Anthony Gonsalves : हिंदी सिनेसंगीताचा पडद्यामागचा ‘शिरोमणी’

 हिंदी सिनेसंगीताच्या सुवर्णयुगातील अवीट गाण्यांच्या यशाचे श्रेय नेहमी संगीतकारांच्या पदरात पडते. मात्र, या सुरावटींना प्रत्यक्षात उतरवणारे खरे हक्कदार, म्हणजेच पडद्यामागचे वादक आणि अरेंजर्स मात्र नेहमीच प्रसिद्धीच्या पल्याड राहिले. गोव्यातील ख्रिश्चन संगीतकारांपैकी Anthony Gonsalves (जन्म 12 जून 1927) यांना या सर्व वादकांचे शिरोमणी मानले जाते. अनेक अजरामर सुरावटींचे जनक असलेले Anthony आज काळाच्या पडद्याआड गेले असले, तरी त्यांनी सजवलेली गाणी आजही तो सुवर्णकाळ रसिकांच्या मनात जिवंत ठेवतात.

चित्रपट बोलू लागल्यावर साहजिकच गाण्यांचे आगमन झाले. सुरुवातीला ध्वनिमुद्रणाच्या (Recording) मर्यादांमुळे मोजक्या वाद्यांसह गाणी रेकॉर्ड केली जात. प्ले-बॅकची सोय नसल्याने काम करणारे नट-नट्याच गात असत. गाण्यांमध्ये प्रामुख्याने हार्मोनियम, व्हायोलिन आणि तबला यांचाच वापर होई. Pankaj Mullick किंवा K. L. Saigal यांचा अपवाद वगळता, तत्कालीन बहुतांश गाणी रसिकांना केवळ सहन करावी लागत. १९४५ नंतर मात्र गाण्यांच्या या प्रवासाने एक सुरेल वळण घेतले. संगीतकार Anil Biswas यांनी वेगवेगळ्या वाद्यांचा मेळ घालत मुखडा आणि अंतऱ्याच्या मध्ये Interlude चे यशस्वी प्रयोग केले. पुढे मेंडोलीन, सॅक्सोफोन, ट्रम्पेट, गिटार, पियानो, ढोलक, सतार आणि फिडल बास यांसारख्या देशी-विदेशी वाद्यांचा वापर वाढला आणि १९४० ते १९६० या दोन दशकांत हिंदी सिनेसंगीताचा संपूर्ण ढाचाच बदलून गेला. C. Ramchandra यांनी वेगवेगळ्या क्लबमधील बँडवादकांमधून कसबी वादक निवडले आणि पारंपरिक संगीताची चौकट भेदली. Samadhi चित्रपटातील Gore Gore, O Banke Chhore हे त्याचे उत्तम उदाहरण. आजही ५०-६० वर्षांनंतरच्या पिढीला हे गाणे तितकेच ताजे आणि आधुनिक वाटते. Shyam Sundar यांनी Dholak चित्रपटात संगीतबद्ध केलेले Mausam Aaya Hai Rangeen हे गाणेही याच प्रयोगशीलतेची साक्ष देते.

या तांत्रिक क्रांतीचे पूर्ण श्रेय जरी संगीतकारांना मिळाले असले, तरी त्याचे खरे हक्कदार गोव्याकडील ख्रिश्चन संगीततज्ज्ञ होते. Chick Chocolate (Antonio Vaz), Johnny Gomes, Frank Fernand, Arthur Pereira, Sebastian D’Souza, Albert D’Costa, Martin Pinto, Mickey Correa आणि एकमेव Ramsingh (सॅक्सोफोन वादक) यांसारख्या दिग्गजांच्या मांदियाळीत Anthony Gonsalves हे अग्रस्थानी होते. १८ जानेवारी २०१२ रोजी गोव्यातील आपल्या माजोर्डा या गावी Anthony Prabhu Gonsalves यांचे निधन झाले आणि सिनेसंगीताला अवीट गोडी देणाऱ्या एका महान शिल्पकाराच्या कारकीर्दीचा अंत झाला. त्यांची सिने-कारकीर्द उणीपुरी २२ वर्षांची होती. वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी ते मुंबईत आले आणि संगीतकार Naushad यांच्याकडे व्हायोलिनवादक म्हणून रुजू झाले. संगीतातील विलक्षण गतीमुळे ते अल्पावधीतच Music Arranger (स्वरसंयोजक) बनले. नौशाद यांचे असिस्टंट Ghulam Mohammed यांच्याशी अ‍ॅन्थनींची घट्ट मैत्री झाली; म्हणूनच पुढे Pakeezah चित्रपटातील सर्व अलौकिक गाण्यांचे स्वरसंयोजन अ‍ॅन्थनींनीच केले. त्या काळात त्यांनी S. D. Burman, Anil Biswas, Roshan, Madan Mohan आणि Khemchand Prakash यांसारख्या दिग्गज संगीतकारांचे मुख्य अरेंजर म्हणून काम केले.

