Posts

Uttar Marathi Movie Trailer: The trailer of the film that tells the story of a mother and son in today's time

Image
   "My mother knows!"  "The famous words," "Yes Mom!" 'Uttar ', the Marathi film which is currently in the discussion under the influence of this song, is now coming into more discussion. The trailer of the film was recently launched at a grand event, in which superstar actresses Tanuja and Kajol attended and expressed their feelings about the film. The film revolves around the relationship between a mother and a son, and the trailer has created a lot of emotions among the audience. Kajol and Tanuja, in their loving words, urged to watch the film 'with mom' or 'for mom', which is related to the theme of the film. (Hindi Movie) The most attractive thing in the trailer of 'Uttara' is the dialogue between mother and child, which every mother and child of today's time will like. The sweetness and harmony of these dialogues were the highlight of the trailer. Apart from this, the excellent filming and sound design have created...

State Cultural Awards 2024-25 या वर्षीच्या राज्य सांस्कृतिक पुरस्कारांची घोषणा

Image
  मनोरंजनसृष्टीतील नाट्य, चित्रपट, संगीत तसेच, तमाशा, शाहिरी, नृत्य, लोककला, आदिवासी गिरीजन,कलादान, प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील कलाकारांच्या गुणांचं कौतुक करत त्यांचा सन्मान करण्याचं काम राज्य सरकार कायम करत असतं… अशातच या क्षेत्रांमध्ये ज्या कलाकारांनी प्रदीर्घ काळ सेवा केली आहे, अशा कलावंताना राज्य सांस्कृतिक पुरस्काराने सन्मानित करण्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲङ आशिष शेलार यांनी केली. Celebrity interviews नामांकन मिळालेल्या कलावंतांची यादी पुढीलप्रमाणे नाटक – अरुण कदम (२०२५ मराठी चित्रपट- शिवाजी लोटन पाटील (2025), तमाशा- कोंडीराम आवळे(2025), शाहिरी- शाहिर मधुकर मोरे (2025), नृत्य- मती रंजना फडके (2025), प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील अभ्यासक व पत्रकार- प्रा आनंद गिरी (2024) दशावतार/नमन खेळ/वहीगायन- ओमप्रकाश यशवंत चव्हाण (2024), भानुदास शंभा सावंत (2025) नाटक – तेजश्री प्रधान (२०२4), भूषण कडू (2025), मराठी चित्रपट-मती मधुरा वेलणकर (2024) शंतनु रोडे (2025) उपशास्त्रीय संगीत- राहुल देशपांडे (2024) भाग्येश मराठे (2025) लावणी संगीतबारी- प्रमिला लोदगेकर ( 2024), वैशाली वा...

Kiara Advani-Siddharth Malhotra यांनी जाहिर केलं लाडक्या लेकीचं नाव…

Image
  बॉलिवूडचं क्युट कपल सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) यांच्या आयुष्यात एका गोंडस मुलीचं आगमन झालं आहे… १५ जुलै २०२५ रोजी सिद्धार्थ-कियाराला कन्यारत्न प्राप्त झालं… तेव्हापासून तिची एक झलक दिसावी आणि तिचं नाव नेमकं कपलने काय ठेवलं आहे याची उस्तुकता चाहत्यांमध्ये निर्माण झाली होती… अशातच आता दोघांनी सोशल मिडियावर गोंडस परीची छोटीशी झलक दाखवत तिचं नाव जाहिर केलं आहे… (Bollywood Couple) Bollywood Tadka सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांनी सोशल मिडियावर लेकीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे… या फोटोत दोघांनी त्यांच्या हातात लेकीचे पाय पकडले होते. आणि कॅप्शनमध्ये एका गोड नोट सह तिचे नाव जाहिर करत कॅप्शन लिहिलं आहे की, “आमच्या प्रार्थनेपासून ते आमच्या कुशीत… आम्हाला मिळालेला दैवी आशीर्वाद आमची राजकन्या, सरायाह मल्होत्रा  Saraayah Malhotra”.. त्यांच्या या पोस्टवर चाहत्यांनी आणि कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव करत लेकीच्या नावाची प्रशंसा केली आहे…(Kiara-Siddharth Daughter Name) ================================ हे देखील वाचा : Don 3 : कियाराच्या...

The Folk आख्यानचे संगीतकार पहिल्यांदाच मराठी चित्रपटाला देणार संगीत!

Image
  राज्यात मराठी माध्यमांच्या शाळांचं दुर्दैवी चित्र आपल्याला माहितच आहे… अशातच मराठी शाळा टिकाव्यात यासाठी मराठी चित्रपटसृष्टीतील मेकर्स प्रयत्न करताना दिसणार आहेत.. शिवाय, शाळेच्या आठवणींना पुन्हा उजाळा देणारा ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ चित्रपट लवकरच भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला. तसेच, दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी आपल्या सोशल मीडियावर ‘क्रांतिज्योतीचे संगीत कारभारी…’ अशी एक खास पोस्ट शेअर करत चित्रपटाच्या संगीत टीमची घोषणा केली. Bollywood Tadka मराठी लोककलेला मानाचा मुजरा देणाऱ्या आणि संपूर्ण राज्यभरात धुमाकूळ घालणाऱ्या ‘द फोल्क आख्यान’ या प्रभावी टीमकडे ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. संगीतकार म्हणून त्यांचा पहिलाच चित्रपट असून, या चित्रपटासाठी त्यांनी खास पाच दमदार, खणखणीत आणि रंगतदार गाणी तयार केली आहेत. ‘द फोल्क आख्यान’च्या हर्ष-विजय यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्यांना गीतकार ईश्वर ताराबाई अंधारे यांचे शब्द लाभले आहेत. त्यामुळे आता ‘द फोल्क आख्यान’ची संगीतशैली आणि हेमंत...

