Posts

Raag Bilawal : सुरांच्या विश्वातील चैतन्याचा झरा

Image
  भारतीय अभिजात शास्त्रीय संगीतावर आधारित चित्रपट गीते हा एक मोठा संशोधनाचा आणि मोठा स्मरण रंजनाचा विषय आहे. आपण जसजसे शास्त्रीय रागांच्या रचनांकडे जाऊ लागतो तसतसे त्याचे आणखी पैलू आपल्याला लक्षात येऊ लागतात. एक शास्त्रीय राग असा आहे जो आपण शालेय जीवनात नकळतपणे रोज गात होतो. पण आपल्या लक्षात येत नव्हते. हा राग आहे राग Bilawal . (Raag Bilawal) या रागावर आधारित भारतीय राष्ट्रगीत आहे. Jana Gana Mana Adhinayaka Jaya He Bharata Bhagya Vidhata हे मुख्यतः राग Bilawal वर आधारित आहे. हे या रागावरच रचण्याचे कारण काय असावे? याचे उत्तर आपल्याला या राग बिलावलच्या रचनेत दिसून येते. यामध्ये सर्व शुद्ध स्वर वापरलेले असतात सा रे ग म प ध नि त्यामुळे या रागाला एक नैसर्गिक फ्रेशनेस आलेला असतो. या रागातील रचना तुम्हाला उल्हासित प्रफुल्लित करतात. मनाला प्रसन्न करतात. त्यामुळेच हा राग पहाटेच्या वेळी गायचा राग आहे. या रागाचा उगम नेमका कुठे झाला याबद्दल अभ्यासकांमध्ये काहीसे मतभेद जरी असले तरी गुजरात मध्ये या रागाचा जन्म झाला असे समजले जाते आणि याच रागाचे आधुनिक रूप म्हणजे Alhaiya Bilawal आहे. ज्यामध्य...

Juhi Chawla And Salman Khan : न जमलेली जोडी!

Image
  चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळात आणि त्यानंतरच्या टप्प्यात अनेकदा एकाच कालखंडात समांतरपणे अग्रस्थानी वावरत असूनही काही दिग्गज अभिनेता आणि अभिनेत्रींनी कधीही एकमेकांसोबत स्क्रीन शेअर केली नाही, हा नेहमीच चित्रपटप्रेमींसाठी आणि सिने प्रेमींसाठी एक अत्यंत रंजक व कुतूहलाचा चर्चेचा विषय राहिला आहे आणि त्यातही जर हे कलाकार आपापल्या पिढीतील सर्वोच्च फॅन फॉलोइंग असलेले आघाडीचे शिलेदार असतील तर लोकांचे कुतूहल अधिकच ताणले जाते कारण हा एक अनोखा सिलसिला बॉलीवूडमध्ये सुरुवातीपासूनच चालत आला आहे जिथे Dilip Kumar आणि Nutan हे दोघेही आपापल्या अभिनय कौशल्याचे ध्रुव तारे असतानाही त्यांनी उमेदीच्या काळात कधीही एकत्र मुख्य भूमिका केल्या नव्हत्या. जरी Ramesh Saigal यांनी या दोघांना एकत्र घेऊन Shikwa हा चित्रपट सुरू करण्याचा प्रयत्न केला असला तरी तो पूर्ण होऊ शकला नाही आणि पुढे उतार वयात हे दोघे Subhash Ghai यांच्या Karma या सिनेमात एकत्र आले, तर दुसरीकडे Shammi Kapoor आणि Waheeda Rehman या अत्यंत लोकप्रिय जोडीचा देखील एकमेकांसोबत काम करण्याचा योग कधीच जुळून आला नाही, एवढेच नव्हे तर Dilip Kumar ...

Jeevan : मूर्तिमंत खलनायक

Image
  सिनेमाच्या सुवर्ण युगातील एक महत्त्वाचा खलनायक म्हणजे Jeevan . 24 ऑक्टोबर हा त्याचा जन्मदिवस. त्या निमित्ताने त्याच्या खलनायकीचा घेतलेला आढावा. Golden Era मधील हिंदी सिनेमाच्या खलनायकाच्या यादीत Pran ने नि:संशयपणे पहिला क्रमांक पटकावला असला तरी दुसऱ्या क्रमांकाचे दावेदार अनेक आहेत, त्यातील एक होते अभिनेता Jeevan यांचे! सिनेमाच्या सुवर्ण युगात घेतलेला त्यांनी खलनायकाच्या व्यक्तिरेखेचा वसा थेट Amitabh Bachchan युगापर्यंत चालविला, ज्याची सुरुवात त्यांच्या लहानपणापासूनच एका खडतर प्रवासाने झाली होती. (Jeevan) पृथ्वीवरील नंदनवनात म्हणजेच काश्मीरमध्ये जीवनाचा जन्म २४ ऑक्टोबर १९१५ रोजी एका भल्या मोठ्या कुटुंबात झाला, जिथे त्यांना सख्खे-सावत्र मिळून २४ भावंडे होती आणि लहान वयातच ते पोरके झाले, ज्यामुळे आयुष्याचे वास्तव त्यांना लवकर समजले. लाहोरला शालेय शिक्षण घेतल्यावर वयाच्या १८ व्या वर्षी खिशात अवघे २६ रुपये घेऊन ते मुंबईत सिनेमाची स्वप्ने घेऊन आले, पण इथे त्यांना सुरुवातीला मोठा संघर्ष करावा लागला आणि Mohan Sinha यांच्या स्टुडिओत ते ‘ Reflector Boy ‘ म्हणून रुजू झाले, जिथे त्यांच...

Dilip Kumar : दिलीप कुमारची फसलेली तिहेरी भूमिका

Image
  Dilip Kumar अभिनयाचे विद्यापीठ आहे, भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील अभिनयाचा एक मापदंड आहे, एक मानदंड आहे, एक सर्वोच्च स्थान आहे, रुपेरी पडद्यावरील त्यांचा एकूणच वावर, व्यक्तिरेखेशी एकरूप होणं हे पाहूनही ‘अभिनय म्हणजे काय असतं’ हे शिकता येईल असे अतिशय आदराने सांगता येत. असं सगळं असलं तरी त्यांनी भूमिका साकारलेला एखादा चित्रपट पुरता फसतोदेखील आणि या चित्रपटात त्यांनी का बरे भूमिका स्वीकारली असा प्रश्न पडतो. असाच एक चित्रपट Musheer Riaz निर्मित आणि Asit Sen दिग्दर्शित Bairaag . हा चित्रपट मुंबईत २२ ऑक्टोबर १९७६ रोजी प्रदर्शित झाला. मेन थिएटर गंगा. या चित्रपटाच्या प्रदर्शनास पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. (Dilip Kumar) या चित्रपटात Dilip Kumar यांची चक्क तिहेरी भूमिका आहे. Tapi Chanakya दिग्दर्शित Ram Aur Shyam (१९६७) मधील भित्रा राम आणि बिनधास्त बेधडक श्याम अशा दुहेरी भूमिकेला टाळ्या शिट्ट्यांनी पब्लिकचा जबरदस्त रिस्पॉन्स मिळाल्याने आता दुहेरी नव्हे तर तिहेरी भूमिका साकारुयात असा व्यावहारिक दृष्टिकोनातून विचार करत Bairaag बनला असावा. कैलाशनाथ हे पिता आणि त्यांची लहानपणी हर...