Kishore Kumar : दिन हैं सुहाना आज पहली तारीख है…
रेडिओ सिलोनने (आता SLBC) दोन गोष्टींचा पायंडा आजवर मोडला नाही, एक म्हणजे दररोज सकाळी सात वाजून सत्तावन मिनिटांना लागणारे Kundan Lal Saigalचे गीत आणि दर महिन्याच्या पहिल्या तारखेला लागणारे Din Hai Suhana Aaj Pehli Tarikh Hai हे Kishore Kumarचे गीत! काळ बदलला, तंत्रज्ञान बदलले, रेडिओचे स्वरूप बदलले, पण दर महिन्याची पहिली तारीख उजाडली की रेडिओ सिलोनवरून (आताचे Sri Lanka Broadcasting Corporation) सकाळी साडेसात वाजता हे गाणे आजही तितक्याच उत्साहाने वाजवले जाते आणि श्रोतेही तेवढ्याच आनंदाने ते ऐकतात. साठ-सत्तर वर्षांहून अधिक काळ एकच गाणे दर महिन्याला एका ठरावीक वेळी न चुकता वाजवले जाणे आणि त्याची लोकप्रियता तसूभरही कमी न होणे, हा जागतिक रेडिओ जगतातील एक अद्भूत आणि विलोभनीय विक्रमच म्हणावा लागेल. (Kishore Kumar)
Kishore Kumarच्या या अजरामर गीताचा पडद्यामागचा किस्सा अत्यंत मनोरंजक आणि तितकाच ऐतिहासिक आहे. हे गाणे ज्या सिनेमात होते, तो सिनेमा मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज कलावंत आणि दिग्दर्शक Raja Nene यांच्या Production Houseने १९५४ साली हिंदीत आणलेला Pehli Tarikh हा होता. या सिनेमाचे दिग्दर्शन आणि नायक स्वतः Raja Nene हेच होते आणि त्यांच्यासोबत अभिनेत्री Nirupa Roy मुख्य भूमिकेत होत्या. सिनेमात हे गाणे त्या काळातील प्रसिद्ध हास्य कलाकार Maruti (Marutirao Parab) यांच्यावर चित्रित होणार होते, जे मध्यमवर्गीय कुटुंबातील नोकरदार माणसाचे प्रतिनिधित्व करत होते. पुण्याच्या Deccan Studioत या संपूर्ण सिनेमाचे चित्रीकरण झाले होते. सिनेमाचे कथानक अतिशय साधे, सरळ पण प्रत्येक सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेले होते. महिनाभर घाम गाळून काम करणाऱ्या नोकरी करणाऱ्या व्यक्तीच्या हातात एक तारखेला पगार पडतो, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर येणारा आनंद, पण महागाई, कुटुंबाचा भार, मुलांची फी, किराणा मालाचे बिल आणि कर्ज यामुळे तो पगार काही दिवसांतच कसा संपून जातो, याचे वास्तववादी चित्रण यात होते. पगार संपल्यावर पुन्हा सुरू होतो तो पुढच्या एक तारखेचा लांबच लांब इंतजार आणि हाच या सिनेमाचा मुख्य गाभा होता. (Kishore Kumar)
या गाण्याचे गीतकार Qamar Jalalabadi यांनी सुरुवातीला हे गाणे खूप गंभीर, कारुण्याने भरलेल्या आणि उपरोधाच्या वळणावर जाणारं लिहिलं होतं, कारण मध्यमवर्गीयांचे आर्थिक जगणे हा एक गंभीर विषय होता. पण जेव्हा हे गाणे Kishore Kumar यांच्याकडे आले, तेव्हा त्यांच्यातील कल्पक आणि अवलिया कलाकाराने या गाण्याला एक वेगळे, उत्साही वळण द्यावे असे सुचवले. पगार मिळण्याचा आनंद हा गंभीर नसावा तर तो साजरा केला पाहिजे, असा किशोरदांचा विचार होता. या कामी त्यांना अभिनेते Ashok Kumar म्हणजेच दादामुनी यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. दादामुनी यांनी गाण्यातील अतिगंभीर भावना काढून त्या जागी खेळकरपणा, आणि एक प्रकारचा बालिश आनंद आणायचा सल्ला दिला. गीतकार