Nana Patekar : असा कलाकार आणि असा माणूस पुन्हा घडणं अशक्य!
भारताचे सर्वात लेजंडरी दिग्दर्शक Satyajit Ray यांनासुद्धा या माणसासोबत काम करायची तीव्र इच्छा होती! भारतीय सिनेमाच्या इतिहासात Best Actor आणि Best Villain हे दोन्ही Filmfare Awards जिंकणारे देशात फक्त दोनच कलाकार आहेत आणि त्यातले एक म्हणजे आपले Nana Patekar! (Nana Patekar)
पडद्यावर राज्य करणाऱ्या नानांचं वैयक्तिक आयुष्य सुरुवातीपासूनच प्रचंड संघर्षाने भरलेलं होतं. वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी वडिलांची बिझनेसमध्ये फसवणूक झाली. अशा बिकट परिस्थितीत या 13 वर्षांच्या मुलाने कुटुंबाचा भार स्वतःच्या खांद्यावर घेतला. दिवसाला तब्बल 16 किलोमीटर चालत जाऊन जेब्रा क्रॉसिंगचे पट्टे रंगवणे आणि सिनेमाचे पोस्टर्स पेंट करणे, असं काम त्यांनी केलं. ज्या वयात मुलं खेळतात-शिकतात, त्या वयात नानांनी पोटाची खळगी भरण्यासाठी अहोरात्र कष्ट केले. पण नियतीचा खेळ बघा… ज्या माणसाने रस्त्यावर उभं राहून सिनेमाचे पोस्टर्स पेंट केले, पुढे जाऊन हाच माणूस त्याच सिनेमाच्या पोस्टर्सवर सुपरस्टार म्हणून झळकला! (Nana Patekar)
Kranti Veer चित्रपटातला तो प्रसिद्ध डायलॉग आणि सीन आठवतोय? Aa Gaye Meri Maut Ka Tamasha Dekhne… हा सीन शूट करायच्या वेळी नाना प्रचंड आजारी होते आणि मुंबईच्या नानावटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते. पण शूटिंग थांबल्यामुळे प्रोड्युसरचं मोठं नुकसान होत होतं. हे कळताच नानांनी स्वतःच्या तब्येतीची तमा न बाळगता हॉस्पिटलमधून थेट ॲम्ब्युलन्स मागवली आणि सेटवर पोहोचले! हॉस्पिटलच्या कपड्यांमधून बाहेर पडून, कोणतीही Rehearsal न करता, नानांनी एकाच टेकमध्ये तो संपूर्ण आयकॉनिक सीन इम्प्रोव्हाईज करून शूट केला. तो सीन बघून सेटवरचा प्रत्येक जण थक्क झाला होता!
Nana Patekar हे फक्त पडद्यावरचेच हिरो नाहीत, तर खऱ्या आयुष्यातही ते रिअल लाईफ कमांडर आहेत. 1991 मधील Prahaar चित्रपटाच्या तयारीसाठी नानांनी तब्बल 3 वर्षे खडतर लष्करी प्रशिक्षण घेतले. एवढंच नाही तर पुण्यातील मराठा लाईट इन्फंट्रीसोबत राहून त्यांनी रीतसर Commando Course पूर्ण केला. त्यांच्या या राष्ट्रसेवेसाठी आणि समर्पणासाठी Indian Army ने त्यांना Territorial Army मध्ये Honorary Captain ही सन्माननीय रँक बहाल केली. 1999 च्या कारगिल युद्धादरम्यान, जेव्हा देश संकटात होता, तेव्हा नाना पाटेकर स्वतः थेट कारगिलच्या सीमेवर (Line of Control) जाऊन पोहोचले. तिथे कित्येक दिवस ते आपल्या सैनिकांसोबत राहिले. भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात असा पराक्रम फक्त आणि फक्त नानांनीच केला आहे! (Nana Patekar)
अभिनेता म्हणून नाना जितके कठोर वाटतात, माणूस म्हणून त्यांचं हृदय तितकंच संवेदनशील आहे. एका शूटिंगदरम्यान महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागात एका गरीब शेतकऱ्याच्या पत्नीला आणि कुटुंबाला रडताना पाहून नानांचं मन हेलावून गेलं. नाना तिथेच ढसाढसा रडले. त्यांनी लगेच आपल्या खिशातून पैसे काढून त्या कुटुंबाला मदत केली… (Nana Patekar)
This blog is originally published at kalakruti media - https://kalakrutimedia.com/nana-patekar-an-artist-and-a-human-being-like-him-can-never-be-created-again/




Comments
Post a Comment