Raanjhanaa: रांझना चित्रपट नाही,तर कविता आहे !
Zoyaने मला बघावं, माझ्याशी बोलावं यासाठी कुंदन तडफडत असतो. तो तिच्याशी contact करायला जातो, पण कानाखाली खाऊन परततो. तरीही त्याची ती attachment काही कमी होत नाही, परत तिच्या मागेच जातो. मग येते तिसरी आणि सर्वात महत्त्वाची स्टेज… मुहब्बत… Love! Kundanला आता होतं प्रेम आणि तो Raanjhanaa Hua Main Tera करायला लागतो. जिथे Bindiya Kundanसाठी पागल असते, तिथेच कुंदन झोयाच्या प्रेमात पार बुडालेला असतो. म्हणजे आता तिच्यासाठी तो काहीही करायला तयार असतो. मग येते चौथी स्टेज अकीदत… Trust, विश्वास! झोयाला arranged marriage करायचं नसतं, त्यामुळे ती कुंदनची मदत घेते, कारण तिला माहिती असतं, हा सतत माझ्या मागावर असतो आणि हा पण तिच्यावर विश्वास सोडून देतो आणि ती जे सांगेल ते करत जातो.(Raanjhanaa)
आता यानंतरची म्हणजेच पाचवी स्टेज येते, इबादत… त्या व्यक्तीची पूजा करणं! त्याला कळतं ती दुसऱ्या कुणावर तरी प्रेम करते. पण आता कुंदन तिचा पुजारी झालेला असतो. पण त्याला ते प्रेम बळजबरीने मिळवायचं नसतं. तर तो तिला तिचं प्रेम मिळावं, यासाठी प्रयत्न करायला लागतो, तिच्या सुखातच त्याचं सुख असतं. आता येते… सहावी स्टेज जुनून… झोयासाठीचा वेडेपणा… Mohe Piya Milenge… झोयाच्या आयुष्यात जे उतारचढाव येतात, त्यामुळे तो आता स्वत:ला पूर्णपणे झोयासाठी समर्पित करून टाकतो, तो तिच्या political movementमध्येही join होतो. घरदार सोडून येतो. तो काय करत असतो त्यालाही माहिती नसतं, पण त्याचं हे सगळं झोयासाठी असतं. आता इथे सातवी आणि शेवटची स्टेज येते, मौत… मृत्यू!(Raanjhanaa)
हे देखील वाचा : Movie Review : ‘रोमांचम’ उभं करणारा भूतम भयम पण तरीही…
आपल्या प्रेमासाठी मृत्यू! कुंदन झोयाच्या प्रेमात ठार वेडा झालेला असतो. इतका की त्या political protestमध्ये अंगावर गोळ्यासुद्धा झेलतो. इथे मुळात झोया त्याच्या प्रसिद्धीवर जळत असते, पण जेव्हा तो बेडवर झोपलेला असतो, तेव्हा तिला realise होतं की मी कुठे चुकले. पण Kundan आपला बेडवरच झोपून मनातल्या मनात dialogue ठोकत असतो, पर उठेंगे किसी दिन.. उसी गंगा किनारे डमरू बजाने को.. उन्ही बनारस के गलियो मे दौड जाने को, किसी Zoya के इश्क मे फिर से पड जाने को..! मुळात Raanjhanaa चित्रपट नाहीये, तर ती सात कडव्यांची एक सुंदर सुफी कविताच आहे.(Raanjhanaa)
To Read more, Click here - https://kalakrutimedia.com/raanjhanaa-its-not-a-film-its-a-poem/



Comments
Post a Comment