Laila Majnu : गाणी लोकप्रिय, चित्रपटही सुपर डुपर हिट, पण कुठे? तर….
Alia Bhatt आणि Sharvari यांची भूमिका असलेला Alpha तुम्ही अगदी अलीकडेच पाहिला असेल. दिग्दर्शक Shiv Rawail चा हा पहिला चित्रपट. या शिव रवैलचे वडील Rahul Rawail हेदेखील एक यशस्वी दिग्दर्शक. Biwi O Biwi, Arjun, Dacait, Bekhudi वगैरे चित्रपट त्यांचेच. शिव रवैलचे आजोबा H. S. Rawail हेदेखील एकेकाळचे यशस्वी दिग्दर्शक. मुस्लिम सामाजिक चित्रपट हे त्यांचे वैशिष्ट्य. त्यांची आजच्या जेन झी आणि जेन अल्फा पिढीला ओळख व्हावी म्हणून शिव रवैलचे उदाहरण दिले. याच एच. एस. रवैल दिग्दर्शित Laila Majnu (मुंबईत प्रदर्शित ११ नोव्हेंबर १९७६) या चित्रपटाच्या प्रदर्शनास पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. (Laila Majnu)
H. S. Rawail यांची यशस्वी कारकीर्द केवढी तरी मोठी. Mere Mehboob (१९६३) हा त्यांचा चित्रपट त्या काळात बराच गाजला. विशेषतः त्यातील मेरे मेहबूब तुझे मेरी मोहब्बत की कसम वगैरे गाणी लोकप्रिय ठरली. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या Sangharsh (१९६८) या चित्रपटाला साधारण स्वरूपाचं यश प्राप्त झाले. या चित्रपटात Dilip Kumar, Vyjayanthimala, Sanjeev Kumar यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात अभिनय सम्राट दिलीपकुमार असतानाही संजीवकुमारने आपलं अस्तित्व अधोरेखित केले या गोष्टीची त्या काळात बरीच चर्चा रंगली. एच. एस. रवैल दिग्दर्शित Mehboob Ki Mehndi (१९७२) या चित्रपटातील सर्वच गाणी आजही लोकप्रिय आहेत. Rajesh Khanna आणि Leena Chandavarkar असे प्रेमिक असलेल्या या चित्रपटाला रसिकांनी नाकारले. गाणी लोकप्रिय, पण पिक्चर सुपर फ्लॉप असं घडलं. एव्हाना तुम्हाला दिग्दर्शक एच. एस. रवैल यांच्याबद्दल थोडी माहिती झाली असेलच. (Laila Majnu)
त्यांनी दिग्दर्शित केलेल्या Laila Majnu या चित्रपटाचे प्रगती पुस्तक अगदी वेगळे आहे. लैला मजनू, हीर रांझा, रोमियो ज्युलिएट, शिरी फरहाद या आपल्या संस्कृतीतील प्रतिकात्मक प्रेम कथा आहेत. युवक आणि युवती यांच्यातील ओळख, ओढ, विश्वास, उत्कटता, असोशी, त्याग यांची ही प्रेमाची गोष्ट. कृष्ण धवल अर्थात Black and white चित्रपटाच्या काळापासून यांवर अनेक चित्रपट पडद्यावर आले. एच. एस. रवैल दिग्दर्शित या चित्रपटात Rishi Kapoor मजनू आणि Ranjita लैला. रंजिताचा हा पहिलाच चित्रपट. ऋषि कपूर नवतारकाचा नायक म्हणून गाजत होता. (Bobbyची Dimple Kapadia, Baroodची Shoma Anand इत्यादी) (Laila Majnu)
या चित्रपटात Danny Denzongpa, Iftekhar, Mumtaz Begum, Achala Sachdev, Aruna Irani, Raza Murad, Ranjeet इत्यादींच्याही भूमिका. या चित्रपटाच्या Sahir यांच्या गीतांना Madan Mohan यांचं संगीत. हा चित्रपट निर्मितीवस्थेत असताना मदन मोहन यांचं निधन झाले आणि Jaidev यांनी पार्श्वसंगीत दिले. या चित्रपटाच्या गाण्यांची ध्वनिमुद्रिका आणि ध्वनिफित प्रकाशित झाली आणि गाणी वेगाने लोकप्रिय झाली. ऋषि कपूरला Mohammed Rafi यांचा आणि रंजिताला Lata Mangeshkar यांचा आवाज हे सूत्र कायम ठेवले. Husn Hazir Ho Mohabbat Ki Khafa Pane Ko, Koi Patthar Se Na Maare