Posts

अंकुश चौधरी घेऊन येतोय ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’!

Image
  सतरा  वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘ साडे माडे तीन ‘ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाच्या निमित्ताने महाराष्ट्राचा  सुपरस्टार अंकुश चौधरी  याने दिग्दर्शनात पदार्पण केले होते. चित्रपटाची कथा,  दिग्दर्शन, कलाकार या सगळ्याच जमेच्या बाजू होत्या. त्यामुळेच प्रेक्षकांनी या चित्रपटावर भरभरून प्रेम केले. चित्रपटातील  अशोक सराफ, भरत जाधव आणि मकरंद अनासपुरे  ही कुरळे ब्रदर्सची तिकडी सगळयांनाच भावली. या तिकडीची धमाल प्रेक्षकांना आता पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर अनुभवयाला मिळणार असून लवकरच दिग्दर्शक अंकुश चौधरी ‘ पुन्हा एकदा साडे माडे तीन ‘ घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच या चित्रपटाची सोशल मीडियावरून घोषणा करण्यात आली आहे.( Punha Saade Made Teen Marathi Movie ) Bollywood masala.  ‘ पुन्हा एकदा साडे माडे तीन’  मध्ये अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव हे ‘साडे माडे तीन’मधील कलाकारच प्रमुख भूमिकेत दिसणार असून आणखी या चित्रपटात कोणते कलाकार झळकणार, हे मात्र अद्यापही गुपित आहे.  अमेय वि...

Big Boss Marathi 5: भावनांच्या या खेळात सगळे झाले भावशून्य, ‘बिग बॉस’ कोणती अॅक्शन घेणार?

Image
  ‘ बिग बॉस मराठी’ चा नवा सीझन सध्या सुरू आहे. ‘बिग बॉस’ म्हटलं की ड्रामा, मनोरंजन, भावना आणि ट्विस्ट या सर्व गोष्टी आल्याच. ‘ बिग बॉस मराठी ‘च्या कालच्या भागात पहिल्यांदाच घरात दोन चिमुकल्या पाहुण्यांची एन्ट्री झाली. बाहुल्यांना पाहून घरातील सर्व सदस्य आनंदीत झाली. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावेनासा होता. एका बाहुल्याला निक्कीने घेतले, तर एका बाहुल्याला जान्हवीने घेतले. त्यानंतर निक्की पुढे घन:श्यामला विचारते,”तू मामा आहेस ना”. घन:श्यामही निक्कीला उत्तर देत “हो..मी मामा आहे”, असं म्हणतो. त्यावर निक्की पुढे म्हणते,”बाळ माझ्यासारखं आहे”. त्यानंतर निक्कीला ‘बिग बॉस’ म्हणतात, “निक्की.. डायरेक्ट बाईSSS वरुन डायरेक्ट आईSSS” . त्यानंतर घरात एकच हशा पिकतो.(  Big Boss Marathi 5 ) Bolllywood masala . या चिमुकल्या पाहुण्यांनी सदस्यांना निरागस सुखासह टास्कचं दु:खंदेखील दिलंय. घरातील काही सदस्य बाळाची सर्वोत्तम काळजी घेताना दिसून आले. पण आजच्या भागात भावनांच्या या खेळात सदस्य भावशून्य झालेले दिसून येणार आहेत. त्यामुळे आता ‘बिग बॉस’ काय अॅक्शन घेणार हे पाहावे लागेल. चिमुकल्या पा...

अभिनेत्री तेजस्विनी पंडित ‘अहो विक्रमार्का’ या दाक्षिणात्य अॅक्शनपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार

