामूभैय्यांचे चिरंजीव असलेले अरविंद दाते अमराठी वातावरणात वाढले होते, पण खळेंना त्यांच्यावर विश्वास होता. Mangesh Padgaonkar यांचे शब्द गाताना दाते खूप संकोचले होते, तेव्हा खळे त्यांना प्रेमाने अरू, अरू म्हणून धीर देत होते. याच गप्पांमधून अरविंदचे Arun Date झाले आणि त्यांनी गायलेले पहिले गाणे Shukra Tara Manda Vara (१९६३) मराठी भावसंगीतात नवा इतिहास घडवून गेले. या गाण्याची लोकप्रियता एवढी प्रचंड आहे की, शुक्र हा तारा नसून ग्रह आहे हे वैज्ञानिक सत्यही लोक विसरून गेले.

Mangeshkar कुटुंबाचे खळेंवर अतोनात प्रेम होते. याच विश्वासातून Lata Mangeshkar यांनी संत तुकारामांचे अभंग स्वरबद्ध करण्यासाठी खळेंची निवड केली. खळेंनी २५० अभंगांमधून निवड करत, शेवटी Vasant Bapat आणि Vidyadhar Gokhale यांच्या मदतीने १० रचना निश्चित केल्या. Anandache Dohi Anand TarangVrukshavalli Amha SoyariJethe Jato Tethe Tu Majha Sangati, Bhetalagi Jiva, Sundar Te DhyanAga Karunakara या रचनांमागे खळेंची केवढी मोठी तपश्चर्या आणि मेहनत होती, याची साक्ष या अवीट चाली देतात. कवी Mangesh Padgaonkar नेहमी म्हणायचे, आपण अडचणींनी रडत बसतो, पण परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने व्हावे, तसे खळे यांच्या आयुष्यातील दुःखांना स्पर्श करताच त्याचे सूर होतात. पाडगावकर-खळे या द्वयीने मराठी भावसंगीताला अनेक रत्ने दिली, ज्यातील Shravanat Ghananila हा त्यांच्या कारकिर्दीतील शिरपेच ठरला. हे गाणे टप्प्याटप्प्याने तयार झाले. यात Anil Mohile यांचे व्हायोलिन आणि पं. Hariprasad Chaurasia यांच्या बासरीचे पीस गाण्याला एका वेगळ्याच उंचीवर नेतात. (Shrinivas Khale)

१९७५ मध्ये Abhangwani ची रेकॉर्ड निघाली, तेव्हा पं. Bhimsen Joshi अत्यंत नम्रतेने खळे काकांचे शिष्यत्व पत्करून रचना शिकायचे. पंडितजी त्यांच्या पायाशी बसत तेव्हा खळे त्यांना अडवायचे, यावर पंडितजी म्हणायचे, आत्ता तुम्ही माझे गुरू आणि मी तुमचा शिष्य. Shrinivas Khale यांची गाणी रसिकांच्या मनात कायम रुंजी घालत राहतात. Jahlya Kahi ChukaSahaj Sakhya Ekdach Yei SanjveliKal Dehasi Ala KhauJyot Divyachi Mand TevateGele Te Din GeleNila Savala NathJevha Tuzya Batanna Udhali Mujhor VaraLala Jivhala Shabdach Khote अशी भावगीते; Maina Rani Chatur ShahaniTap Tap Padti AngavaratiKonas Thauk Kasa Pan Shalet Gela SasaGori Gori PanChandoba Chandoba Bhaglas Ka अशी बालगीते; आणि प्र. के. अत्रे यांच्या Pritisangam नाटकातील Ugavala Chandra Punvecha हे अप्रतिम नाट्यगीत, अशी त्यांची अथांग निर्मिती आहे. पं. Bhimsen Joshi यांच्या Abhangwani ने तर कित्येकांची मंगल प्रभात होते. (Shrinivas Khale)

This blog is originally published at Kalakruti Media - https://kalakrutimedia.com/shrinivas-khale-the-music-composer-who-enriched-marathi-music/

Comments

Popular posts from this blog

Celebrity Marriage : मोठ्या लोकांच्या मोठ्या गोष्टी, लग्नाच्या प्रक्षेपण हक्काचे साठ कोटी

Baapya Movie Review : नाकारण्यापासून ते स्विकारण्यापर्यंतचा प्रवास

अमिताभ बच्चन आणि नसिरुद्दीन शहा आजवर एकत्र सिनेमात का आले नाही ?