ऑरीने दीपिका पादुकोणच्या बेबी बंपवर हात ठेऊन दिली सिग्नेचर पोज; चाहत्यांनी पाडला कमेंटचा पाऊस

 


सोशल मीडियावर प्रेग्नंट दीपिका पादुकोणचा एक फोटो समोर आला आहे, ज्यावर चाहत्यांच्या चर्चा रंगल्या असुन त्या फोटोवर खुप कमेंट्स ही येत आहेत. सोशल मीडियावर तो फोटो चांगलाच व्हायरल ही होत आहे. खरं तर या फोटोत दीपिका पदुकोण ओरी आणि पती रणवीर सिंगसोबत दिसत आहे. ओरीने गरोदर दीपिकाच्या बेबी बंपवर हात ठेवला आहे. आणि त्याने अभिनेत्रीच्या गर्भातील बाळाला आशीर्वाद दिला आहे. हा क्यूट फोटो ओरीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. दीपिका पदुकोण, रणवीर सिंग आणि ओरी यांचा हा फोटो राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनचा आहे. नुकतेच हे कपल अनंत आणि राधिकाच्या संगीत आणि हळदी सोहळ्याला उपस्थित होते. या फोटोला तासाभरात हजारो कमेंट्स आणि लाखो लाइक्स ही मिळाले आहेत.(Orry with Deepika Photo)

Orry with Deepika Photo

ओरीने इन्स्टाग्राम हँडलवर एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यात तो रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण सोबत दिसत आहे. या फोटोमध्ये ओरीने दीपिका पदुकोणच्या बेबी बंपवर हात ठेवून त्याची सिग्नेचर पोज दिल्याचे पहायला मिळत आहे. तर त्याच्या शेजारी उभ्या असलेल्या रणवीर सिंगने आपले दोन्ही हात ओरीच्या खांद्यावर ठेवून पोझ दिली आहे. दीपिका पादुकोणने तिचा बेबी बंप दाखवला असून तिच्या चेहऱ्यावर प्रेग्नेंसी ग्लो ही स्पष्ट दिसत आहे. हा फोटो शेअर करताना ओरीने कोणतेही कॅप्शन लिहिलेले नाही, पण दीपिका पदुकोणच्या सौंदर्याने उपस्थितांना भुरळ घातली आहे. फोटोमध्ये ती जांभळ्या रंगाच्या साडीत सुंदर दिसत आहे. तिने आपले केस घट्ट बनमध्ये बांधले आहेत आणि दागिन्यांसह ती एकदम परफेक्ट ब्युटी दिसत आहे.

Orry with Deepika Photo

एका चाहत्याने दीपिका आणि ओरीच्या फोटोवर चाहत्यांच्या खुप कमेंट येत आहेत. तसेच चाहत्यांनी दिपिकाच्या फोटोवर लाइक्सचा पाऊस पाडला आहे. एका चाहत्याने या फोटोवर कमेंट करताना लिहिले आहे की, “शेवटी बाळाला आशीर्वाद मिळाला”.तर आणखी एका चाहत्याने लिहिले आहे की, हा खुप सुंदर फोटो आहे.”(Orry with Deepika Photo)

====================================

हे देखील वाचा: Thangaalan Trailer: चियान विक्रम स्टारर ‘थंगलन’चा धमाकेदार ट्रेलर रिलीज

====================================

एका मुलाखतीत आॅरीने सांगितले होते की तो पार्टीत एखाद्यासोबत फोटो काढून पोस्ट करण्यासाठी २० ते ३० लाख रुपये घेतो. तसेच त्याच्या स्पर्शाने आजार आणि सर्व प्रकारच्या आरोग्याच्या समस्या दूर होतात, असा दावाही त्याने या मुलाखतीत केला होता.

Original content is posted on: https://kalakrutimedia.com/orry-posts-pic-touching-deepika-padukones-baby-bump-in-signature-pose-info/

Comments

Popular posts from this blog

Diljit Dosanjh पंजाब इंडस्ट्री गाजवणारा दिलजीत दोसांझ ‘असा’ बनला बॉलिवूडमधील टॉपचा अभिनेता

Oscar 2025 : कुठे पाहाल ऑस्कर सोहळा? ‘या’ भारतीय चित्रपटांकडे लागलंय लक्ष

Aamir Khan : आमिर खानचे हे दोन चित्रपट पडद्यावर यायला हवे होते