भारतातला पहिला Ramayana चित्रपट एका मराठी माणसाने बनवला होता!

 आज Ramayanaवर हजारो कोटींच्या बजेटमध्ये चित्रपट बनवण्याची चर्चा सुरू आहे. अत्याधुनिक VFX, भव्य सेट्स, मोठमोठे कलाकार आणि जगभरात पोहोचणारी तंत्रज्ञानाची ताकद… आजच्या काळात रामायण पडद्यावर उभं करणं शक्य आहे. पण तब्बल ११० वर्षांपूर्वी, जेव्हा भारतीय सिनेमाच नुकताच जन्म घेत होता, तेव्हा रामायणातील प्रसंग मोठ्या पडद्यावर उभे करण्याचं धाडस एका मराठी माणसाने केलं होतं. त्यांचं नाव होतं Dhundiraj Govind Phalke — म्हणजेच Dadasaheb Phalke. आणि त्या ऐतिहासिक प्रयोगाचं नाव होतं Lanka Dahan. १९१७ साली प्रदर्शित झालेला हा मूकपट रामायणातील प्रसंगावर आधारित भारतीय सिनेमाच्या सुरुवातीच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जातो. दादासाहेब फाळके यांनीच या चित्रपटाचं दिग्दर्शन, लेखन आणि निर्मिती केली होती.

Lanka Dahan हा संपूर्ण Ramayanaची सुरुवातीपासून शेवटपर्यंत कथा सांगणारा चित्रपट नव्हता. रामाचा वनवास, सीतेचं अपहरण, हनुमानाचा सीतेच्या शोधासाठी लंकेत प्रवेश आणि रामभक्त हनुमानाने लंकेमध्ये घडवलेला प्रसंग—रामायणातील या महत्त्वाच्या घटनांभोवती चित्रपटाची कथा उभी करण्यात आली होती. विशेष म्हणजे हा मूकपट होता. म्हणजे संवाद ऐकू येत नव्हते; कथानक समजण्यासाठी दृश्यं आणि मधूनमधून येणाऱ्या Intertitlesचा आधार घेतला जात होता. उपलब्ध नोंदींनुसार या चित्रपटातील इंटरटायटल्स मराठीत होती. आज आपल्याला संवाद, पार्श्वसंगीत, VFX आणि CGI शिवाय एखादा पौराणिक चित्रपट कल्पना करणं कठीण वाटेल; पण १९१७ मध्ये फाळके यांनी उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानाच्या मर्यादांमध्ये ही कथा पडद्यावर जिवंत केली. उपलब्ध असलेल्या फुटेजमध्ये सीता कैद असलेली जागा, रावण आणि झाडावरून प्रसंग पाहणारा हनुमान यांचं अत्यंत कल्पक पद्धतीने parallel cutting केल्याचंही दिसतं. (Lanka Dahan Movie)

पण Lanka Dahanची सर्वात भन्नाट गोष्ट म्हणजे राम आणि सीता या दोन्ही भूमिका एकाच कलाकाराने साकारल्या होत्या! त्या कलाकाराचं नाव होतं Anna Salunke. भारतीय सिनेमाच्या सुरुवातीच्या काळात महिलांना व्यावसायिक रंगभूमी आणि चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी अनेक सामाजिक अडचणी होत्या. त्यामुळे स्त्री पात्रांच्या भूमिका पुरुष कलाकारच साकारत असत. Dadasaheb Phalke यांच्या १९१३ च्या Raja Harishchandraमध्ये तारामतीची भूमिका करणारे अन्ना साळुंकेच लंका दहनमध्ये परत आले; पण यावेळी त्यांनी चक्क राम आणि सीता, दोन्ही भूमिका केल्या. त्यामुळे भारतीय सिनेमातील पहिली double role साकारणारा कलाकार म्हणून अन्ना साळुंके यांचं नाव इतिहासात नोंदलं गेलं.

