Sadhana : बेदर्दी बालमा तुझको मेरा मन याद करता है…

 काल २ सप्टेंबर होता. अभिनेत्री Sadhanaचा जन्मदिवस. त्या निमित्ताने तिची दिलचस्प आठवण. साठच्या दशकातील रसिकांनी ज्या अत्यंत देखण्या, सुसंस्कृत आणि सोज्वळ अभिनेत्रीला एखाद्या हळुवार मोरपिसासारखं आपल्या मनात खूप खोलवर जपून ठेवलं आहे, ती अद्वितीय आणि Evergreen अभिनेत्री म्हणजे Sadhana! Sadhana हे नुसतं नाव घेतलं तरी मनामध्ये रूपेरी पडद्यावर तिच्यावर चित्रित झालेल्या कितीतरी अवीट गोडीच्या अजरामर गाण्यांचा एक सुगंधी पाऊस सुरू होतो. (Sadhana)

O Sajna Barkha Bahar Aayi मधील तिचे ते पावसाच्या थेंबासारखे नितळ सौंदर्य असो, Lag Ja Gale Ke Phir Ye Hansi Raat Ho Na Ho मधील तिचा तो विरहाचा आर्त भाव असो, Tera Mera Pyar Amar, Phir Kyun Mujhko Lagta Hai Dar मधील प्रेमाची व्याकुळता असो, Bahut Shukriya Badi Meherbani मधील तिचा तो मनमोहक अंदाज असो, Tu Jahan Jahan Chalega Mera Saaya Saath Hoga मधील तिचे ते रहस्यमय अस्तित्व असो, Mere Mehboob Tujhe Meri Mohabbat Ki Kasam मधील तिची ती उर्दू लहेजाची नजाकत असो, Aji Rooth Kar Ab Kahan Jaiyega मधील तिचा तो लाडीक रुसवा असो, Aap Yunhi Agar Humse Milte Rahe मधील तिचा तो साधेपणा असो, किंवा Abhi Na Jao Chhod Kar Ke Dil Abhi Bhara Nahi मधील तिचे ते प्रेमाचे आर्जव असो; या प्रत्येक गाण्यात साधनाने आपल्या सौंदर्याची आणि अभिनयाची एक अमिट स्वाक्षरी उमटवली आहे. उणीपुरी दहा-बारा वर्षांची तिची ही अत्यंत झळाळती रूपेरी कारकीर्द होती, पण या छोट्याशा कालखंडात तिने Bimal RoyYash ChopraRaj KhoslaVijay Anand यांसारख्या भारतीय सिनेसृष्टीतील सर्वोच्च आणि दिग्गज दिग्दर्शकांच्या चित्रपटांमधून अत्यंत विविधांगी भूमिका साकारून स्वतःची एक स्वतंत्र, वेगळी आणि स्वाभिमानी ओळख निर्माण केली. (Sadhana)

Sadhana म्हटलं की तिची जगप्रसिद्ध Sadhana Cut ही हेअरस्टाईल सर्वात आधी डोळ्यांसमोर येते आणि या आगळ्यावेगळ्या हेअरस्टाईलची जादू आजही फॅशन जगतात तितकीच कायम आहे. वास्तविक, ही केशभूषा हॉलिवूडची तत्कालीन अत्यंत लोकप्रिय आणि फॅशन आयकॉन असलेली अभिनेत्री Audrey Hepburn हिच्या केश रचनेवरून प्रेरित होऊन तयार करण्यात आली होती. साधनाचा कपाळाचा भाग थोडा मोठा होता, जो झाकण्यासाठी तिचे पती आणि दिग्दर्शक R. K. Nayyar यांनी तिला हा लूक देण्याचा सल्ला दिला होता, जो पुढे संपूर्ण देशात एक नवा फॅशन ट्रेंड बनला. (Sadhana)

२ सप्टेंबर १९४१ रोजी अखंड भारताच्या कराची (आताचे पाकिस्तान) शहरात एका सिंधी कुटुंबात जन्मलेल्या साधनाचा सिनेसृष्टीतील प्रवास अतिशय रंजक आहे. तिचे नाव त्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री Sadhana Bose यांच्या नावावरून ठेवले गेले होते. फाळणीनंतर तिचे कुटुंब मुंबईत आले. साधना जेव्हा रुपेरी पडद्यावर नायिका म्हणून आली, तेव्हा ती त्या काळातील सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री बनली होती. Sadhana Cut सोबतच Yash Chopra यांच्या Waqt सिनेमापासून तिने परिधान केलेली तंग सलवार-कमीजची नवी फॅशन देशभर इतकी लोकप्रिय झाली की, त्या काळातील प्रत्येक तरुण मुलगी हुबेहूब साधनाचा लूक कॉपी करू लागली होती. महाविद्यालयात असल्यापासूनच साधनाला सिनेमात काम करण्याचे वेध लागले होते. अतिशय कमी लोकांना ठाऊक असेल की, १९५५ सालच्या Raj Kapoor यांच्या Shree 420 या जगप्रसिद्ध सिनेमात Mud Mud Ke Na Dekh Mud Ke या Nadiraच्या क्लब डान्स सॉंगमध्ये साधनाने अवघ्या १४ व्या वर्षी एक साधी कोरस गर्ल (बॅकग्राउंड डान्सर) म्हणून हजेरी लावली होती. पुढे भारताचा पहिला सिंधी चित्रपट Abana (१९५८) मध्ये तिने महत्त्वाची भूमिका केली. त्यानंतर निर्माते Sashadhar Mukherjee यांच्या Filmalaya या अभिनय संस्थेत तिने रीतसर अभिनयाचे कडक प्रशिक्षण घेतले. या प्रशिक्षण काळात एकदा सदाबहार अभिनेता Dev Anand तिथे काही कामानिमित्त आला असताना, तिथल्या एका खिडकीत उभी असलेली साधना त्याला दिसली आणि तिला पाहताच Dev Anand ची अवस्था ती पाहताच बाला कलीजा खलास झाला अशीच काहीशी झाली होती; त्याने लगेचच मुखर्जींना विचारले होते की, ही सुंदर मुलगी कोण आहे? आणि पुढे Dev Anand सोबत तिने Asli Naqli आणि Hum Dono या अत्यंत गाजलेल्या सिनेमांमधून त्याची मुख्य नायिका बनून प्रेक्षकांची मने जिंकली. (Sadhana)