Deewane Ko हे गाणे रेडिओ सिलोनवरील Binaca Geetmalaत एकदम वरच्या क्रमांकावर गेलेदेखिल. गल्ली गल्लीत लाऊड स्पीकरवर एकदम फॉर्मात राहिले. तेरे दर पर आया हू, होके मायूस तेरे दर से, इस रेश्मी पाझेब की झंकार सज दे, अब हम से खुदाई भी…. ही सगळी गाणी लोकप्रिय. एकाच चित्रपटातील सर्वच गाणी लोकप्रिय असं त्या काळात अनेक चित्रपटांबाबत घडत असे. याचं कारण अनेक दिग्दर्शकांना गीत संगीत नृत्याची उत्तम जाण असे. पटकथेत गाण्यांना स्थान असे. गाण्याचं रुपेरी पडद्यावरील सादरीकरणही भारी असे. (Laila Majnu)
लैला मजनूच्या सर्व गाण्यांची विलक्षण चलती असताना या चित्रपटाच्या Deluxe Film या निर्मिती संस्थेने हा चित्रपट सर्वप्रथम दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेश येथे प्रदर्शित केला आणि रसिकांना आवडला. या यशात या चित्रपटाच्या गीत संगीत नृत्याचा मोठाच वाटा होता. त्या काळात टप्प्याटप्प्याने चित्रपट प्रदर्शित होत. काही आठवड्यांनी बंगाल, बिहार येथे हा चित्रपट प्रदर्शित झाला. मग असाच राजस्थान, मध्य प्रदेश येथे प्रदर्शित झाला. सगळीकडे पिक्चरच्या जबरदस्त क्रेझने वातावरण ढवळून निघाले आणि आता ऐन दिवाळीत मुंबईत हा चित्रपट प्रदर्शित झाला. मुंबईत Super Theatre आणि इतरत्र हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि….. सगळीकडे हाऊसफुल्ल गर्दीत टाळ्या शिट्ट्यांनी केला जात असलेल्या या चित्रपटाचे मुंबईत अगदीच थंड स्वागत झाले. या चित्रपटाचे निर्माते Ram B. C. आणि Shiru Daryani यांना हा आश्चर्याचा फारच मोठा व्यावसायिक धक्का बसला. पण आपली पत प्रतिष्ठा सांभाळण्यासाठी सुपर चित्रपटगृहात या चित्रपटाने रौप्यमहोत्सवी यश संपादन केले. (पंचवीस आठवडे तो चालवला गेला.). चित्रपटाच्या जगात काहीही घडू शकते ते हे असेही असतं. लैला मजनू सुपर डुपर हिट चित्रपट म्हणून ओळखला जातो ही जमेची बाजू. अर्थात हे यश उत्तर भारतातील होते. असं घडलेला (आणि बिघडलेलाही) हा एकमेव चित्रपट नाही. आणखी काही चित्रपटांचे प्रगती पुस्तक असेच आहे. कुठे भरभरून गुण, कुठे जेमतेम काठावर उत्तीर्ण. (Laila Majnu)
==========================
हे देखील वाचा: Rishi Kapoor : ऋषी कपूर व नीतू सिंगमध्ये खुल्लम खुल्ला प्यार
==========================
दिग्दर्शक एच. एस. रवैल यांना काही वर्षांनी Jeetendraने Deedar-E-Yaar (१९८२) या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सोपवली. हादेखील मुस्लिम सामाजिक सांस्कृतिक चित्रपट. या चित्रपटात जितेंद्र, ऋषि कपूर, Tina Munim आणि विशेष भूमिकेत Rekha. या चित्रपटाच्या निर्मितीवर जितेंद्रने आतापर्यंतची सगळी कमाई खर्च केली. चकाचक लॅव्हीश झगमगाटी सेट लावले. जोरदार शोरदार पूर्वप्रसिद्धी केली आणि सर्वप्रथम मुंबईत हा चित्रपट प्रदर्शित केला. Roxy हे मुख्य चित्रपटगृह होते. आणि….. आणि पहिल्याच खेळापासून रसिकांनी नाकारले…. जितेंद्र आजही हे अपयश विसरलेला नाही. (Laila Majnu)
THIS BLOG IS ORIGINALLY PUBLISHED AT KALAKRUTI MEDIA - https://kalakrutimedia.com/laila-majnu-the-songs-were-popular-and-the-film-was-a-super-duper-hit-too-but-where-well/




Comments
Post a Comment