ASHTAVINAYAK : १९ मिनिटांचं हे गाणं एका रात्रीत लिहिलंय…
१९ मिनिटांचं हे गाणं एका रात्रीत लिहिलंय… हे गाणं एका रात्रीत लिहिलं गेलंय… (SONG PART) शॉक लागला ना? कारण अष्टविनायकांवर आधारित तब्बल १९ मिनिटांचं एवढं भलंमोठं गाणं एका रात्रीत लिहिणं जवळजवळ अशक्यच वाटतं. पण लिहिणारा माणूस जर तोडीचा लेखक आणि गीतकार असेल ना, तर अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होतात आणि हे गाणं लिहिलं होतं प्रसिद्ध लेखक आणि गीतकार Jagdish Khebudkar यांनी! (ASHTAVINAYAK)
पण या गाण्याची खरी गंमत इथून सुरू होते. कारण ज्या अष्टविनायकांवर त्यांनी हे गाणं लिहिलं, त्या गाण्याच्या आधी Khebudkar यांनी अष्टविनायकांच्या एकाही मंदिराला भेट दिली नव्हती! तर त्याचं झालं असं की, ‘अष्टविनायक’ या चित्रपटाचे निर्माते Sharad Pilgaonkar यांनी Khebudkar यांना चित्रपटासाठी गणपतीवर एक गाणं लिहायला सांगितलं. खेबुडकर म्हणाले, “गणपतीवर हवंय ना? आरामात लिहून देतो.” पण त्यानंतर शरद पिळगावकर यांनी त्यांच्यासमोर पहिला टास्क ठेवला… गाणं फक्त गणपतीवर नाही, तर अष्टविनायकांवर लिहायचं! Khebudkar हडबडले. (ASHTAVINAYAK)
कारण अष्टविनायक म्हणजे फक्त आठ मंदिरांची नावं लिहायची आणि गाणं संपवायचं, एवढंच नव्हतं. Sharad Pilgaonkar यांनी त्यांच्यासमोर आणखी एक टास्क ठेवला… या गाण्यात फक्त आठ मंदिरांची नावं नकोत, तर प्रत्येक गणपतीच्या स्थानिक वैशिष्ट्यांचा, आख्यायिकांचा आणि त्या परिसराचा उल्लेख आला पाहिजे. आता Jagdish Khebudkar यांना धक्काच बसला, कारण ते या गणपतींच्या मंदिरांमध्ये गेलेच नव्हते. पण टास्क इथेही संपलेला नव्हता! पिळगावकर यांचा आणखी एक आदेश आला… या गाण्यात लावणी, भारूड, पोवाडा, गोंधळ, वाघ्या-मुरळी, धनगर गीत, ओवी, आरती अशा महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या लोकपरंपरा आणि लोकगीतांच्या ढंगांचा वापर झाला पाहिजे. आता मात्र हा टास्क खेबुडकर यांना जरा जास्तच कठीण वाटला. ते थेट म्हणाले, “मला अष्टविनायकांबद्दल काहीच माहिती नाही!” आणि मग शरद पिळगावकर यांनी त्यांच्यासमोर एक पुस्तक ठेवलं. अष्टविनायकांची माहिती असलेलं पुस्तक! आणि त्यांना सांगितलं, “हे वाचा… आणि याच्या आधारावर गाणं लिहा.” आता पुढची गोष्ट म्हणजे अक्षरशः लेखनाचा चमत्कारच! खेबुडकर यांनी ते पुस्तक वाचलं, अष्टविनायकांची माहिती समजून घेतली, प्रत्येक गणपतीची वैशिष्ट्यं, आख्यायिका आणि परिसर समजून घेतला आणि मग बसले गाणं लिहायला आणि एका रात्रीत त्यांनी लिहून काढलं… (ASHTAVINAYAK)
‘अष्टविनायका तुझा महिमा कसा…’ एक-दोन कडव्यांचं नाही, तर तब्बल १९ मिनिटांचं गाणं! आणि गंमत म्हणजे हे गाणं ऐकताना फक्त गाणं ऐकल्यासारखं वाटत नाही, जणू आपण अष्टविनायकांच्या यात्रेलाच निघालो आहोत, असं वाटतं. एका गणपतीपासून दुसऱ्या गणपतीकडे जाताना महाराष्ट्राची लोकसंस्कृतीही या गाण्यात आपल्यासोबत प्रवास करते. म्हणूनच या गाण्याची ताकद फक्त त्याच्या लांबीमध्ये नाही, तर त्या १९ मिनिटांत महाराष्ट्र उभा करण्याच्या ताकदीमध्ये आहे आणि अजून एक भन्नाट गोष्ट आहे! तुमच्यापैकी अनेकांनी ‘Om Shanti Om’ मधलं ते गाणं पाहिलं असेल, ज्यामध्ये बॉलीवूडमधले अक्षरशः कित्येक मोठमोठे कलाकार एकत्र पडद्यावर आले होते. पण गंमत अशी की, मराठी इंडस्ट्रीने हा प्रयोग ‘Om Shanti Om’ च्या तब्बल ३० वर्षं आधीच करून ठेवला होता! ‘अष्टविनायका तुझा महिमा कसा’ या गाण्यात Sachin Pilgaonkar यांच्यासोबतच Suryakant Mandhare, Jayshree Gadkar, Shahu Modak, Ashok Saraf, Usha Chavan, Asha Kale, Sudhir Dalvi आणि Ravindra Mahajani असे अनेक दिग्गज कलाकार एकत्र झळकले होते आणि विशेष म्हणजे, हे गाणं आठही अष्टविनायकांच्या स्थानी चित्रित करण्यात आलं होतं. (ASHTAVINAYAK)
This blog is originally published at Kalakruti Media - https://kalakrutimedia.com/ashtavinayak-this-19-minute-song-was-written-in-just-one-night/



Comments
Post a Comment