PSI Arjun Teaser: ‘पी.एस.आय. अर्जुन’ येतोय राडा घालायला; ‘थांब म्हटलं की थांबायचं…सध्या ट्रेंडिंगमध्ये
PSI Arjun Marathi Movie: सध्या एका पोस्टरची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु असून ही चर्चा दुसरी तिसरी कोणाची नसून महाराष्ट्राचा सुपरस्टार अंकुश चौधरीची आहे. ‘पी. एस. अर्जुन’च्या भूमिकेत अंकुश चौधरी राडा घालायला येतोय. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक पोस्टर शेअर करत ‘अर्जुन माझ्या नावात… वर्दी माझी जोमात… गुन्हेगार कोमात…! अशी जबरदस्त कॅप्शन दिली आहे. अंकुशचा पोलिसांच्या वर्दीतील हा डॅशिंग लूक कमाल दिसत असून ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटानंतर दोन वर्षांनी अंकुश प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे.(PSI Arjun Marathi Movie Teaser) Latest Marathi Movies
नुकताच या चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून ९ मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘पी.एस.आय.अर्जुन’ या चित्रपटात अंकुश पहिल्यांदाच रुबाबरदार पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. अंकुशला अशा नव्या रूपात बघून त्याचे चाहतेही भलतेच सुखावले आहेत. इतकेच नाही बॉलिवूडमधील आपला मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख यालाही अंकुशच्या या नव्या लूकने भुरळ घातली आहे. Bollywood Masala
अंकुशची आकर्षक पर्सनॅलिटी आणि फॅशन सेन्समुळे तो तरुणाईमध्ये विशेष लोकप्रिय आहेच. स्टाईल आयकॉन असलेल्या अंकुशला ‘ट्रेंड सेटर’ म्हणायलाही काहीच हरकत नाही. बऱ्याच चित्रपटातील त्याचे डायलॉग्स प्रचंड गाजले आहेत. आताही ‘पी.एस.आय.अर्जुन’ मधील असाच एक डायलॉग सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे, तो म्हणजे ‘थांब म्हटलं की थांबायचं… या दमदार डायलॉगने सध्या अनेकांना वेड लावलं आहे. तरुणाई यावर रील्स बनवत आहेत. त्यामुळे अंकुश एका अनोख्या अंदाजात यात झळकणार असल्याचे दिसतेय! (PSI Arjun Marathi Movie Teaser)
====================================
====================================
व्हिस्ट्रोमॅक्स सिनेमा, ड्रिमविव्हर एंटरटेनमेंट निर्मित ‘पी.एस.आय.अर्जुन’चे भूषण पटेल दिग्दर्शक आहेत तर विक्रम शंकर आणि ध्रुव दास निर्माते आहेत. येत्या ९ मे रोजी ‘पी. एस. आय. अर्जुन‘ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Bollywood Tadka
Original content is posted on https://kalakrutimedia.com/psi-arjun-marathi-movie-teaser-released-info/
Comments
Post a Comment