DON : एका मृत मित्राचं थकीत कर्ज फेडण्यासाठी बनवला गेला!

 एक असा सिनेमा ज्याने बॉलिवूडमध्ये Amitabh Bachchan यांचा Star​​domचा पाया असा काही पक्का केला की, आज 48 वर्षांनंतरही त्या सिनेमाची जादू कायम आहे! पण मुळात हा चित्रपट नफ्यासाठी बनवलाच नव्हता. हा सिनेमा बनवला गेला होता एका मृत मित्राच्या कुटुंबाला आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाला कर्जाच्या दलदलीतून बाहेर काढण्यासाठी! तो सिनेमा म्हणजे 1978 मध्ये आलेला Don!

गोष्ट सुरू होते बॉलिवूडचे दिग्गज सिनेमॅटोग्राफर आणि प्रोड्युसर Nariman Irani यांच्यापासून. नरीमन यांनी Zindagi Zindagi नावाचा एक मोठा मल्टीस्टारर सिनेमा बनवला होता, ज्यात Sunil Dutt आणि Waheeda Rehman होते. पण दुर्दैवाने हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर पार आपटला! नरीमन इराणी डोक्यापासून पायापर्यंत कर्जात बुडाले. त्या काळी त्यांच्यावर तब्बल 12 लाखांचं कर्ज झालं होतं. परिस्थिती इतकी वाईट झाली होती की, त्यांच्याकडे रोजच्या जेवणासाठी, घराचा खर्च चालवण्यासाठीसुद्धा पैसे उरले नव्हते! आपल्या जवळच्या मित्राची ही दयनीय अवस्था Amitabh Bachchan, Pran आणि दिग्दर्शक Chandra Barot यांच्याने बघवली नाही. त्या वेळी अमिताभ Majboor सिनेमाच्या शूटिंगदरम्यान नरीमन इराणींसोबतच काम करत होते. अमिताभ, प्राण, Zeenat Aman, Salim-Javed आणि चंद्रा बारोत हे सगळे एकत्र आले. त्यांनी ठरवलं की आपण एकत्र मिळून एक असा सिनेमा बनवू, ज्याच्या कमाईतून नरीमन यांचं सगळं कर्ज फेडलं जाईल!

Salim-Javed यांनी एक अशी स्क्रिप्ट बाहेर काढली, जी आधी Dev Anand आणि Prakash Mehra यांनी रिजेक्ट केली होती. तीच होती डॉनची स्क्रिप्ट! अवघ्या 25 लाखांच्या बजेटमध्ये हा सिनेमा बनवायचं ठरलं. Chandra Barot यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली. तीन वर्ष आणि सहा महिने रात्रीचा दिवस करून चित्रपटाचं शूट संपत आलं होतं. पण नोव्हेंबर 1977 मध्ये मुंबईत मुसळधार पाऊस पडत होता. डॉनचं पोस्ट-प्रॉडक्शन आणि शूटिंग अंतिम टप्प्यात होतं. नरीमन इराणी एका शूटिंग लोकेशनवर काम करत असताना अचानक पाऊस वाढला. पावसापासून वाचण्यासाठी ते एका पडक्या भिंतीच्या आडोशाला जाऊन उभे राहिले. आणि दुर्दैवाने… ती भलीमोठी भिंत थेट नरीमन इराणी यांच्या अंगावर कोसळली! त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं, पण गंभीर दुखापतींमुळे उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

ज्या मित्राला कर्जातून बाहेर काढण्यासाठी हा सिनेमा बनवला होता, तो मित्रच आता या जगात उरला नव्हता! पूर्ण टीमवर दुःखाचा डोंगर कोसळला. सिनेमाचे प्रोड्युसरच नाही, त्यामुळे या सिनेमाचं शून्य प्रमोशन झालं. अजिबात प्रमोशन न करता, 12 मे 1978 रोजी Don थेट थिएटरमध्ये रिलीज करण्यात आला. पहिले 2-3 दिवस चित्रपटाला प्रेक्षकांचा थंड प्रतिसाद मिळाला. पण त्यानंतर जे घडलं, तो भारतीय सिनेमाच्या इतिहासातला चमत्कार होता! माऊथ पब्लिसिटीच्या जोरावर बॉक्स ऑफिसवर असा काही ब्लास्ट झाला की, सिनेमाने कमाईचे सगळे रेकॉर्ड मोडून काढले! सिनेमाने करोडो रुपयांचा गल्ला जमवला आणि ठरल्याप्रमाणे, अमिताभ बच्चन आणि टीमने या सिनेमातून मिळालेला एक-एक रुपयाचा नफा नरीमन इराणी यांच्या पत्नी Salma Irani यांच्या हातात सुपूर्द केला. सलमा इराणी यांनी त्या पैशांमधून आपल्या पतीचं सर्व कर्ज पूर्णपणे फेडून टाकलं!

पण थांब, या सिनेमाचा एक अतिशय रंजक किस्सा अजून बाकी आहे! सिनेमा एडिट होऊन तयार होता. पण लेखक Javed Akhtar यांनी जेव्हा रफ कट पाहिला, तेव्हा ते ठामपणे म्हणाले, सेकंड हाफ खूप फास्ट आणि ॲक्शनने भरलेला आहे, प्रेक्षकांना श्वास घ्यायला जागाच नाहीये. इथे एक गाणं असायलाच हवं! आता अडचण अशी होती की, अमिताभ बच्चन यांना कामानिमित्त परदेशी जायचं होतं आणि शूटिंगसाठी उरला होता फक्त एकच दिवस! ना कोणताही सेट तयार होता, ना कोणती पूर्वतयारी. पण तरीही घाईघाईत गोरेगावच्या एका तबेल्यात शूटिंग सेट केली गेली आणि एका दिवसात ते गाणं शूट झालं… ते गाणं म्हणजेच — Khaike Paan Banaras Wala! हे गाणं मूळचं Dev Bhan चित्रपटासाठी बनवलं गेलं होतं, पण तिथे न वापरल्यामुळे डॉनमध्ये घेतलं गेलं आणि त्याने संपूर्ण भारताला वेड लावलं!

===========================

हे देखील वाचा: Top 5 Marathi Natak : मराठी रंगभूमीवर इतिहास घडवणारी ५ नाटकं

===========================

आज आपण करोडो रुपयांचं बजेट, VFX आणि भपकेबाज प्रमोशन असलेले सिनेमे बघतो. पण ४८ वर्षांपूर्वी, फक्त मित्राला मदत करण्याची प्रामाणिक जिद्द, एकमेकांवरचा विश्वास आणि कडक स्टोरीटेलिंगच्या जोरावर बनलेला Don आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतोय!

Team Kalakruti Media 03 : कलाकृती विशेष

THIS BLOG IS ORIGIANLLY POSTED AT KALAKRUTI MEDIA - https://kalakrutimedia.com/don-made-to-repay-a-deceased-friends-outstanding-debt/

Comments

Popular posts from this blog

Baapya Movie Review : नाकारण्यापासून ते स्विकारण्यापर्यंतचा प्रवास

Celebrity Marriage : मोठ्या लोकांच्या मोठ्या गोष्टी, लग्नाच्या प्रक्षेपण हक्काचे साठ कोटी

अमिताभ बच्चन आणि नसिरुद्दीन शहा आजवर एकत्र सिनेमात का आले नाही ?