तृप्ती डिमरी साकारणार परवीन बाबीची भूमिका? बायोपिकमध्ये समोर येणार अभिनेत्रीच्या आयुष्यातील खास गोष्टी

 


परवीन बाबी 70 च्या दशकातील सर्वात ग्लॅमरस अभिनेत्री मानली जायची. बॉलिवूडमध्ये कधी बोल्ड अभिनेत्रींचं नाव घेतलं तर त्यात परवीन बॉबीचं नाव नक्कीच येतं, 70 च्या दशकात ती आपल्या काळातील सर्वात ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्री मानली जायची. परवीन तिच्या फॅशन आणि तिच्या कूल स्टाईलमुळे बरीच चर्चेत आली होती आणि त्याचबरोबर तिच्या दमदार अभिनयामुळे तिचा लोकांमध्ये खास ठसा उमटला होता. वैयक्तिक आयुष्यात सुरू असलेल्या वादळामुळे त्यांनी लवकरच जगाचा निरोप घेतला असला तरी लोक आजही त्यांची आठवण काढतात. अशातच आता तिच्या आयुष्यावर बायोपिक बनणार असून त्यासाठी एका अभिनेत्रीचा शोध घेतला जात असून या यादीत अॅनिमल फेम तृप्ती डिमरीचे नाव अग्रस्थानी येत आहे.(Tripti Dimri in Parveen Babi Biopic) Bollywood tadka



अॅनिमल‘ चित्रपटापासून तृप्ती डिमरीचे स्टार्स वाढत आहेत. अॅनिमल या चित्रपटानंतर तिला ‘भाभी २’ हा टॅग मिळाला आहे. नुकतीच ती ‘बॅड न्यूज‘ या चित्रपटात झळकली होती. याशिवाय आगामी काळात ही अभिनेत्री ‘भूल भुलैया ३‘ या चित्रपटात झळकणार आहे. दरम्यान, तृप्तीला बायोपिक मिळाल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समधून केला जात आहे. फिल्मफेअरच्या रिपोर्टनुसार, तृप्ती डिमरी परवीन बाबीच्या बायोपिकमध्ये दिसू शकते, तिच्या नावाची चर्चा आहे. यात ती मुख्य भूमिकेत दिसत आहे. मात्र, अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. यापूर्वी ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी उर्वशी रौतेलाचे नाव पुढे येत होते. पण, आता तृप्तीच्या नावाची चर्चा आहे.

Tripti Dimri in Parveen Babi Biopic

परवीन बाबी यांचे चरित्र लेखिका करिश्मा उपाध्याय यांनी लिहिले आहे. या चरित्रावर आधारित हा चित्रपट बनवला जाणार असल्याचे बोलले जात आहे. 1970 ते 1980 या काळात परवीन बाबी अनेक हिट चित्रपटांचा भाग होत्या. मात्र, वैयक्तिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही आयुष्यात त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले.(Tripti Dimri in Parveen Babi Biopic)

==============================

हे देखील वाचा: नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांचा साखरपुडा, नागार्जुन यांनी फोटो शेअर करत चाहत्यांना दिला आश्चर्याचा धक्का

==============================

तृप्ती डिमरीबद्दल बोलायचे झाले तर तिने ‘पोस्टर बॉईज‘ या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. ‘अॅनिमल‘ चित्रपटानंतर तिच्या कारकिर्दीला इतकी गती मिळाली की ती आता प्रत्येक दिग्दर्शकाच्या आवडत्या यादीत आली आहे. Bollywood tadka.

Original content is posted on: https://kalakrutimedia.com/trupti-dimri-to-play-parveen-babi-the-biopic-will-reveal-special-things-about-the-actress-life-info/

Comments

Popular posts from this blog

'Zimma 2' re-opens old relationship

The presence of the Vice President at the premiere of Guru Dutt's film

This is an important reminder of 'Qayamat'