Riteish Deshmukh : “महाराजांबद्दल अपशब्द वापरलेले कोणीही खपवून घेणार नाही”

 एकीकडे मराठी चित्रपटसृष्टीतील १०० कोटींचा पहिला वहिला ‘राजा शिवाजी’ चित्रपट प्रदर्शित लवकरच होणार आहे… तर दुसरीकडे पुन्हा एकदा महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. ३८ वर्षांपूर्वी प्रकाशित झालेल्या ‘शिवाजी कोण होता?’ या मराठी पुस्तकाच्या शीर्षकावरून हा वाद निर्माण झाला असून आता यावर अभिनेता-दिग्दर्शक रितेश देशमुख याने तीव्र संताप सोशल मिडियावरुन व्यक्त केला आहे.

रितेश देशमुखने सोशल मिडियावर पोस्ट शेअर करत लिहिलं आहे की, ‘कोणीतरी येतो आणि आपल्या आराध्य दैवताबद्दल काहीतरी विकृत बरळतो, एक शिवप्रेमी-शिवभक्त म्हणून हे अमान्य आणि संतापजनक आहे. असले चौकटीत अडकवण्याचे फोल प्रयत्न काळाच्या उदरात गडप होतील. पण सह्याद्रीच्या पर्वतरांगा जशा लाखो वर्ष आधी होत्या तसंच ‘ते’ एकच नाव करोडो वर्ष भविष्यातही राहील. आणि ते नाव म्हणजे..प्रौढप्रतापपुरंदर…क्षत्रियकुलावतंस… सिंहासनाधिश्वर… महाराजाधिराज… श्रीमंत राजाशिवछत्रपती महाराज.’ असं रितेशनं पुढे म्हटलं आहे.

तसेच, माध्यमांशी संवाद साधताना रितेश असं देखील म्हणाला होता की, ‘मी काही थेट ऐकलेलं नाही, मला ते विषय माहीत नाहीत, मात्र, महाराजांबद्दल अपशब्द वापरलेले कोणीही खपवून घेणार नाही’. त्यामुळे आता हा वाद आणखी कोणतं वळण घेणार आणि आपल्या आराध्य दैवतांबद्दलची अशी आक्षेपार्ह विधानं व्यक्त करणं कधी बंद होणार हे पाहणं अत्यंत महत्वाचं आहे…

दरम्यान, १ मे २०२६ रोजी महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधत रितेश देशमुख दिग्दर्शित व अभिनित राजा शिवाजी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे… या चित्रपटात बॉलिवूडचे अनेक कलाकार असून काही जणांनी मराठीत डेब्यु केला आहे… चित्रपटात अभिषेक बच्चन, संजय दत्त, सलमान खान, भाग्यश्री, जिनिलिया देशमुख, विद्या बालन, बोमन इराणी, जितेंद्र जोशी, महेश मांजरेकर आणि अनेक कलाकारांच्या महत्वपूर्ण भूमिका असणार आहेत… मराठीसह हिंदी आणि तेलुगू भाषेत ‘राजा शिवाजी’ चित्रपट रिलीज होणार आहे…

this blog was originally published on https://kalakrutimedia.com/riteish-deshmukh-raja-shivaji-movie/

Comments

Popular posts from this blog

Celebrity Marriage : मोठ्या लोकांच्या मोठ्या गोष्टी, लग्नाच्या प्रक्षेपण हक्काचे साठ कोटी

Sant Dnyaneshwaranchi Muktai: ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर आणि दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडला ज्ञानेश्वरीचा सुरेल सोहळा !

आता मी हिंदीत बोलू?”; मराठीत बोलत असतानाच Kajol का भडकली?