National Sports Day : राष्ट्रीय क्रीडा दिवस २९ ऑगस्ट
चित्रपट आणि खेळ यांचेही एक वैशिष्ट्यपूर्ण आणि दीर्घकालीन बहुस्तरीय नातं आहे. कृष्ण धवल अर्थात Black and White चित्रपटाच्या काळापासून ते आहे. कधी गाण्याच्या रुपात (Subodh Mukherjee दिग्दर्शित १९५९ सालच्या Love Marriage या चित्रपटातील Mala Sinhaला उद्देशून Dev Anand गातो, Ek Nazar Mein Dil Bechara X Ho Gaya LBW), कधी विशिष्ट कालखंडावरील चित्रपट (Aamir Khan Productionsचा Ashutosh Gowariker दिग्दर्शित Lagaan या चित्रपटात दीडशे वर्षांपूर्वी एका दूरवरच्या खेड्यात भुवनच्या नेतृत्वाखाली गावकऱ्यांनी चाणाक्ष, धूर्त, कावेबाज इंग्रजांविरुद्ध क्रिकेट खेळून सामना जिंकून आपला सातबारा माफ करुन घेतला). (National Sports Day)
एका ऐतिहासिक विजयावरील चित्रपट (१९८३ साली इंग्लंडमधील लॉर्डस मैदानावर बलाढ्य अशा वेस्ट इंडिज संघावर भारतीय क्रिकेट संघाने विजय प्राप्त केला यावरचा Kabir Khan दिग्दर्शित 83 चित्रपट. Ranveer Singhने कपिल देव साकारण्यासाठी घेतलेली मेहनत पडदाभर दिसते. खुद्द कपिल देवने तर याच कौतुक केले.या चित्रपटाची निर्मिती Deepika Padukone आणि Sajid Nadiadwala यांची आहे.), क्रिकेटपटूच्या आयुष्यावर आधारित चरित्रपट (कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनी याच्या जडणघडणीवर आधारित Neeraj Pandey दिग्दर्शित MS Dhoni: The Untold Story. Sushant Singh Rajput याची धोनी साकारण्यासाठीची निष्ठा आणि मेहनत अतिशय कौतुकास्पद.) असे अनेक चित्रपट आले आणि यापुढेही येतील. आपल्या देशातील अगदी खालच्या माणसापर्यंत पोहोचलेल्या हुकमी गोष्टी म्हणजे चित्रपट आणि क्रिकेट. यामुळे यांचे विविध स्वरूपात एकत्र येणं हे सतत सुरुच असते. (National Sports Day)
क्रिकेटशिवाय अन्य खेळांचेही चित्रपटाच्या रुपेरी पडद्यावर दर्शन घडले आहे आणि असाच एक खेळ म्हणजे हॉकी. याच हॉकी खेळातील आघाडीचे खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या २९ ऑगस्ट रोजीच्या जयंतीनिमित्त हा दिवस ‘राष्ट्रीय क्रीडा दिवस’ म्हणून ओळखला जातो. अर्थात, कब्बडी खेळापासून बॅडमिंटन खेळापर्यत सगळ्याच खेळांसाठी हा राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा केला जातो. खेळातून मानसिक भावनिक शारीरिक तयारीचेही बळ मिळते. (National Sports Day)
आणि आपल्या देशातील मराठी व हिंदी चित्रपटासह सर्वच भाषांतील चित्रपटांत कधी पटकथेनुसार, तर कधी एखाद्या दृश्यानुसार खेळाचे दर्शन घडलं आहे. चित्रपटाच्या नावातही (Patto Ki Baazi वगैरे वगैरे) खेळ मांडला आहे आणि खेळाडूंनी चित्रपटात भूमिकाही साकारली आहे ( क्रिकेटपटू Sandeep Patil याने Vijaysinh Patwardhan दिग्दर्शित Kabhi Ajnabi The या चित्रपटात चक्क नायकाची भूमिका साकारली). आणि चित्रपट कलाकारांचा भारतीय क्रिकेट लीगमध्ये संघही आहे (Shah Rukh Khanचा कोलकोत्ता नाईट रायडर्स हा संघ). काही क्रिकेटप्रेमी कलाकारांनी स्टेडियममध्ये बसून रोमहर्षक सामना एन्जॉय केला आहे (Laxmikant Berde आपण वानखेडे स्टेडियमवर एन्जॉय केलेल्या क्रिकेट सामन्यावर अतिशय भरभरून मनसोक्त मनमुराद बोलत असे. या एका गोष्टीवर एकदा मी त्याची झक्कास मुलाखत घेतली होती), खेळाडू आणि लग्न हेही सुखी संसाराचे घट्ट नाते आहे (Mansoor Ali Khan Pataudi आणि Sharmila Tagore यांच्या यशस्वी संसार गाथेपासून अनेक उदाहरणे आहेत). (National Sports Day)
चित्रपटाच्या पडद्यावरील हॉकी म्हटले की सर्वप्रथम डोळ्यासमोर येतो, Shimit Amin दिग्दर्शित Chak De! India (२००७) हा चित्रपट. Shah Rukh Khanच्या सर्वोत्तम चित्रपटातील हा एक महत्वाचा चित्रपट. हाॅकीपटू कबीर खान यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. देशद्रोही असल्याचे झालेले आरोप आणि प्रचंड मनस्ताप दिलेल्या त्याच आरोपातून आपली करुन घेतलेली सुटक आणि भारतीय हाॅकी संघाला पुन्हा वैभव मिळवून दिले याभोवती हा मनोरंजनाच्या माध्यमातून साकारलेला चित्रपट रसिकांना आवडला. (National Sports Day)
हाॅकी खेळावरचा आणखी एक विशेष चित्रपट Shad Ali दिग्दर्शित Soorma (२०१८). हा चित्रपट हाॅकीपटू संदीप सिंह यांच्या आयुष्यावर आधारित आहे आणि त्यात Diljit Dosanjh आणि Taapsee Pannu यांच्या प्रमुख भूमिका आहेत. Reema Kagti लिखित आणि दिग्दर्शित Gold (२०१८) या चित्रपटात १९४८ साली भारतीय हाॅकी संघाने ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावले यावरचा चित्रपट आहे. Akshay Kumarने या चित्रपटातील भूमिकेसाठी भरपूर मेहनत घेतली. (National Sports Day)
आपल्या देशात खेळात सर्वाधिक लोकप्रियता क्रिकेटला आहे. गल्ली चित्रपटापासून ते आता शंभर चेंडूचा सामना असं बरेच काही आहे. कसोटी क्रिकेटवर भरभरून प्रेम करणारा अतिशय मोठा वर्ग समाजात आहे. तुलनेने हाॅकी खेळ दिल्ली, पंजाब येथे अधिक प्रमाणात लोकप्रिय आहे. पण चित्रपटाच्या माध्यमातून तो खेळ अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोनातून प्रयत्न झाले असे म्हणता येईल… राष्ट्रीय क्रीडा दिवसाच्या निमित्ताने हीच गोष्ट अधोरेखित होते. (National Sports Day)
The original blog is posted at Kalakruti Media. To read more, click here - https://kalakrutimedia.com/national-sports-day-august-29/






Comments
Post a Comment