आणि Anna Salunke यांची कथा स्वतःमध्येच एखाद्या सिनेमापेक्षा कमी नाही. Dadasaheb Phalke यांना Raja Harishchandraसाठी स्त्री कलाकार मिळत नव्हती. त्यावेळी मुंबईच्या Grant Road परिसरातील एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या अन्ना साळुंके यांच्याकडे फाळकेंचं लक्ष गेलं. त्यांच्या शरीरयष्टीमुळे आणि नाजूक हातांमुळे फाळकेंनी त्यांना स्त्री भूमिका करण्यासाठी तयार केलं. राजा हरिश्चंद्रनंतर काही वर्षांनी Lanka Dahanमध्ये तेच अन्ना साळुंके राम आणि सीता अशा दोन्ही भूमिका करताना दिसले. मात्र या काळात त्यांची शरीरयष्टी अधिक मजबूत झाली होती. त्यामुळे सीतेच्या वेशातही त्यांचे बायसेप्स दिसत असल्याचा उल्लेख जुन्या नोंदींमध्ये आढळतो.

चित्रपटातील इतर कलाकारही महत्त्वाचे होते. Ganpat G. Shinde यांनी हनुमानाची भूमिका, तर D. D. Dabke यांनी रावणाची भूमिका साकारली होती. चित्रपटाचं छायांकन Trymbak B. Telang यांनी केलं होतं. आजच्या काळात एखाद्या चित्रपटातील प्रत्येक कलाकाराचे असंख्य फोटो, व्हिडीओ आणि making footage सहज उपलब्ध असतात. पण १९१७ च्या काळात परिस्थिती पूर्णपणे वेगळी होती. त्यामुळे या सुरुवातीच्या भारतीय कलाकारांपैकी अनेकांची दृश्य स्मृती आज आपल्यापर्यंत अत्यंत मर्यादित स्वरूपात पोहोचली आहे.(Lanka Dahan Movie)
आज आपण VFXच्या मदतीने काही सेकंदांत लंकेचा भव्य महाल, समुद्र, वानरसेना किंवा आकाशात उडणारा हनुमान निर्माण करू शकतो. पण १९१७ मध्ये असं काहीच नव्हतं. फाळकेंना प्रत्यक्ष सेट्स, उपलब्ध कॅमेरा तंत्रज्ञान, प्रकाशयोजना, अभिनय, trick photography आणि संपादन यांच्या मदतीने आपला कल्पनेतला रामायणाचा विश्व उभं करावं लागत होतं. उपलब्ध असलेल्या Lanka Dahanच्या फुटेजमध्येही फाळकेंच्या दृश्य मांडणीची कल्पकता दिसते. म्हणजेच आजच्या भाषेत सांगायचं झालं तर VFX नव्हतं, पण Vision होतं!