Qamar Jalalabadi यांनी हा सल्ला शिरसावंद्य मानला आणि दोन्ही भावनांचा सुवर्णमध्य साधत हे गाणे दोन भागात अतिशय सुंदर रीतीने गुंफले. गाण्याच्या एका भागात त्या काळातील चित्रपटसृष्टीची क्रेझ आणि सामान्य माणसावर असलेला सिनेमाचा प्रभाव दाखवण्यासाठी, त्यांनी तात्कालिक लोकप्रिय नायक-नायिकांची नावे चक्क गाण्यातच जोडली— Nargis Raj Kapoor Hai, Dilip Kumar Hai, Nimmi Geeta Bali Hai, Ashok Kumar Hai! या ओळींमधून ५० च्या दशकातील चित्रपटवेड्या पिढीचे हुबेहूब दर्शन घडते. तर दुसऱ्या भागात मध्यमवर्गीयाच्या हलाखीवर आणि भविष्यातील चिंतेवर भाष्य करताना Banda Bekaar Hai, Kismat Ki Maar Hai… म्हणत आर्थिक विवंचनेची वास्तववादी भावनाही तितक्याच ताकदीने व्यक्त केली. Kishore Kumar यांनी या गाण्याला आपल्या खास Yodeling आणि उत्साही शैलीचा तडका दिला. हे गाणे इतके गतिमान आणि जिवंत होते की, किशोरदांनी स्टुडिओमध्ये अत्यंत ऊर्जेने गात अवघ्या एका ‘टेक’मध्ये हे गाणे ध्वनीमुद्रित केले, जे ऐकून स्टुडिओतील सगळेच थक्क झाले. (Kishore Kumar)
या गाण्याची सर्वात मोठी आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या गाण्याला संगीत लाभले होते ते महाराष्ट्राचे लाडके संगीतकार ‘बाबूजी’ म्हणजेच Sudhir Phadke यांचे! Sudhir Phadke यांच्या एकूणच सात्विक, भावप्रधान आणि शास्त्रीय संगीतावर आधारित संगीत प्रकृतीला पूर्णपणे छेद देणारे हे गाणे होते. बाबूजींनी मराठी आणि हिंदीत भावगीते, भक्तीगीते आणि सुगम संगीताचा एक सुवर्णकाळ निर्माण केला होता, ज्यामध्ये संथपणा आणि संवादात्मकता असायची. पण Pehli Tarikh मधील हे भन्नाट, चंचल आणि Western Beatsचा प्रभाव असलेले गाणे त्यांच्या नेहमीच्या शैलीच्या अगदी विरुद्ध होते. अशा Light Moodचे, पाश्चात्त्य संगीताच्या तालावर नाचणारे गाणे बाबूजींनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत परत कधी केल्याचे दिसत नाही. त्यामुळे त्यांच्या अष्टपैलुत्वाचा हा एक दुर्मिळ आणि अमूल्य ठेवा मानला जातो. या गाण्याच्या निर्मितीबाबत आणखी एक रंजक पडद्यामागची आठवण अशी की, हे गाणे आधी Sudhir Phadke यांच्याऐवजी त्या काळातील दिग्गज आणि अतरंगी संगीतकार C. Ramchandra यांनी संगीतबद्ध करावे आणि गावे, अशी दिग्दर्शक Raja Nene यांची तीव्र इच्छा होती. कारण C. Ramchandra हे अशा प्रकारच्या पाश्चात्त्य धाटणीच्या गाण्यांसाठी प्रसिद्ध होते. (Kishore Kumar)
=========================
हे देखील वाचा: Kishore Kumar: एक दुर्लक्षित पण अभिजात चित्रपट ‘दूर गगन की छांव में’
=========================
परंतु, काही कारणास्तव ती कल्पना मागे पडली आणि हा योग Sudhir Phadke आणि Kishore Kumar यांच्याकडे आला, ज्याने इतिहास घडवला. ही दुर्मिळ आठवण Raja Nene यांची कन्या Anupama Deshmukh यांनी एका मुलाखतीत दिली होती, ज्यांनी स्वतः या Pehli Tarikh चित्रपटामध्ये एक बाल कलाकार म्हणून भूमिका केली होती. आज हा चित्रपट काळाच्या पडद्याआड गेला असला, तरी या गाण्याने अमरत्व मिळवले आहे. आजही प्रत्येक महिन्याची पहिली तारीख