या ख्रिश्चन संगीतकारांचा सिनेसृष्टीत वरचष्मा असण्याचे मुख्य कारण म्हणजे, चर्चमधील Choir Group आणि बँड कन्सर्टमुळे त्यांना पाश्चात्त्य पद्धतीची स्वरलिपी (Staff Notation) लहानपणापासूनच अवगत होती. ही मंडळी हे ज्ञान कोणाशीही शेअर करत नसत. ही एकाधिकारशाही मोडीत काढण्याचे श्रेय प्यारेलाल यांचे वडील Ramprasad Sharma यांच्याकडे जाते, ज्यांनी भारतीय स्वरलिपी विकसित करून वादकांसाठी बडोद्यात क्लासेस सुरू केले. संगीतामध्ये Obbligato म्हणजेच Counter Melody रूढ करण्याचे श्रेय अ‍ॅन्थनी आणि Sebastian D’Souza यांना जाते. मुख्य गाणे वाजत असताना पार्श्वभूमीत मूळ स्वरांशी विसंगत नसलेला पण स्वतंत्र सूर धरणे म्हणजे काऊंटर मेलडी. यासाठी अथांग अभ्यासाची गरज असते. अ‍ॅन्थनींना २२ श्रुतींचे अचूक ज्ञान होते, ज्याचा वापर त्यांनी गाण्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी केला. त्यांनी १९५० च्या सुरुवातीलाच हिंदुस्थानी रागांवर आधारित एक Symphony तयार केली होती, तसेच शास्त्रीय रागांसाठी २२ श्रुतींची स्वरलिपीही तयार केली होती. पाश्चात्त्य आणि भारतीय वाद्यांवर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत कसे वाजवावे, यावर त्यांनी पाच पुस्तके लिहिली. भारतात Fusion संगीताची संकल्पना त्यांनीच सर्वप्रथम रुजवली.

Ramprasad Sharma यांच्या विनंतीवरून अ‍ॅन्थनी यांनी Pyarelal आणि Laxmikant यांना संगीताचे धडे दिले. पुढे Laxmikant-Pyarelal सिनेसृष्टीत मोठे संगीतकार झाले. Madan Mohan यांनी संगीतबद्ध केलेल्या Haqeeqat चित्रपटातील Main Ye Sochkar Tere Dar Se Utha Tha या गाण्याचा अप्रतिम Intro Piece प्यारेलाल यांनी व्हायोलिनवर वाजवला आहे. या गाण्याच्या रेकॉर्डिंग दरम्यान ऑर्केस्ट्रा कंडक्टर स्वतः अ‍ॅन्थनी होते. त्यांच्या एका सुचनेमुळे प्यारेलाल यांनी अत्यंत कठीण सेटिंगवर तो व्हायोलिनचा तुकडा वाजवला, जो आजही श्रवणीय वाटतो. आपल्या या गुरूंचे ऋण Laxmikant-Pyarelal यांनी Amar Akbar Anthony या चित्रपटातील Amitabh Bachchan यांच्या My Name Is Anthony Gonsalves या गाण्याद्वारे फेडले आणि आपल्या गुरूला जगात अजरामर केले.