आणि या चित्रपटाला मिळालेला प्रतिसाद तर त्याहून भन्नाट होता. Lanka Dahanचा प्रयोग पुण्यातील Aryan Cinemaमध्ये झाला आणि त्यानंतर मुंबईमध्ये या चित्रपटाने प्रचंड लोकप्रियता मिळवली. मुंबईतील West End Cinemaमध्ये सकाळी ७ वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी पहाटे ३ वाजेपर्यंत शो चालत असल्याचा उल्लेख आढळतो. फक्त दहा दिवसांत चित्रपटाने सुमारे ३२ हजार रुपये कमावल्याचाही उल्लेख जुन्या संदर्भांमध्ये केला जातो. त्या काळाच्या आर्थिक संदर्भात ही मोठी कमाई होती. इतकी गर्दी होत असे की तिकीट खिडकीवर जमा झालेले पैसे पोत्यांमध्ये भरून बैलगाड्यांमधून निर्मात्यांच्या कार्यालयात नेले जात, अशी फिल्म इतिहासकार Amrit Gangar यांच्या संदर्भाने नोंद आहे.
आणि या चित्रपटाला मिळालेला प्रतिसाद तर त्याहून भन्नाट होता. Lanka Dahanचा प्रयोग पुण्यातील Aryan Cinemaमध्ये झाला आणि त्यानंतर मुंबईमध्ये या चित्रपटाने प्रचंड लोकप्रियता मिळवली. मुंबईतील West End Cinemaमध्ये सकाळी ७ वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी पहाटे ३ वाजेपर्यंत शो चालत असल्याचा उल्लेख आढळतो. फक्त दहा दिवसांत चित्रपटाने सुमारे ३२ हजार रुपये कमावल्याचाही उल्लेख जुन्या संदर्भांमध्ये केला जातो. त्या काळाच्या आर्थिक संदर्भात ही मोठी कमाई होती. इतकी गर्दी होत असे की तिकीट खिडकीवर जमा झालेले पैसे पोत्यांमध्ये भरून बैलगाड्यांमधून निर्मात्यांच्या कार्यालयात नेले जात, अशी फिल्म इतिहासकार Amrit Gangar यांच्या संदर्भाने नोंद आहे.
पण Lanka Dahanच्या लोकप्रियतेमागे फक्त तंत्रज्ञान किंवा कथा नव्हती… प्रेक्षकांची श्रद्धाही होती. पडद्यावर रामाचं दर्शन होताच काही प्रेक्षक चक्क आपले चप्पल-बूट काढून ठेवत असत, अशी नोंद आढळते. त्यांच्या दृष्टीने पडद्यावर दिसणारा राम हा केवळ एखादा कलाकार नव्हता; तो त्यांच्या श्रद्धेचा भाग होता. म्हणजेच भारतीय सिनेमाच्या अगदी सुरुवातीच्या काळातच Cinema आणि श्रद्धा यांच्यातला अनोखा संबंध तयार झाला होता.(Lanka Dahan Movie)

Lanka Dahanची आणखी एक मोठी गंमत म्हणजे आज आपल्याकडे या संपूर्ण चित्रपटाचा अनुभव उपलब्ध नाही. काळाच्या ओघात चित्रपटाचा मोठा भाग नष्ट झाला. सध्या उपलब्ध असलेल्या फुटेजपैकी सुमारे ५०१ फूट सामग्री जतन झाल्याची नोंद आहे. त्या काही मिनिटांच्या फुटेजमधूनही फाळकेंच्या कल्पक दिग्दर्शनाची झलक दिसते. विशेष म्हणजे उपलब्ध भागात एका प्रसंगातून दुसऱ्या प्रसंगाकडे जाण्याची पद्धत आणि एकाच वेळी वेगवेगळ्या जागांवर घडणाऱ्या घटनांना जोडण्याची त्यांची मांडणी त्या काळासाठी उल्लेखनीय होती.

आज Ramayanaवर मोठ्या बजेटचे चित्रपट बनत आहेत. मोठमोठे कलाकार, हजारो कोटींच्या चर्चा, आधुनिक तंत्रज्ञान आणि जागतिक स्तरावरील निर्मिती… हे सगळं निश्चितच भारतीय सिनेमाच्या प्रगतीचं चित्र आहे. पण या भव्य प्रवासाच्या अगदी सुरुवातीला एक मराठी माणूस उभा होता. त्याच्या हातात आजसारखं digital camera तंत्रज्ञान नव्हतं, VFX नव्हतं, CGI नव्हतं, मोठ्या studioची ताकद नव्हती… होती ती फक्त कल्पना, जिद्द आणि भारतीय कथांना पडद्यावर आणण्याची धडपड.

This blog is originally published at Kalakruti Media - https://kalakrutimedia.com/lanka-dahan-1917-dadasaheb-phalke-first-marathi-ramayana-film/

Comments

Popular posts from this blog

Baapya Movie Review : नाकारण्यापासून ते स्विकारण्यापर्यंतचा प्रवास

Celebrity Marriage : मोठ्या लोकांच्या मोठ्या गोष्टी, लग्नाच्या प्रक्षेपण हक्काचे साठ कोटी

अमिताभ बच्चन आणि नसिरुद्दीन शहा आजवर एकत्र सिनेमात का आले नाही ?