Image
  अभिनेत्री तेजस्विनी पंडित  हिने आजवर वेगवेगळ्या भूमिकांमधून आपल्या अभिनयाचे सशक्त पैलू उलगडून दाखविले आहेत, प्रत्येक भूमिकेत स्वतःचा वेगळा ठसा उमटवणारी ही अभिनेत्री आता  ‘अहो विक्रमार्का’  या दाक्षिणात्य अॅक्शनपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार असून या चित्रपटात वीरांगणा ‘ भवानी ‘ ही महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा साकारत आहे. दिग्दर्शक राजामौली यांच्याबरोबर  सहाय्यक दिग्दर्शक  म्हणून काम केलेल्या त्रिकोटी पेटा यांच्या आगामी  ‘अहो विक्रमार्का’  या चित्रपटात अनेक मराठी कलाकार झळकणार आहेत. देव गिल प्रॉडक्शन अंतर्गत  ‘अहो विक्रमार्का’  मराठी व्यतिरिक्त इतर ५ भाषांमध्ये मोठ्या पडद्यावर  ३० ऑगस्ट ला प्रदर्शित होणार आहे.( Tejaswini Pandit in Aho Vikramarka ) Bollywood tadka आपल्या या भूमिकेबद्दल बोलताना  तेजस्विनी  सांगते की, ‘कोणत्याही नवीन प्रोजेक्ट मध्ये काम करताना कलाकारांसाठी त्यातील आव्हान ही सुखावह असतात. त्यातही आपली मातृभाषा नसलेल्या इतर चित्रपटांमध्ये काम करताना हे आव्हान अधिक कठीण असते. ‘ अहो विक्रमा...

पुष्कर जोग दिग्दर्शित ‘धर्मा- दि एआय स्टोरी’ १८ ऑक्टोबरला येणार भेटीला

Image
  मराठी सिनेसृष्टीतील पुष्कर जोग हा एक अभिनेता म्हणून आपल्याला चांगलाच माहित आहे. मराठी बिग बॉस मध्ये ही त्याने हजेरी लावली होती. आता पुष्कर दिग्दर्शकाच्या भूमिकेतुन समोर येत एक नवा सिनेमा आपल्या भेटीला घेऊन येत आहे.  ‘धर्मा-दि एआय स्टोरी’ असं या सिनेमाचं नाव आहे.  ( Dharma The AI Story Movie ) Bollywood tadka आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर भाष्य करणाऱ्या  ‘धर्मा-दि एआय स्टोरी’  या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख सोशल मीडियावर जाहीर करण्यात आली असून हा चित्रपट येत्या  १८ ऑक्टोबर  रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित असलेल्या या पहिल्या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन पुष्कर सुरेखा जोग यांनी केले असून बियु प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटाच्या तेजल पिंपळे निर्मात्या आहेत. यात  पुष्कर सुरेखा जोग, दीप्ती लेले आणि स्मिता गोंदकर  यांच्या प्रमुख भूमिका आहेत. पुष्कर जोगने मराठी सिनेसृष्टीला नेहमीच वेगळे, नवीनपूर्ण चित्रपट दिले आहेत. त्यांच्या प्रत्येक चित्रपटाची काही खासियत असते. त्यामुळे या चित्रपटाही प्रेक्षकांना काहीतरी नवी...

बॅालिवूडमधील शाहबाज खान आणि टिनू वर्मा मराठी सिनेमात खलनायकाच्या रुपात दिसणार…

Image
  चित्रपटामध्ये नायकाप्रमाणेच खलनायकालाही तितकेच महत्त्व आहे. खरंतर या खलनायकांमुळेच नायकाचे अस्तित्व असते असे म्हटल्यास वावगे ठरू नये. आजवर बऱ्याच कलाकारांनी खलनायकी भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात दहशत निर्माण करण्याचं काम केलं आहे. आपल्या अनोख्या शैलीमुळे खलनायकी भूमिका साकारणारे कलाकार तर नायकांइतके लोकप्रियही झाले आहेत. आगामी  ‘फौजी’  या मराठी चित्रपटात हिंदीतील  शाहबाज खान आणि टिनू वर्मा  या दोन सशक्त अभिनेत्यांची झलक आपल्याला खलनायकाच्या रुपात दिसणार आहे. हिंदी चित्रपटांचा पडदा गाजविल्यानंतर आता मराठी चित्रपटातही ते आपला खलनायकी अवतार दाखविण्यास सज्ज झाले आहेत. मातृपितृ फिल्म्स् प्रस्तुत  घनशाम विष्णुपंत येडे  निर्मित- लिखित-दिग्दर्शित  ‘फौजी’  हा मराठी चित्रपट येत्या  ३० ऑगस्ट ला चित्रपटगृहात दाखल  होत आहे.( Fauji Marathi Movie 2024 ) Bollywood masala ‘ फ़ाइट मास्टर ’ म्हणून टिनू वर्मा यांची हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतंत्र ओळख आहे.  शाहबाज खान यांनी  छोट्या आणि मोठ्या पडद्यावर अनेक लोकप्रिय खलनायकी भूमिका साका...

