Bigg Boss Marathi 6: “मुXX, चल हट…” बिग बॉसच्या घरात जेवणाच्या मुद्द्यावरून राखी आणि सागर मध्ये तूफान राडा; नव्या प्रोमोने वाढवली उत्सुकता
बिग बॉस मराठीचा सीझन ६ (Bigg Boss Marathi 6) प्रेक्षकांच्या मनावर कब्जा करत आहे. घरात प्रत्येक आठवड्याचे ट्विस्ट आणि टास्क घरातील वातावरण अधिकच तणावपूर्ण बनवत आहेत. सध्या घरात दहाव्या आठवड्याची नॉमिनेशन प्रक्रिया सुरु आहे, आणि स्पर्धक दररोज नव्या-नव्या टास्कमध्ये आपापली ताकद सिद्ध करत आहेत. या आठवड्याच्या टास्कमध्ये कॅप्टन संकेतला (Sanket Pathak) बिग बॉसकडून विशेष पॉवर दिली गेली आहे, ज्यामुळे त्याला घरातील एका सदस्याला थेट नॉमिनेट करण्याचा अधिकार मिळाला आहे.
कलर्स मराठीने नुकताच शेअर केलेल्या प्रोमोमध्ये घरातील किचन एरियामध्ये राखी सावंत (Rakhi Sawant) आणि सागर कारंडे (Sagar Karande) यांचा जोरदार भांडणपाहायला मिळत आहे. वाइल्ड कार्ड एंट्री नंतर राखी घरातील जेवणाची ड्युटी सांभाळत आहे. प्रोमोमध्ये ती ओरडून सांगते, “आता मी जेवण बनवतेय.. त्यामुळे चहा बनवायचा नाही,” आणि तेवढ्यात सागर येतो आणि रागात म्हणतो, “उगाच ओरडू नको.” या छोट्या गोष्टीमुळे दोघांमध्ये राडा सुरू होतो.
भांडण इतकं वाढतं की राखी रागात जेवणाचा टोप उचलून म्हणते, “मी सगळं जेवण टाकून देईन,” आणि घरातील इतर सदस्य तिला शांत करण्याचा प्रयत्न करतात. प्रोमोमध्ये दिसतं की राखी सागरवर हात उगारण्याचा प्रयत्न करते, तर सागर तिला शांत राहण्यासाठी म्हणतो, “मला हात लावायचा नाही.”
यामुळे घरातील वातावरण आणखी तणावपूर्ण बनते,आणि राकेश व विशाल तिला पकडून ठेवून परिस्थिती नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतात. घरातला हा राडा फक्त व्यक्तीगत भांडणापुरता मर्यादित नाही, तर सध्याच्या नॉमिनेशन प्रक्रियेवरही परिणाम करू शकतो. बिग बॉसच्या घरातील हे वाइल्ड कार्ड ड्रामा प्रेक्षकांना खूप रोमांचक वाटणार आहे. आजच्या टास्कमध्ये राखी आणि सागर यांचा राडा पाहून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचेल, आणि सोशल मीडियावर ह्या घटनेबाबत चर्चा सुरू राहील, यात शंका नाही.
Comments
Post a Comment