Phula Marathi Movie Teaser: वाघ्या-मुरळीच्या पारंपरिक लोकसंस्कृतीची भाष्य करणाऱ्या ‘फुला’ चित्रपटाचा टीजर लाँच!

 वाघ्या-मुरळी परंपरेच्या पार्श्वभूमीवर आधारित असलेल्या “फुला” (Phula) या मराठी चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून त्याने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. दमदार आवाजासाठी ओळखले जाणारे सुबोध भावे (Subodh Bhave) यांच्या निवेदनामुळे टीझरला एक वेगळीच उंची मिळाली आहे. येत्या १७ एप्रिल रोजी चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने त्याबाबतची उत्सुकता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. विशेष म्हणजे, आटपाडी येथील काही तरुणांनी एकत्र येऊन या वेगळ्या विषयाला पडद्यावर आणण्याचा प्रयत्न केला आहे.

या चित्रपटाची निर्मिती पैलवान अजित शिवाजी जाधव (Pailwan Ajit Shivaji Jadhav)यांनी केली असून शिवशर्विल मूव्ही आणि बोधी सिनेमा यांच्या माध्यमातून तो सादर केला जात आहे. कथालेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारी अभिषेक जावीर यांनी सांभाळली आहे, तर पटकथा रवीकिरण जावीर यांनी लिहिली आहे. संगीत दिग्दर्शन समाधान ऐवळे यांचे असून सर्जनशील दिग्दर्शन अमर देवकर यांनी केले आहे. गीतलेखनात रवीकिरण जावीर आणि समाधान ऐवळे यांचा सहभाग आहे. छायांकन प्रताप जोशी यांनी केले असून निर्मिती रचना अतुल लोखंडे यांनी साकारली आहे. संकलनाची धुरा राहुल प्रजापती यांनी सांभाळली आहे. 

चित्रपटातील गाण्यांना वैशाली सामंत, वैशाली माडे, रोहित राऊत, रवींद्र खोमणे, वैशाली कुलकर्णी, वैष्णवी आदोडे आणि आकाश नवगिरे यांनी आपला आवाज दिला आहे. नृत्यदिग्दर्शन आशुतोष कीर्तिकर आणि सृष्टी जाधव यांचे आहे, तर वेशभूषा कोमल जावीर आणि अक्षता पाटील यांनी केली असून रंगभूषेची जबाबदारी समाधान भोरे यांनी पार पाडली आहे.

“फुला” ही कथा एका मुरळीच्या पोटी जन्मलेल्या निरागस मुलीभोवती फिरते, जी आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष करताना दिसते. तमाशा फड, जागरण-गोंधळ यांसारख्या लोकपरंपरांवर आधारित हा चित्रपट महाराष्ट्राच्या सांस्कृतिक मुळांशी जोडलेला आहे. टीझरमध्ये साखळदंडांनी बांधलेली आणि जमिनीवर पडलेली मुलगी, तिच्या भोवती पसरलेली हळद आणि पार्श्वभूमीवर संस्कृत श्लोकांनी सुरू होणारा गंभीर स्वर—ही दृश्यरचना प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडते. पुढे उलगडणाऱ्या दृश्यांतून चित्रपटाची मांडणी किती प्रभावी असेल याची झलक मिळते. समाज एका मुलीच्या अस्तित्वाकडे कसा पाहतो, हा केंद्रबिंदू या कथेतून मांडला जाणार असून, टीझरनेच प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता चांगलीच पेटवली आहे.

    this post was originally published on https://kalakrutimedia.com/phula-marathi-movie-teaser-released-a-powerful-story-on-waghya-murali-folk-tradition-info/

Comments

Popular posts from this blog

Diljit Dosanjh पंजाब इंडस्ट्री गाजवणारा दिलजीत दोसांझ ‘असा’ बनला बॉलिवूडमधील टॉपचा अभिनेता

Sant Dnyaneshwaranchi Muktai: ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर आणि दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडला ज्ञानेश्वरीचा सुरेल सोहळा !

आता मी हिंदीत बोलू?”; मराठीत बोलत असतानाच Kajol का भडकली?