अभिनेत्री अमृता खानविलकर करणार ‘वर्ल्ड ऑफ स्त्री’मधून भव्य नाट्यपदार्पण

Image
  अमृतकला स्टुडिओ आणि ‘ अर्थ ‘ एनजीओ प्रस्तुत ‘ वर्ल्ड ऑफ स्त्री ‘ हा अनोखा नृत्याविष्कार घेऊन  अमृता खानविलकर  रसिकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाली आहे. पहिल्यांदाच एखादी अभिनेत्री एका स्वयंसेवी संस्थेसोबत संलग्न होत, नृत्यकलेच्या माध्यमातून स्त्रीशक्तीचे अनोखे रूप सादर करणार आहे. यात  शृंगार, भक्ती, शक्ती आणि स्त्री तत्त्व  यांचा समावेश आहे. आपल्या सहजसुंदर अभिनयाने अमृता खानविलकरने प्रेक्षकांना आपलेसे केले आहे. ती एक उत्कृष्ट नृत्यांगना आहे, हे आपल्याला माहीतच आहे. तिचा नृत्याविष्कार रसिकांनी अनेकदा पाहिला आहे. असाच एक अनोखा नृत्य नजराणा अमृता खानविलकर ‘ वर्ल्ड ऑफ स्त्री ‘ च्या माध्यमातून घेऊन येत आहे.( Actress Amruta Khanvilkar ) Bollywood tadka . या निमित्ताने तिचे थेट प्रेक्षकांसमोर नृत्यप्रयोग सादर करण्याचे स्वप्न साकार होत आहे. या नृत्यप्रयोगाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रेक्षकांना क्लासिकल, सेमी क्लासिकल म्युझिक आणि नृत्याची अनोखी मैफल अनुभवयाला मिळणार आहे. या कलाकृतीत  स्त्रीशक्ती, महिला सक्षमीकरण, शृंगार, भक्ती  यांचे दर्शन घडणार आहे.  यात ...

‘सुपरस्टार सिंगर’ रंगणार सोनी मराठीवर; जाणून घ्या तुमच्या आवाजातील ऑडिशन्स पाठवाण्याच्या सर्व डिटेल्स

Image
  महाराष्ट्रातील नव्या दमाच्या युवा गायकांना  व्यासपीठ  उपलब्ध  करून देत, संगीताचा ‘ सुरेल ‘ नजराणा रसिकांना  देणारा ‘ सुपरस्टार सिंगर ‘ हा नवा कार्यक्रम  सोनी मराठी  वाहिनीवर लवकरच रंगणार आहे. सोनीच्या हिंदी वाहिनीवरील ‘ सुपरस्टार सिंगर ’ या कार्यक्रमाच्या तीनही  सिझनला उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर आता हा कार्यक्रम सोनी मराठी वाहिनीवर रंगणार आहे. नुकताच या कार्यक्रमाचा एक आकर्षक प्रोमो रिलीज  झाला आहे. त्यामुळे नव्या  मराठी संगीत पर्वाबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.( Superstar Singer Sony Marathi ) Bollywood tadka ‘ ताल, लय आणि सूर  यांची बहारदार मैफिल रंगणार कारण, अवघा महाराष्ट्र ऐकणार आवाज उद्याचा’  ‘सुपरस्टार सिंगर’  अशा टॅग लाईनसह आलेल्या या धमाकेदार कार्यक्रमाची आणि सदाबहार गाण्यांची सुरेल  पर्वणी महाराष्ट्राच्या रसिकांना मिळणार आहे. एक ...