“बॉलिवूड कलाकारांना साऊथवाले फक्त…”; Suneil Shetty ने साऊथमध्ये काम न करण्याचं सांगितलं कारण

Image
  इंडस्ट्रीत गॉडफादर नसूनही आपलं स्थान फिल्मी दुनियेत भरभक्कमपणे तयार करणाऱ्या कलाकारांच्या यादीत सुनील शेट्टी (Suneil Shetty) याचं नाव नक्कीच घेतलं पाहिजे… १९९२ ला ‘बलवान’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये अभिनेता म्हणून सुनील शेट्टीने एन्ट्री घेतली… अ‍ॅक्शन हिरो म्हणून आपली ओळख निर्माण करणाऱ्या अण्णाने ‘दिलवाले’, ‘अंत’, ‘मोहरा’, ‘गोपी किशन’, ‘कृष्णा रक्षक’, ‘बॉर्डर’,’ भाई’,’ हेराफेरी’, ‘धडकन’ असे यशस्वी चित्रपट नावावर केले… एकीकडे संजय दत्त, आमिर खान अशा बऱ्याच या कलाकारांनी साऊथमध्ये काम केलं असताना दुसरीकडे सुनील ने मात्र फारसं साऊथ चित्रपटात काम केलं नाही… याबद्दल नुकत्याच एका मुलाखतीत सुनीलने खुलासा केला आहे…  (Entertainment News) Entertainment Mix Masala ‘द लल्लनटॉपला’ दिलेल्या मुलाखतीमध्ये सुनील शेट्टीने दाक्षिणात्य चित्रपटांत काम न करण्यामागचं कारण सांगितलं आहे. तो म्हणाला, “मला दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील भूमिकांसाठी अनेकदा विचारणा झाली आहे. पण, दुर्दैवाने फक्त नकारात्मक भूमिकासांठी विचारलं जातं… ते हिंदी चित्रपटातील नायकांना पडद्यावर नकारात्मक भूमिकेत दाखवतात, हे मला आवडत न...

१७ वर्षांत Dhurandhar चित्रपट नवा रेकॉर्ड करणार; ‘इतक्या’ तासांचा असणार रणवीर सिंगचा नवा Actionपट

Image
  ‘बॅंड बाजा बारात’ चित्रपटातील दिल्लीचा मुलगा असो किंवा ‘बाजीराव मस्तानी’ (Bajirao Mastani) चित्रपटातील बाजीराव ही भूमिका असूदेत… अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) याने आपल्या प्रभावी अभिनयाने प्रेक्षकांची मनं कायम जिंकली आहेत… आणि आता आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ चित्रपटातील त्याचा लूक तर विशेष लक्षवेधी आहे… सत्य घटनेवर आधारित कथानकासोबतच हा चित्रपट नवे रेकॉर्ड आपल्या नावावर करण्यासाठी रिलीजपूर्वीज सज्ज झाला आहे… मिळालेल्या माहितीनुसार बॉलिवूडमधला सर्वात जास्त रनटाईम असणारा धुरंधर चित्रपट ठरणार असून १७ वर्षात असं पहिल्यांदाच घडणार आहे… (Dhurandhar Movie) Box office collection  ‘धुरंधर’ चित्रपटाचा रनटाईम ३ तास ३२ मिनिटे असणार असं सांगितलं जात आहे… बॉलिवूड हंगामाने दिलेल्या वृत्तानुसार सेन्सॉर बोर्डाकडून (CBFC) चित्रपटाला सर्टिफिकेट लवकरच मिळणार असून चित्रपटाचा एक्झॅक्ट रनटाईम अधिकृतरित्या लवकरच जाहिर केला जाईल… इतकंच नाही तर ‘धुरंधर’ रिलीज होण्यापूर्वीच हा चित्रपट २ भागांमध्ये येणार असल्याचंही म्हटलं जात आहे… शिवाय, ‘उरी’ (URI : The Surgical Strike) आणि ‘आर्टिकल ३७०’ (Artic...

अखेर Isha Keskar चं ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिका सोडण्याचं खरं कारण आलं समोर!

Image
  Zee Marathi वरील लोकप्रिय ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ ( Lakshmichya Pavlani)  या मालिकेमध्ये सध्या एक मोठा ट्वीस्ट आला आहे. मालिकेतील मुख्य नायिका कला, जी अभिनेत्री ईशा केसकर (Actress Isha Keskar) हिने साकारली होती, ती अचानक मालिका सोडून गेल्यामुळे तिच्या फॅन्समध्ये नाराजीच वातावरण आहे. परंतु ईशा केसकरने या निर्णयाचं आता स्पष्ट कारण सांगितलं आहे, ज्यामुळे तिचे चाहते तिच्या निर्णयाची कारणं समजू शकतात. ईशाने नुकतीच एक मुलाखत दिली, ज्यात तिने तिच्या मालिका सोडण्याचा निर्णय स्पष्ट केला. ईशा म्हणते, “सलग दोन वर्षांपासून मी काम करत होते आणि माझ्या डोळ्याला काही काळापूर्वी फोड आला होता. त्यानंतरही मी चित्रीकरण करत राहिले. पण हा अपघात वाढत गेल्याने डॉक्टरांनी मला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला.” ती पुढे अस ही म्हणाली की, “जर मी आता विश्रांती घेतली नाही, तर भविष्यात डोळ्यावर शस्त्रक्रिया करावी लागेल आणि त्यामुळे मी काही काळ सूर्यप्रकाश देखील पाहू शकणार नाही.”(Actress Isha Keskar) Latest Marathi Movies ईशाने दिलेल्या माहितीनुसार, परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेत तिने मालिकेपासून विश्रांती घे...