अ‍ॅन्थनी यांनी केवळ १८ वर्षांचे असताना Mahal (१९४९) चित्रपटातील Aayega Aanewala या गूढ गीताचे संपूर्ण ऑर्केस्ट्रेशन आणि इन्ट्रो पीस तयार केला होता. याशिवाय, मदन मोहन यांच्या Jailer मधील Hum Pyar Mein Jalne Walon Ko, Sudhir Phadke यांच्या Bhabhi Ki Chudiyan मधील Jyoti Kalash Chhalke, आणि S. D. Burman यांच्या Jaal चित्रपटातील Yeh Raat Yeh Chandni Kahan या गाण्यातील व्हायोलिनचा अद्भूत स्वरकल्लोळ ही अ‍ॅन्थनींचीच करामत होती. Baiju Bawra या शास्त्रीय संगीतावर आधारित चित्रपटाचे मुख्य स्वरसंयोजनही अ‍ॅन्थनी यांचेच होते. त्यांची हीच महती जाणून सचिनदांनी आपला मुलगा Rahul Dev Burman (R. D. Burman) यांना अ‍ॅन्थनींकडे संगीताचे धडे घेण्यासाठी पाठवले होते. पंचमदांच्या संगीतावर जो पाश्चात्त्य आणि भारतीय फ्यूजनचा प्रभाव दिसतो, त्याचे बीज अ‍ॅन्थनींनीच रोवले होते. १९४५ ते १९६५ या सुवर्णकाळात वादन, कम्पोझिंग आणि अरेंजिंग अशा सर्वच क्षेत्रांत अ‍ॅन्थनींनी अधिराज्य गाजवले. त्यांच्या अफाट ज्ञानामुळे अमेरिकेतील Syracuse University ने त्यांना संगीताचे अध्यापन करण्यासाठी आमंत्रित केले होते. १० वर्षे अमेरिकेत राहून ठसा उमटवल्यानंतर ते आपल्या मायदेशी गोव्यात परतले; मात्र ते थेट अज्ञातवासात गेले. त्यांनी चित्रपटसृष्टीतील कोणालाही आपल्या येण्याची माहिती दिली नाही. तोपर्यंत सिनेसृष्टीचा ट्रेंड बदलला होता आणि इलेक्ट्रॉनिक वाद्यांच्या आगमनाने खऱ्या वादकांची जागा घेतली होती. काहींच्या मते, अमेरिकेत योग्य संधी न मिळाल्याने त्यांना नैराश्य आले असावे.

=============================

ही देखील वाचा: C. Ramchandra : ‘या’ गाण्याची लोकप्रियता ७५ वर्षानंतरही कायम!

=============================

१९४५ ते १९७० या सुवर्णयुगातील Anil Biswas, C. Ramchandra, Naushad, Shankar-Jaikishan, S. D. Burman, Madan Mohan आणि Khayyam या सर्वच दिग्गजांच्या यशात Anthony Gonsalves यांचे अमूल्य योगदान होते. Anil Mohile, पं. रामनारायण आणि खय्याम यांसारखे थोर कलाकार अ‍ॅन्थनी यांच्या कडक शिस्तीचे आणि वाद्यवृंदरचनेचे तोंडभरून कौतुक करत असत. हिंदी चित्रपट संगीताला आपल्या गुणवत्तेने प्रकाशमान करणारा हा पडद्यामागचा संगीत सूर्य जेव्हा अस्ताला गेला, तेव्हा भारतीय संगीत सृष्टी खऱ्या अर्थाने पोरकी झाली.

हे वर्ष त्यांचे जन्म शताब्दी वर्ष आहे.

THIS BLOG IS ORIGINALLY PUBLISHED AT KALAKRUTI MEDIA - https://kalakrutimedia.com/anthony-gonsalves-the-unsung-maestro-behind-hindi-film-music/

Comments

Popular posts from this blog

Baapya Movie Review : नाकारण्यापासून ते स्विकारण्यापर्यंतचा प्रवास

Celebrity Marriage : मोठ्या लोकांच्या मोठ्या गोष्टी, लग्नाच्या प्रक्षेपण हक्काचे साठ कोटी

अमिताभ बच्चन आणि नसिरुद्दीन शहा आजवर एकत्र सिनेमात का आले नाही ?