आली की, बँक खात्यात जमा होणाऱ्या पगाराच्या संदेशासोबत किंवा खिशात येणाऱ्या पैशांच्या आनंदासोबत सामान्य नोकरदाराच्या ओठांवर Din Hai Suhana Aaj Pehli Tarikh Hai हेच शब्द नकळत रुंजी घालतात. एका मराठी दिग्दर्शकाची निर्मिती, एका महान मराठी संगीतकाराचे संगीत, उत्तर भारतीय गीतकाराचे शब्द आणि एका बंगाली अवलिया गायकाचा आवाज या सर्वांच्या अद्भूत संगमातून तयार झालेले हे गाणे आज साठ-सत्तर वर्षांनंतरही प्रत्येक पिढीला तितकाच निखळ आनंद देत जिवंत राहिले आहे, हे भारतीय संगीतसृष्टीचे अद्भूत यश आहे. (Kishore Kumar)
दिन है सुहाना, आज पहली तारीख है
दिन है सुहाना आज पहली तारीख है
ख़ुश है ज़माना, आज पहली तारीख है
पहली तारीख अजी, पहली तारीख है
बीवी बोली घर जरा जल्दी से आना
एस हम को पिया जी हमें सिनेमा दिखाना
हमें सिनेमा दिखाना
करो ना बहाना, हां बहाना बहाना
करो ना बहाना, आज पहली तारीख है
ख़ुश है ज़माना, आज पहली तारीख है
पहली तारीख अजी, पहली तारीख है
किस ने पुकारा रुक गया बाबू, लाला जी की जान आज
आया है काबू, आया है काबू
ओ पैसा जरा लाना, ओ पैसा जरा लाना
लाना, लाना।
ओ पैसा जरा लाना, आज पहली तारीख है
खुश है जमाना, आज पहली तारीख है
पहली तारीख अजी, पहली तारीख है
बंदा बेकार है, किस्मत की मार है सब दिन एक हैं, रोज़ एतवार है।
मुझे ना सुनाना, हान सुनाना सुनाना,
मुझे ना सुनाना, आज पहली तारीख है,
खुश है जमाना, आज पहली तारीख है
पहली तारीख अजी, पहली तारीख है
डर के सामने, आए मेहमान हैं
बड़े ही शरीफ हैं, पुराने मेहरबान हैं
बड़े ही शरीफ हैं, पुराने मेहरबान हैं
जेब को बचाना, बचाना, बचाना।
जेब को बचाना, आज पहली तारीख है
ख़ुश है ज़माना, आज पहली तारीख है
पहली तारीख अजी, पहली तारीख है।
दिल बेकरार है, सोए नहीं रात से
एस एथ जी को गम है कि, पैसे चलो हाथ से
लूटेगा खजाना, खजाना, खजाना।
लूटेगा खजाना, आज पहली तारीख है
खुश है जमाना, आज पहली तारीख है
पहली तारीख अजी, पहली तारीख है
ऐ सिनेमा वालों आओ, आओ खेल मजेदार है
हो खेल मजेदार है, जी खेल मजेदार है
आगा है भगवान है, किशोर कुमार है
निम्मी गीता बाली है, अशोक कुमार है
नरगिस राज कपूर है, दिलीप कुमार है
गीतों का तूफान है, नाच की बहार है
नाच की बहार है
पांच आने का दस आना
पांच आने का दस आना पांच आने का दस आना
पांच आने का दस आना
अरे वापस नहीं जाना, जाना, जाना वापस
नहीं जाना, आज फेली तारीख है
ख़ुश है ज़माना, आज पहली तारीख है
पहली तारीख अजी, पहली तारीख है
मिल जुल के बच्चों ने, बापू को घेरा,
बापू को घेरा।
कहते हैं सारे कि, बापू है मेरा,
बापू है मेरा।
खिलो जरा लाना.
खिलो जरा लाना, आज पहली तारीख है
खुश है जमाना
आज पहली तारीख है
पहली तारीख अजी, पहली तारीख है।
दिन है सुहाना, आज पहली तारीख है
खुश है ज़माना, आज पहली तारीख है
पहली तारीख, आज पहली तारीख है
धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी
This blog is originally published at kalakruti media - https://kalakrutimedia.com/kishore-kumar-din-hai-suhana-aaj-pehli-tarikh-hai/



Comments
Post a Comment