१९६० साली Filmalayaच्या Love in Simla या अत्यंत रोमँटिक सिनेमातून ती Joy Mukherjee सोबत पहिल्यांदा मुख्य नायिकेच्या रूपात पडद्यावर आली आणि तिचं ते निरागस, फ्रेश पडद्यावरील रूप तत्कालीन तरुणाईला बेफाम आवडून गेलं. या पहिल्याच चित्रपटापासून तिच्या सुपरहीट सिनेमांची एक न संपणारी रांगच लागली. Ek Musafir Ek HaseenaHum DonoMere MehboobArzooRajkumar या सिनेमातील तिचा एकूण एक फ्रेम, तिचा प्रत्येक लूक आजही रसिकांच्या दिलात ताजा आणि जिवंत आहे. तिचे ते अत्यंत भावस्पर्शी, बोलके डोळे, तिचं ओठाला किंचित मुडपून अत्यंत लाडीकपणे बोलणं, तिचं ते हळूच लाजून हासणे आणि हासून पुन्हा अत्यंत कातिल नजरेने पाहणे, हे सारंच प्रेक्षकांच्या काळजात घर करून राहणारे होते. (Sadhana)

१९६४ साली Raj Khosla यांच्या Woh Kaun Thi? या सस्पेन्स थ्रिलर सिनेमात तिने साकारलेली दुहेरी भूमिका प्रचंड गाजली आणि Raj Khosla यांच्या सस्पेन्स ट्रॉयलॉजी मधील पुढचे दोनही सुपरहिट सिनेमे Mera Saaya आणि Anita हे साधनाच्याच खांद्यावर विसावले होते. १९६६ साली तिने तिच्या पहिल्याच Love in Simla चित्रपटाचे दिग्दर्शक R. K. Nayyar सोबत प्रेमविवाह केला. रुपेरी पडद्यावर तिची Rajendra Kumar (ज्यांच्यासोबत तिचे Mere Mehboob आणि Arzoo हे प्रचंड गाजले), Sunil DuttManoj KumarShammi Kapoor यांच्यासोबत खूपच सुंदर जोडी जमली होती, तर Raj Kapoor सोबत ती Dulha Dulhan मध्ये अत्यंत प्रभावी भूमिकेत दिसली. सत्तरच्या दशकात Dharmendra आणि Rajesh Khanna यांच्यासोबतही तिने नायिकेच्या काही महत्त्वपूर्ण भूमिका केल्या. साधना केवळ एक उत्तम अभिनेत्रीच नव्हती, तर ती एक अत्यंत हुशार दिग्दर्शक होती. अभिनेत्री म्हणून कारकीर्द संपत आली असताना तिने स्वतः Geeta Mera Naam (१९७४) या चित्रपटाचे यशस्वी दिग्दर्शन केले, ज्यामध्ये तिने स्वतः दुहेरी भूमिका साकारली होती. साधनाचा सर्वात मोठा गुण हा होता की, तिला तिच्या मर्यादा अचूक माहीत होत्या, तिला तिची कुवत आणि स्वतःचे वलय ठाऊक होते. त्यामुळेच जेव्हा तिला थायरॉईडच्या गंभीर आजारामुळे तिच्या डोळ्यांवर परिणाम झाल्याचे जाणवले आणि वय वाढू लागले, तेव्हा ज्या क्षणी तिला वाटलं की आपण आता थांबावं, ग्लॅमर जगतातून सन्मानाने बाजूला व्हावं, त्याच क्षणी तिने रुपेरी पडद्यापासून स्वतःला कायमचे दूर केले. (Sadhana)

This blog is originally published at Kalakruti Media -https://kalakrutimedia.com/sadhana-bedardi-baalama-tujhako-mera-man-yaad-karata-hai/

Comments

Popular posts from this blog

Celebrity Marriage : मोठ्या लोकांच्या मोठ्या गोष्टी, लग्नाच्या प्रक्षेपण हक्काचे साठ कोटी

Baapya Movie Review : नाकारण्यापासून ते स्विकारण्यापर्यंतचा प्रवास

अमिताभ बच्चन आणि नसिरुद्दीन शहा आजवर एकत्र सिनेमात का आले नाही ?